P Chidambaram Answer on Congress TMC alliance for goa election 2022  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

गोव्यात काँग्रेस TMCसोबत युती करणार का? पी चिदंबरम यांनी दिले उत्तर

गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष टीएमसीसोबत निवडणूक लढवणार का? यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली

दैनिक गोमन्तक

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी आतापर्यंत बरेच गोवा दौरे केले. त्यावेळी पक्षाच्या बांधणीसाठी त्यांनी नेत्यांच्या बैठका घेतल्या. गोवा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी (AAP) आणि तृणमूल काँग्रेस (TMC) असले तरीही काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष (BJP) हे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत. काही मते मिळतील, ते फक्त भाजपविरोधी मतांचे विभाजन करतील, असे गोव्यात काँग्रेससाठी निवडणूक निरीक्षकाची भूमिका बजावणारे चिदंबरम म्हणाले. तृणमूलने काही दिवसांपूर्वीच युतीचे संकेत दिले होते आणि काँग्रेस नेतृत्वाला त्यांचा हेतू माहीत होता. त्यांच्या म्हणण्यानुसार यावर उत्तर दिले गेले असेल, परंतु यासंदर्भात त्यांच्याकडे कोणतीही अधिकृत सूचना आलेली नाही.

गोव्यात मोठ्या प्रमाणावर भाजपविरोधी वातावरण असून सत्ताविरोधी वारे वाहत आहेत आणि त्यांचा पक्ष गोव्यातील जनतेला आवाहन करणार आहे की, गोव्यावर गोवावासीयांचे राज्य असावे आमच्याकडे गोव्यातील स्थानिक नेते आहे. तृणमूल काँग्रेस आमच्या ब्लॉक स्तरावरील नेते, सरपंचांसह अनेक सदस्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सुरुवातीच्या दिवसांमध्ये, तृणमूल काँग्रेसच्या सरचिटणीसांनी घोषणा केली होती की तृणमूल गोव्यातील सर्व 40 जागा लढवेल आणि असे दिसते की ते त्या ध्येयासाठी आक्रमक भूमिका घेत आहेत. काही दिवसांपूर्वी तृणमूलने काँग्रेस आणि इतर पक्षांसोबत युती करण्याचे संकेत दिले होते. मला वाटते की एआयसीसी नेतृत्वाला याची जाणीव असेल, असे म्हणत तृणमूलच्या गोव्यातील राजकारणाचा त्यांनी समाचारही घेतला.

'मला एआयसीसीकडून कोणतीही अधिकृत सूचना मिळालेली नाही', तृणमूल काँग्रेसच्या गोवा प्रभारी महुआ मोईत्रा यांनी काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षांच्या ऐक्याबाबत ट्विट करून काँग्रेससोबत युती करण्याचे संकेत दिले होते तेव्हा त्यांनी ही टिप्पणी केली. मात्र, काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी तृणमूल काँग्रेससोबत युती केली जाईल, अशी अटकळ फेटाळून लावली.

गोव्याच्या निवडणुकीच्या (Goa Election) हंगामात आप आणि तृणमूल प्रतिस्पर्धी ठरू शकतात का प्रश्नाला उत्तर देताना, चिदंबरम (P. Chidambaram) म्हणाले की, 'गोव्यातील प्रत्येक राजकीय निरीक्षक सहमत असेल की राज्यातील दोन प्रमुख प्रतिस्पर्धी काँग्रेस आणि भाजप आहेत. त्यांच्या मते, काँग्रेसची पाळेमुळे गोव्यात खोलवर रूजली आहेत आणि राज्यभर त्यांचे कार्यकर्ते आहेत. आप मागील निवडणुकीत सर्व 40 जागांवर लढले होते आणि मात्र त्यावेळी ते खातेही उघडू शकले नाही. तृणमूल काँग्रेस पहिल्यांदाच गोव्याच्या मैदानात उतरली आहे. त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत. जरी आप आणि तृणमूल काँग्रेस काही मते मिळवू शकले तरी ते फक्त भाजपविरोधी (BJP) मतांचे विभाजन करतील. गोव्याचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळणार नाही.'

पुढे बोलतांना, सध्या काँग्रेसची गोवा फॉरवर्ड पक्षासोबतची युती निश्चित झाली असून राज्य युनिटची काही पक्षांशीही चर्चा सुरू आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे मात्र गोव्यात सरकार स्थापन न करण्याच्या आणि अनेक आमदारांनी पक्ष बदलल्याच्या प्रश्नावर चिदंबरम यांनी 2017-19 मध्ये जे घडले ते लज्जास्पद होते आणि निवडून आलेल्या आमदारांनी पक्षाचा विश्वासघात केला असे म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली. त्याचबरोबर यावेळी काँग्रेसचा एकही आमदार आपली बाजू बदलणार नाही, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: भारताचा 'क्लीन स्वीप'! शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात शेफालीची खेळी ठरली व्यर्थ; कांगारुंनी मारली बाजी

Crime News: माणुसकीला काळिमा फासणारी घटना! 14 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार; आरोपींच्या क्रूर कृत्याने हादरले उत्तराखंड

Goa Politics: "गोव्यात एकाच घरात 80 मतदार; आता सरकारचा पर्दाफाश करू" काँग्रेसचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Operation Sindoor: 'मेक इन इंडिया'च्या जोरावर भारतानं पाकिस्तानला गुडघे टेकायला लावलं'; 'ऑपरेशन सिंदूर'वर PM मोदींचं मोठं वक्तव्य

Rohit Sharma Lamborghini Urus: 'मुंबईच्या राजा'ने खरेदी केली नवीकोरी Lamborghini, '3015' नंबर प्लेट चर्चेत; किंमत किती?

SCROLL FOR NEXT