Philip Neri Rodrigues Dainik Gomantak
गोवा निवडणूक

फिलिप नेरींसमोर वेळ्ळीत कडवे आव्हान

वेळ्ळीत रंगणार चौरंगी लढत, बेंजामिन सिल्वांमुळे चुरस वाढली

दैनिक गोमन्तक

कुंकळ्ळी : वेळ्ळी मतदारसंघ राखण्यास फिलिप नेरी रोड्रीगिश यशस्वी होणार का? ऐनवेळी तृणमूल पक्षाची उमेदवारी मिळविलेले माजी आमदार बेंजामिन सिल्वा पुन्हा आमदार बनणार का? वेळ्ळीचे तडफदार सरपंच सावियो डिसिल्वा काँग्रेसचा बालेकिल्ला राखण्यात यशस्वी होणार की काँग्रेस ते भाजपा व भाजपा ते राष्ट्रवादी असा प्रवास केलेले माजी आमदार फिलिप नेरी आपली जागा राखण्यात यशस्वी होईल की आपच्या उमेदवारीवर दुसऱ्यांदा निवडणूक लढवणारे क्रूझ सिल्वा बाजी मारणार? यावर सध्या वेळ्ळीत चर्चा रंगत आहे. (Philip Neri Rodrigues News Updates)

वेळ्ळी मतदारसंघात चौरंगी लढत अपेक्षित असून, फिलिप नेरी रॉड्रिगीस यांच्यासमोर काँग्रेसचे सावियो डिसिल्वा, तृणमूलचे बेंजामिन सिल्वा, आपचे क्रूझ सिल्वा यांनी कडवे आव्हान उभे केले आहे.

वेळ्ळी मतदारसंघात भाजपानेही (BJP) उमेदवार उतरविला असून, आरजीनेही उमेदवार उतरविला असला तरी आरजी व भाजपात जिंकण्याएवढे या मतदारसंघात बळ नाही हे सत्य नाकारता येणार नाही. फिलिप यांनी काँग्रेस सोडून भाजपाला साथ दिल्यामुळे एक गट फिलिपच्या विरोधात आहे. फिलिप यांनी रिगणात उतरण्यास उशीर केल्यामुळे त्यांना ही निवडणूक बरीच जड जाण्याची शक्यता आहे.

काँग्रेस पक्षाचे नेते या मतदारसंघात फिरकत नाहीत काँग्रेसचे (Congress) जिल्हा समिती अध्यक्ष ज्यो डायस सावियो यांना तिकीट मिळाली म्हणून नाराज असून सध्या सावियो एकला चलो म्हणत मतदारांच्या घरी चपला झिजवत आहेत.

सावियो यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला राखण्यासाठी जोर लावला असला तरी एकाच समाजातील तिघे उमेदवार सावियो, बेजामीन व क्रूझ आपसात लढत असल्यामुळे त्याचा फायदा पुन्हा फिलिप उठवू शकतात.

आपचे क्रूझ सिल्वा गेल्या निवडणुकीत आपच्या उमेदवारीवर निवडणुकीत उतरले होते पुन्हा एकदा क्रूझ आपच्या उमेदवारीवर निवडणुकीत उतरले असून, मतदार क्रूझला स्वीकारल्यास आपला साष्टीत आमदार मिळू शकतो. वेळ्ळी मतदारसंघात काटें की टक्कर असली तरी या मतदारसंघात कोण बाजी मारणार हे सांगणे कठीणच आहे.

बेंजामीनला मतदार स्वीकारणार?

माजी आमदार बेंजामिन सिल्वा तृणमूलच्या (TMC) उमेदवारीवर निवडणुकीत उतरले असून बेजामीन सिल्वा काँग्रेसच्या उमेदवारीचे दावेदार होते. मात्र, उमेदवारी नाकारल्याने त्यांनी तृणमूलची फुले छातीवर लावली आहेत. बेंजामीन सिल्वा यांच्याकडे कार्यकर्त्यांची फळी असली तरी तृणमूलला वेळ्ळीचे मतदान कितपत स्वीकारणार? हाच खरा प्रश्न आहे. काँग्रेसचे सावियो डिसिल्वा यांनी प्रचारात बरीच आघाडी घेतली असली तरी सावियो यांना काँग्रेसकडून हवा त्या प्रमाणात सहकार्य मिळत नसल्याचे कळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 'गोवा, मुंबईत ड्रग्ज वापरले'! रायपूरमधील 2 महिलांची कबुली; इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून टेक्नो पार्ट्यांचे आयोजन

Goa Politics: खरी कुजबुज; हे नगरसेवक आहेत कुठे?

BITS Pilani: गोव्‍यातीलच 'बिट्‌स' कॅम्‍पसमध्‍ये मृत्‍यू का होतात? युवा काँग्रेसची निदर्शने, सखोल चौकशीची आपची मागणी

Colvale Jail: कोलवाळ कारागृहात छापा! 8 मोबाईलसह तंबाखू हस्तगत; तुरुंगातील रामभरोसे कारभार उघड

Advalpal: ‘तुम्‍ही करोडो कमावता, आम्‍हाला का नागवता?’ अडवलपालमधील जमीनमालकाचा खाण कंपनीला संतप्‍त सवाल

SCROLL FOR NEXT