BJP state president Sadanand Shet Tanavade Dainik Gomantak
गोवा निवडणूक

भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन कोणतेही मतभेद नाही, तानावडेंचा दावा

भाजपचे केंद्रीय निरीक्षकच मुख्यमंत्रीपदाचं नाव जाहीर करणार असल्याची माहिती

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आठवडा उलटला तरीही अजून सत्तास्थापनेचा दावा भाजपने केलेला नाही. गोव्यात मुख्यमंत्रीपदावरुन मतभेद असल्याचीही चर्चा सुरु आहे. विद्यमान मुख्यमंत्र्यांसमोर विश्वजीत राणेंनी मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितल्याचं बोललं जात आहे. आता गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडेंनी भाजपमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व एक आहेत, असं विधान केलं आहे. तसंच मुख्यमंत्रीपदावरुन कोणताही संभ्रम नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री (CM) कोण होणार या चर्चेवर याआधीच पडदा पडला असला तरीही विश्वजीत राणेंच्या संभाव्य बंडाची चर्चा सुरुच आहे. गोव्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचंच नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे. मंत्रिमंडळाच्या 80 टक्क्यांपेक्षा जास्त जागांनाही गोवा भाजपकडून अंतिम रूप दिलं गेल्याची माहिती आहे. केंद्रीय नेतृत्वाशी सल्लामसलत केल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असं तानावडेंनी स्पष्ट केलं आहे.

गोव्यासह उर्वरित तीन राज्यात भाजपचं सत्तास्थापन खोळंबलं आहे. होळीनंतर विजय मिळालेल्या चारही राज्यात भाजप (BJP) सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती आहे. मात्र गोव्यासारखाच मुख्यमंत्रिपदाचा पेच उर्वरित राज्यांमध्येही झालाय का अशीही चर्चा आता सुरु झाली आहे. गोव्यात 21 मार्चनंतर भाजपचे केंद्रीय निरीक्षक दाखल होणार असून सत्तास्थापनेपासून मुख्यमंत्रिपदापर्यंत सर्व निर्णय केंद्रीय नेतृत्त्वच घेणार असल्याचंही तानावडेंनी स्पष्ट केलं आहे. गोव्यात (Goa) शपथविधीचा सोहळाही भव्य आयोजित केला जाणार असून याला मोठे नेतेही हजर राहणार असल्याचं तानावडेंनी सांगितलं आहे. मगोपच्या पाठिंब्यावर मात्र तानावडेंनी भाष्य करणं टाळलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT