गोवा विधानसभा निवडणुकीत भाजप सत्ता राखण्यात यशस्वी झाले तर त्याला कॉंग्रेस जबाबदार असले, असे आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे मत आहे. (Goa AAP News Update)
आम आदमी पार्टीच्या (AAP) नेत्यांनी अनेकवेळा आरोप केला आहे की, भाजपने त्यांच्या नेत्यांना कॉंग्रेसच्या टिकीटावर उभे केले आहे. याच मुद्द्यावर बोलताना केजरीवाल म्हणाले, भाजपने आपले लोक काँग्रेसमध्ये पाठवले आहेत, जे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवतील आणि निवडणुकीनंतर पुन्हा भाजपमध्ये येतील. भाजपने अनेक राज्यांमध्ये त्यांचे सरकार स्थापन करण्याची जबाबदारी काँग्रेसला दिली आहे.
गोव्यात केजरीवाल अन्य पक्षांबरोबर युती करणार का, असे विचारले असता त्यांनी उलट प्रश्न केला की, कोणासोबत युती करायची? गोव्याला काँग्रेसने (Congress) 25 वर्षे लुटले. भाजपने देखील गोव्याला लुटण्याशिवाय दुसरे काहीही केलेले नाही. लोकांनी आपला एक संधी द्यावी. सध्या सर्वच पक्षांच्या उमेदवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. आम्हाला जनतेने निवडून दिल्यास आम्ही गोव्याला प्रामाणिक सरकार देऊ, असे केजरीवाल म्हणाले.
केजरीवाल म्हणाले, सी-व्होटर सर्वेक्षणानुसार भाजपला 29% मते मिळतील, AAP ला 27% तर कॉंग्रेसला 18 ते 19% मतांवर समाधान मानावे लागेल. या आकड्यांवरून असे दिसते की, कॉंग्रेसला मत देऊन तुम्ही तुमचे मत वाया घालवत आहात. या आकडेवारीनुसार, भाजप (BJP) आणि आपच्या मतांच्या टक्केवारीत फक्त 2 टक्के मतांचा फरक आहे. लोकांनी मनावर घेतले तर आप नक्की सरकार स्थापन करेल, असा विश्वास अरविंद केजरीवाल यांनी दर्शवला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.