Goa BJP Dainik Gomantak
गोवा निवडणूक

कार्यकर्त्यांना दिली जाणारी दुय्यम वागणूक भाजपला भोवणार?

नाराजांची मनधरणी; फडणवीसांची कसरत

दैनिक गोमन्तक

मडगाव: काँग्रेसमधून आयात नव भाजप आमदारांच्या कार्यकर्त्यांनी पक्षावर कब्जा केल्याने मूळ भाजप कार्यकर्त्यांना दिली जाणारी दुय्यम वागणूक, नोकरभरतीत झालेला अन्याय, अशा अनेक कारणांमुळे गोव्यात मूळ भाजप कार्यकर्ते दुखावले गेले आहेत.शिवाय एकाच घरात दोघांना उमेदवारी दिल्याचा ताप सध्या गोव्याचे प्रभारीपद असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोसावा लागत आहे. नाराज भाजप कार्यकर्त्यांची समजूत काढताना त्यांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे.(party workers are given secondary treatment in goa bjp party)

गोव्यात भाजपच्या (Goa BJP) प्रचाराची धुरा सांभाळत असतानाही जुन्या भाजप कार्यकर्त्यांतील असंतोष दूर करण्याची जबादारीही फडवणीस यांनी स्वतःवर घेतली असून ते नाराजांना स्वतः भेटत आहेत. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि पर्रीकर पुत्र उत्पल पर्रीकर यांनी भाजप सोडून स्वतंत्रपणे निवडणूक (Goa Assembly Election) लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर हे बंडाचे वारे इतर मतदारसंघात पोहोचू नये, यासाठी ते खबरदारी घेत असल्याचे सांगितले जाते.

दोन दिवसांपूर्वी फातर्पा येथे एका सभेत फडवणीस (Devendra Fadanvis) यांना कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. नोकरभरतीत मूळ भाजप कार्यकर्त्याना डावलले गेले, हा त्यावेळी मांडलेला प्रमुख मुद्दा होता, असे सांगण्यात येते. दक्षिण गोव्यातच त्यांनी एका पंथाच्या धर्मगुरूंची भेट घेतली असता त्यांना असाच अनुभव आल्याची माहिती भाजप सूत्रांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT