Implement Code of Conduct in Goa after 5th January

 

Dainik Gomantak

गोवा निवडणूक

5 जानेवारीनंतर गोव्यात आचारसंहिता लागू करा

आज गोवा विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर देखरेख

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात (Goa) ख्रिसमस (Christmas) आणि नववर्षाच्या (New Year) स्वागतानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. शिवाय हा पर्यटन हंगामातील मुख्य काळ मानला जातो. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Election) आचारसंहिता 5 जानेवारीनंतरच लागू करावी, अशी विनंती विविध राजकीय पक्षांनी मुख्य निवडणूक आयोगाला (Goa Election Commission) केली आहे. आयोग दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहे. त्यांनी काल राज्य निवडणूक अधिकारी, विविध खात्याचे नोडल ऑफिसर आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत विविध विषयांवरची चर्चा केली.

राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींमध्ये भाजपचे (BJP) अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, गोवा फॉरवर्ड (Goa Forward) नेते दुर्गादास कामत, तृणमूल (TMC) आणि मगो (MGP) पक्षाचे प्रतिनिधी सहभागी होते. त्यांनी आयोगाला विविध सूचना आणि विनंती केल्या. यात नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताच्या कार्यक्रमांची माहिती आयोगाला देण्यात आली. निवडणुकीची (Goa Election) तारीख कोणत्याही सार्वजनिक सुट्टी किंवा धार्मिक कार्यक्रमांशी संलग्न होऊ नये, असेही आवाहन केले. मगो आणि तृणमूलने सरकारी विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरभरती होत असून यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर होणार नाही यासाठी आयोगाने दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे.

निवडणुकीच्या तयारीवर आज बैठका

22 डिसेंबर रोजी निवडणुकीच्या तयारीवर देखरेख

ठेवण्यासाठी मुख्य सचिव, गृह सचिव, पोलिस महासंचालक आणि इतरांसह राज्य सरकारच्या प्रतिनिधींसोबत बैठका होणार आहेत. इसीआय वेळापत्रकानुसार, विद्यमान राज्य सरकारचा कार्यकाळ 15 मार्च 2022 रोजी संपत आहे आणि त्याआधी नवीन सरकारला शपथ घ्यावी लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व आहे - सुलक्षणा सावंत

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT