P Chidambaram said Goa Congress workers have power to defeat minister Dainik Gomantak
गोवा निवडणूक

मंत्र्याला पराभूत करण्याची गोवा कॉंग्रेस कार्यकर्त्यांत ताकद

वाळपई मतदारसंघात स्थानिक चार जणांची नावे तिकिटासाठी आली आहेत. त्यापैकीच वाळपईतील स्थानिक व्यक्तीलाच तिकीट दिले जाईल.

दैनिक गोमन्तक

वाळपई: कोणत्याही राजकीय पक्षाची बांधणी कार्यकर्त्यांवरच अवलंबून असते. त्यामुळे कार्यकर्त्यांतही मंत्र्याला पराभूत करण्याची ताकद असते, असे प्रतिपादन काँग्रेसचे (Congress) केंद्रीय ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांनी केले.

वाळपई येथे काणेकर सभा मंडपात आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष एम के. शेख, वाळपई काँग्रेस गट समितीचे अध्यक्ष हरिश्चंद्र मानकर, सदस्य रणजित राणे, विश्वेश प्रभू, रोशन देसाई, उत्तर गोवा अध्यक्ष विजय भिके, मनिषा उसगावकर यांची उपस्थिती होती.

चिदंबरम म्हणाले, वाळपई मतदारसंघात स्थानिक चार जणांची नावे तिकिटासाठी आली आहेत. त्यापैकीच वाळपईतील स्थानिक व्यक्तीलाच तिकीट दिले जाईल. गोव्यात जमीन मालकी, रोजगार, खनिज व्यवसाय, महिला सुरक्षा हे विषय गंभीर बनले आहेत. काँग्रेस सत्तेवर येताच कायदेशीर प्रक्रियेव्दारे खाण विषय मार्गी लावला जाईल. जमिनीची मालकी मिळण्यासाठी विशेष कायदा आणला जाईल. त्याव्दारे वंचित लोकांना त्यांचे जमिनीचे हक्क मिळणार आहेत. महिलांना सुरक्षा मिळावी म्हणून कायदा संमत केला जाईल. युवकांना विपुल प्रमाणात रोजगार दिला जाईल.

हरिश्चंद्र मानकर यांनी स्वागत केले. एम के. शेख यांनीही विचार मांडले. कृष्णा नेने यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ प्रदान केले. यावेळी महेश देसाई, मनीषा उसगावकर, विश्वेश प्रभू, रणजित राणे, आशीष काणेकर, रोशन देसाई, नंदकुमार कोपार्डेकर आदींनी वाळपईतील समस्या मांडल्या. वाळपईचा उमेदवार लवकरच जाहीर करावा, नवा चेहरा असावा, जमीन मालकी विषय तडीस न्यावा, खनिज व्यवसायाला चालना द्यावी, रोजगार द्यावा, राज्यात चांगले रस्त्यांची बांधणी करावी, भ्रष्टाचार मुक्त प्रशासन चालवावे, काँग्रेस पक्षाशी गद्दारी केलेल्यांना पुन्हा घेऊ नये अशा विविध सूचना मांडण्यात आल्या. मेळाव्याला मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. मनीषा उसगावकर यांनी आभार मानले. ॲड. भालचंद्र मयेकर यांनी सूत्रनिवेदन केले.

‘विश्वजितना पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश नाही’

काँग्रेसचा घात केलेल्या विश्वजीत राणेंना कोणत्याही स्थितीत पक्ष प्रवेश दिला जाणार नाही. पुढील आठवड्यात प्रदेश समितीची बैठक होऊन काँग्रेसची पहिली उमेदवारीची यादी जाहीर केली जाणार आहे. वाळपईत सर्वांनी मतभेद विसरून एकजुटीने काम करून भाजपचा पराभव करावा व काँग्रेसचा स्थानिक उमेदवार विजयी करावा, असे आवाहन पी. चिदंबरम यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT