BJP  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa: मगोवासी झालेले प्रेमेंद्र शेट भाजपच्या जाळात?

भाजपकडून प्रस्ताव गतवेळच्या ‘फॉर्म्युल्या’ची शक्यता

दैनिक गोमन्तक

डिचोली: मये मतदारसंघात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या मतदारसंघात मोठ्या राजकीय उलथापालथी होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. आगामी निवडणुकीसाठी मये मतदारसंघातील भाजपची उमेदवारी विद्यमान आमदारांना की गेल्या वेळच्या ‘फॉर्म्युल्या’ची पुनरावृत्ती होवून अन्य चेहऱ्याला संधी मिळते. याबाबत राजकीय चर्च सुरू असतानाच मगोच्या ‘सिंहा’ला जवळ केलेले माजी सभापती स्व. अनंत शेट यांचे बंधू प्रेमेंद्र शेट हे भाजपच्या (BJP) जाळात अडकल्याची खात्रीलायक माहिती माहिती आहे. भाजपतर्फे देण्यात आलेला प्रस्ताव मान्य झाल्यास येत्या आठवड्यापर्यंत प्रेमेंद्र शेट भाजप प्रवेश करून स्वगृही परतण्याची शक्यता वाढली आहे. भाजपचे काही वरिष्ठ नेते प्रेमेंद्र शेट यांच्या संपर्कात असून, काही नेते प्रत्यक्ष भेट घेऊन प्रेमेंद्र शेट यांचे मन वळविण्याचे प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, भाजपकडून आपल्याला प्रस्ताव आल्याचे प्रेमेंद्र शेट यांनी मान्य केले आहे. मात्र, अद्याप आपण अंतिम निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसे झाल्यास मयेतील भाजपचे विद्यमान आमदार प्रवीण झांट्ये यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहणार आहे.

‘मगोप’पुढे पेच...

पूर्वाश्रमीचे भाजप कार्यकर्ते असलेले आणि गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपपासून हळूहळू दूर झालेले प्रेमेंद्र शेट यांनी गेल्या नोव्हेंबर महिन्याच्या 11 तारखेला शेकडो समर्थकांसह शक्तीप्रदर्शन करीत मगो पक्षात रीतसर प्रवेश केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मये मतदारसंघातून प्रेमेंद्र शेट यांना मगोची उमेदवारीही जाहीर झालेली आहे. आता ते भाजप प्रवेश करण्याच्या वाटेवर असल्याने मगो नेत्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मगो नेत्यांकडून प्रेमेंद्र शेट यांचे मन वळविण्याचे प्रयत्नही झाल्याची माहिती मिळाली आहे. प्रेमेंद्र शेट यांनी मये जिल्हा पंचायत मतदारसंघातून गेली जिल्हा पंचायत निवडणूक लढवली होती. मात्र विजयाने त्यांना हुलकावणी दिली. त्यानंतर त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे.

गत वेळचा ‘फॉर्मुला’

2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी (election) भाजपने वेगळा ‘फॉर्मुला’ वापरला होता. मये मतदारसंघातून भाजप उमेदवारीवर सलग दोनवेळा निवडून आलेले तत्कालीन सभापती स्व. अनंत शेट यांना बाजूला करून भाजपने प्रवीण झांट्ये यांना उमेदवार म्हणून पुढे केले. भाजपची ती चाल यशस्वीही ठरली होती. येत्या निवडणुकीतही भाजपने गतवेळचा ‘फॉर्मुला’ वापरण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी विद्यमान आमदारांना डावलून प्रेमेंद्र शेट यांना भाजपची उमेदवारी देण्याचा विचार केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT