Goa Politics पर्यावरण मंत्री मायकल लोबो

 
Dainik Gomantak
गोवा निवडणूक

लोबोंचा पत्नीसोबत भाजपला रामराम; काँग्रेस प्रवेश निश्‍चित

पुढच्या दोन दिवसांत मायकल लोबो पत्नी दिलायला लोबो तसेच काही पाठीराख्यांसह भाजपला रामराम करणार आहेत. गुरुवारी ते कॉंग्रेसमध्ये रितसर प्रवेश करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दैनिक गोमन्तक

Michael Lobo: गेले काही दिवस परस्परविरोधी वक्तव्य करणारे कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांना आता कॉंग्रेस प्रवेशाचा मुहूर्त सापडला असून, पुढच्या दोन दिवसांत ते पत्नी दिलायला लोबो तसेच काही पाठीराख्यांसह भाजपला (BJP) रामराम करणार आहेत. गुरुवारी ते कॉंग्रेसमध्ये रितसर प्रवेश करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

कॉंग्रेस प्रवेशाचा मुहूर्त सापडल्यावर भाजपा (BJP) नेत्यांवर त्यांनी आज तोंडसुख घेतले. पक्षाचे दोन वरिष्ठ नेते हे मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांच्या तत्त्वांना तिलांजली देत असून, श्रमिक कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ लागला आहे, असा आरोप कुणाचेही नाव न घेता लोबो (Michael Lobo) यांनी वेर्ला-काणका येथे केला. मायकल लोबो गेले महिनाभर कॉंग्रेस (Congress) नेत्यांच्या संपर्कात आहेत. कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांत त्यांनी वाटाघाटी चालवल्या होत्या. पत्नी दिलायला (Delilah Lobo) यांना शिवोली (Siolim) मतदारसंघात उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी प्रयत्न चालवले होते.

सुरवातीला त्यांना नकार देऊन गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी दिलायला लोबो यांना शिवोली येथे अपक्ष लढण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार सोमवारी दिलायला यांनी मायकल लोबो यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळही फोडला होता. लोबो यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असलेल्या भाजपा नेत्यांनी अलीकडे गोवा फॉरवर्डचे (Goa Forward Party) जयेश साळगावकर तसेच पर्वरीचे आमदार रोहन खंवटे (Rohan Khaunte) यांना पक्षात प्रवेश दिला. त्यामुळे या दोन नेत्यांना घेऊन कॉंग्रेस नेत्यांशी वाटाघाटी करणाऱ्या मायकल लोबो यांना आपोआपच राजकीय शह बसला होता. लोबो यांच्या कारवायांमुळे सतर्क झालेल्या भाजपने त्यांना विधानसभेचे तिकीट नाकारण्यासंदर्भातही विचार चालवला होता. त्यामुळे बॅकफूटवर गेलेल्या लोबो यांची अस्वस्थता वाढली आणि मंगळवारी त्यांनी भाजपा नेत्यांवर शरसंधान साधले.

‘फॅमिलीराज’बाबत आम्हालाच परक्याची वागणूक का?

भाजपच्या ‘फॅमिलीराज’बाबत बोलताना बाबू कवळेकर तसेच मोन्सेरात यांना एक न्याय, तर लोबो दाम्पत्याला दुसरा न्याय, असे पक्षाचे धोरण कसे काय असू शकते, असा प्रश्न लोबो यांनी भाजप श्रेष्ठींना केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT