Devendra Fadnavis Dainik Gomantak
गोवा निवडणूक

'गोव्यात आलेले राजकिय सायबेरीयन पक्षी निवडणूक संपल्यावर परत जाणार'

भाजपचे (BJP) गोवा प्रभारी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज तृणमुल (Trinamool) व आप पक्षावर केली.

दैनिक गोमन्तक

केपे: कडाक्याच्या थंडीत सायबेरीयन पक्षी जसे दुसऱ्या ठिकाणी ऊब घेण्यासाठी जातात तसेच गोव्यातील निवडणुकीवर डोळा ठेवून काही राजकीय सायबेरीयन पक्ष गोव्यात आले आहेत अशी टीका भाजपचे (BJP) गोवा प्रभारी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज तृणमुल (Trinamool) व आप पक्षावर केली. हे स्थलांतरित पक्षी येऊन लोकांना जी आश्वासने देतात ते निवडणुकीनंतर आपला गाशा गुंडाळून परत आपल्या गावात जाणार असल्याने या पक्षांच्या भुलथापांना बळी पडू नये असे फडणवीस यांनी सांगितले.

बेतुल केपे येथे कार्यकर्ता मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet Tanawade), केपेचे आमदार बाबू कवळेकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, केपे मंडळ अध्यक्ष संजय वेळीप, जिल्हा पंचायत सदस्य खुशाली वेळीप, शाणु वेळीप, नगराध्यक्षा सुचिता शिरवईकर, उनगराध्यक्ष विलियम फेर्नांडिस,वनगरसेवक प्रसाद फळदेसाई, दयेश नाईक, गणपत मोडक व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) बेरोजगारीने कळस गाठला असून लोक हताश झाले आहेत तेथे एकही नवीन उध्योग येत नसल्याने बेरोजगारी वाढत चालली आहे बंगालमध्ये फक्त खंडणी वसूल करण्याचे उत्तमरीत्या चालत आहे असे फडणवीस यांनी सांगितले. पूर्वी कमुनिस्ट पक्षाकडून लोकांची छळवणूक चालली होती व यासाठी लोकांनी ममता बॅनर्जी यांना निवडून आणले होते पण त्यांनीही हीच परंपरा सुरू ठेवली आहे जर कुणी सरकारच्या विरोधात आवाज काढला तर त्याचा दिवसा ढवळ्या खून केला जातो असे त्यांनी सांगितले.

अशा पक्षाला गोव्यातील जनतेने त्यांची जागा दाखवून द्यावी राज्यात व देशात काँग्रेसचा होत असलेली अधोगती पाहता तृणूमुल काँग्रेस व आम आदमी पक्ष येथे आपले भविष्य अजमावू पाहता अशा साधी साधूंना लोकांनी त्यांची त्यांना जागा दाखवून ध्यावी असे त्यांनी सांगितले. आम आदमी जे दिल्ली मॉडेल विषयी लोकांना जी माहिती देत आहे ती पूर्ण चुकीची असून दिल्ली राज्याचा विकास केंद्र सरकार करीत आहे. दिल्ली सरकारकडे फक्त आरोग्य ,वीज व शिक्षण या खात्यांचा ताबा असून जास्तीत जास्त केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या हजारो कोटी रुपयांच्या अनुदानामुळे विकास कामे केली जातात व यासाठी केजरीवाल यांनी गोवा मॉडेल दिल्लीला अजमावून पहावा असे फडणवीस यांनी सांगितले.

केंद्र सरकारकडून भरीव योगदान राज्याला मिळत आल्याने संपूर्ण राज्यात विकासकामे जोराने सुरू आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पक नेतृत्वाखाली देश प्रगतीपथावर आहे असे बाबू कवळेकर यांनी सांगितले. काँग्रेसच्या कार्यकाळात केंद्र सरकारकडून कोणतीच मदत मिळत नव्हती पण केंद्रात भाजपा सत्तेवर येताच गोव्यात विकासाची गंगा वाहू लागली आहे ज्या प्रमाणे कोविड महामारीवेळी केंद्र सरकारने काम केले आहे ते पाहता सामान्य लोकांसाठी एकच पर्याय म्हणजे भाजपाच राहिला आहे काँग्रेस व इतर पक्षाची गोव्यात झालेली दैना आपण पाहत असून परत एकदा लोकांनी भाजपला साथ देऊन राज्यात भाजपचे सरकार स्थापन करण्यास मदत करावी असे कवळेकर म्हणाले. राज्यात सर्व ठिकाणी बँनरबाजी करून अथवा खोटी आश्वासने देऊन निवडणूक जिंकता येत नाही त्यासाठी तळागळात जाऊन लोकांसाठी काम करावे लागते व हे काम भाजपा उत्तमरीत्या करीत आहे असे तानावडे यांनी सांगितले.

कवळेकर यांनी काँग्रेस पक्षाची साथ सोडल्यानंतर या पक्षाची वाताहात झाली आहे.त्यांचे अवघेच आमदार आता शिल्लक राहिले असून तेही एकसंघ नसल्याचे दिसून येते असे सावईकर यांनी सांगितले.भाजपाने लोकांसाठी अनेक योजना चालीस लावल्या आहेत ते इतर पक्षांना श्यक्य होणार नाही भाजपा शासित राज्यामध्ये पेट्रोलचे दर कमी करण्यात आले याच्या विरोधात काँग्रेस, आप, तृणूमुल काँग्रेस शासित राज्यांना ते जमले नाही विरोधी पक्ष लोकांची दिशाभूल करण्यास हुशार आहेत पण सामान्य जनतेसाठी ते काहीही करू शकत नाही व यासाठी येणाऱ्या निवडणुकीत लोकांनी भाजपा उमेदवारांना जिंकून आणावे व विकासशील गोवा बनवण्यास हातभार लावावा असे सावईकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT