Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा निवडणूक

...तर भाजप विरोधी पक्षांनी गोव्यात एकत्र यावे: दिगंबर कामत

पत्रकारांशी बोलताना कामत म्हणाले, स्थानिक पातळीवर कोंग्रेसचे (Congress) आप आणि तूनमूलशी (TMC) युतीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही.

दैनिक गोमन्तक

पणजी: आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत मतदार कोणत्या एका पक्षाला जनादेश देणार का सरकार स्थापन करण्यासाठी विविध पक्षांना हातमिळवणी करावी लागणार हे 10 मार्चलाच स्पष्ट होईल. मात्र कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टीने आतापासूनच निवडणुकीनंतर भाजप (BJP) विरोधी पक्षांबरोबर युती करण्याची तयारी दर्शवली आहे. (Goa Election 2022)

याबाबत बोलताना कोंग्रेसने नेते दिगंबर कामत म्हणाले की, कुणालाही बहुमत न मिळाल्यास भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी भाजप विरोधी पक्षांनी एकत्र येऊन यावर तोडगा काढला पाहिजे.

पत्रकारांशी बोलताना कामत म्हणाले, स्थानिक पातळीवर कोंग्रेसचे (Congress) आप आणि तूनमूलशी (TMC) युतीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. मला राष्ट्रीय पातळीवर काही चर्चा झाली असल्यास मला त्याची माहिती नाही.

खाण घोटाळ्याप्रकरणी त्यांचे खाण संचालक अरविंद लोलियनकर यांना का अटक करण्यात आली, असे विचारले असता ते म्हणाले, “हा वेगळा विषय आहे. संचालकांची सही चुकल्यामुळे ती कारवाई करण्यात आली." शहा आयोगाच्या अहवालात नमूद केलेल्या 35,000 कोटी रुपयांच्या वसुलीबद्दल विशेषतः विचारले असता कामत म्हणाले की आयोगाने हा अंतिम आकडा असल्याचे सांगितले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT