Chief Minister Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Assembly Election: 'मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केला'

भाजप (BJP) कार्यकर्ते कोविड निर्बंध न पाळता घोळक्याने प्रचार करत असल्यावचेही निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिले आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोव्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली असतानाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि रवींद्र भवन मडगावचे अध्यक्ष दामू नाईक (Damu Naik) यांनी रवींद्र भवनमध्ये आयोजित केलेल्या युवा सन्मान पुरस्कार विचारणाला उपस्थिती लावून आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार गोवा फॉरवर्डने (Goa Forward) केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. दरम्यान सायंकाळी उशिरा केलेल्या आणखी एका तक्रारीत भाजप कार्यकर्ते कोविड निर्बंध न पाळता घोळक्याने प्रचार करत असल्यावचेही निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिले आहे.

दरम्यान निवडणूक आयोगाने पहिल्या तक्रारीची दखल घेत कला व संस्कृती खात्याच्या संचालकांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. जर या तक्रारीत तथ्य आढळून आल्यास योग्य ती कारवाई करावी असे सहाय्यक निवडणूक अधिकारी संगीता नाईक यांनी या आदेशात म्हटले आहे.

काल युवा दिना निमित्ताने रवींद्र भवनमध्ये युवा सन्मान पुरस्कार देण्याचा सोहळा आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते. त्यांनी यावेळी पुरस्कार वितरणही केले होते. या कार्यक्रमाला दामू नाईक हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे फोटो आणि मुख्यमंत्री सावंत यांनी केलेल्या ट्विटच्या प्रती लावून निवडणूक आयोगाकडे दुर्गादास कामत यांनी तक्रार केली होती. रवींद्र भवनच्या सदस्य सचिवांवरही कारवाई करावी अशी मागणी केली होती.

दरम्यान आज सायंकाळी उशिरा फातोर्डा मतदारसंघात भाजप कार्यकर्ते 12 - 13 कार्यकर्त्यांचा घोळका करून प्रचार करत असल्याची तक्रार दाखल केली. प्रचार करताना पाचपेक्षा अधिक कार्यकर्त्याना घेऊन फिरण्यास निवडणूक आयोगाने मनाई केलेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT