Chandrakanch Patil Dainik Gomantak
गोवा निवडणूक

'गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यासाठी निघाले...' चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांच पाटील (Chandrakanch Patil) यांनी माध्यमाशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

दैनिक गोमन्तक

देशात आगामी काळात पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. यामध्ये गोवा राज्याचा समावेश आहे. राज्यातील राजकारण मागील काही दिवसांपासून राजकीय रणधुमाळीमुळे गाजू लागले आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडू लागले आहेत. यातच महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत आतुर आहेत. मात्र दुसरीकडे कॉंग्रेसने आघाडीसाठी प्रतिसाद दिलेला नाही. याच पाश्वभूमीवर महाराष्ट्रात गोवा विधानसभेच्या निवडणुकीवरुन राजकीय वादंग पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांच पाटील (Chandrakanch Patil) यांनी माध्यमाशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान पाटील म्हणाले, गोव्यात राऊत महाराष्ट्राप्रमाणे (Maharashtra) महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याचा विफल प्रयत्न करत आहेत. गोव्यात शिवसेनेला 2016 मध्ये 792 मते मिळाली होती. तर 1.3 टक्के मते होती. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस 40 जागापैकी 16 जागा लढवल्या होत्या

तसेच, राऊत यांनी माध्यमाशी बोलताना म्हटले होते की, ''महाराष्ट्रात आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेससोबत सत्तेमध्ये आहोत. मात्र गोव्याबद्दल विचार करायचा झाल्यास अद्याप कॉंग्रेससोबत कोणत्याही स्वरुपात जागा वाटपाचा फॉर्म्युला झालेला नाही. यामध्ये पक्ष म्हणून त्यांच्या काही मर्यादा असतील तशाच आमच्याही काही मर्यादा आहेत. आम्ही गोव्यातील चाळीस जागांसाठी उमेदवारांची यादी तयार करत आहोत, त्यानुसार आम्ही निवडणुका लढवू. त्यासाठी 18 आणि 19 तारखेला अम्ही पुन्हा एकदा गोव्याला चाललो आहे. तेव्हा आम्ही उमेदवारांची यादीही जाहीर करु.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: गोव्याचं पर्यटन संपलं नाही वाढलं! पर्यटन मंत्र्यांनी थेट आकडेवारीच दिली, सोशल मीडियावरील दावे काढले खोडून

Goa Today's News Live: 19 वर्षीय युवकाच्या खूनप्रकरणी कांदोळी येथील तरुणाला अटक

Karvi Flowers: श्री गणेशाने हत्तीचे रूप घेतले, मुरुगन आणि वल्लीचे लग्न झाले; गोव्यात फुलणाऱ्या 'कारवी'चे महत्व

ड्रग्ज का दारुची नशा? झिंगलेल्या रशियन महिलेचा शिवोलीत भररस्त्यात राडा, वाहनं अडवली, पोलिसांशी घातली हुज्जत

Goa Rain: तुळशीच्या लग्नाला 'पावसाच्या' अक्षता? शेतकरी हवालदिल; ‘व्हडली दिवाळी’वर पावसाचे सावट

SCROLL FOR NEXT