प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि भाजपचे नेते माविन गुदिन्हो यांनी स्वागत केले.  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

विधिमंडळ नेते पदाच्या निवडीसाठी समितीने निवडलेले विशेष निरीक्षक गोव्यात दाखल

विमानतळावर त्यांचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि भाजपचे नेते माविन गुदिन्हो यांनी स्वागत केले.

दैनिक गोमन्तक

गोवा: विधानसभा निवडणुकीनंतर गोव्यात विधिमंडळ नेते पदाच्या निवडीसाठी केंद्रीय संसदीय समितीने निवडलेले विशेष निरीक्षक केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि पशुसंवर्धन राज्यमंत्री एल मुरुगण गोव्यात दाखल झाले आहेत. (meeting of the members of Legislature will be held in Panajim at 4 pm)

विमानतळावर त्यांचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि भाजपचे नेते माविन गुदिन्हो यांनी स्वागत केले. त्यांच्या उपस्थितीत चार वाजता विधिमंडळ सदस्यांची पणजीत बैठक होणार आहे.

गोव्यात विधानसभा निवडणुकीनंतर रखडलेला सत्तास्थापनेचा दावा अखेर मार्गी लागणार आहे. सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी भाजपचे नेते राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. आज संध्याकाळी 5 वाजता राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा भाजप नेते कऱणार आहेत.

सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी भाजपचे (BJP) सर्व आमदार आणि अन्य नेते राजभवनावर जातील. आज भाजपचे केंद्रीय निरीक्षकही गोव्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

काल रविवारी काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) आणि विश्वजीत राणे दिल्लीमध्ये दाखल झाले होते. दोघांचीही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बैठक झाली. बैठकीनंतर प्रमोद सावंत गोव्याला परतले, मात्र विश्वजीत राणे गोव्यात न परतल्याने पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या होत्या.

विश्वजीत राणेंची मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा आता काही लपून राहिलेली नाही.

दरम्यान विश्वजीत राणेंची (Vishwajit Rane) मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा आता काही लपून राहिलेली नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीतही राणेंची नाराजी दूर झाली नसल्याचं एकंदरित चित्र दिसून येत आहे. त्यांना दुसऱ्या क्रमांकाचं पद दिलं जाणार आहे. यात उपमुख्यमंत्रिपदासह गृहमंत्रीपदही दिलं जाऊ शकतं. गोव्यात गृहमंत्रीपद हे मुख्यमंत्र्यांकडेच ठेवलेलं असतं. आता ही जबाबदारी देऊन राणेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. नाराज विश्वजीत राणे गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून बसल्याचं चित्र आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

SCROLL FOR NEXT