Digambar Kamat

 

Dainik Gomantak 

गोवा निवडणूक

Goa Election:'काँग्रेसचे स्थिर सरकार स्थापन करण्यात मडगावकरांची भूमिका निर्णायक'

मी माझ्या मडगावकर वासियांना आवाहन करतो की, मला सलग आठव्यांदा मडगावचे प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी केले.

दैनिक गोमन्तक

मडगाव: मडगावकारांनी (Margao) राज्याच्या सर्वांगीण विकास आणि प्रगतीसाठी नेहमीच योगदान दिले आहे. या वेळी 2022 मध्ये काँग्रेसचे स्थिर सरकार स्थापन करण्यात मडगावकर आपली निर्णायक भूमिका बजावतील. मी माझ्या मडगावकर वासियांना आवाहन करतो की, मला सलग आठव्यांदा मडगावचे प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी केले.

पिंपळकट्टा येथे मडगाव मतदारसंघाचे काँग्रेसचे (congress) उमेदवार म्हणून आपल्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी देव दामोदर चरणी नारळ अर्पण केल्यानंतर आपल्या शेकडो समर्थकांना संबोधित करताना ते बोलत होते. स्वातंत्र्यसैनिक वामन प्रभुगावकर, मडगावच्या उप-नगराध्यक्ष दिपाली सावळ, दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ज्यो डायस, नगरसेवक दामोदर शिरोडकर, लता पेडणेकर, सँड्रा फर्नांडिस, सगुण नाईक, सिद्धांत गडेकर आणि दामोदर वरक, माजी नगरसेवक अविनाश शिरोडकर, मनोज मसुरकर, गुरुनाथ लाड, ज्येष्ठ पत्रकार अनिल पै, डॉ.जयेश कुडचडकर आदींसह समर्थक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मडगाव शहराच्या विकासासाठी मी नेहमीच अथक परिश्रम घेतले आहेत. मडगावला अत्याधुनिक शहरात रूपांतरित करण्यासाठी मला तुमच्या पाठिंब्याची आणि आशीर्वादाची गरज आहे असे दिगंबर कामत म्हणाले, मी विविध प्रकल्प पूर्ण केले आहेत आणि अनेक प्रकल्प होण्याच्या मार्गांवर आहेत. त्यांनी गोव्यातील (Goa) जनतेला “समृद्धीचे सरकार” परत आणण्यासाठी आणि “गरिबीचे सरकार” आणणाऱ्या भाजप सरकारची (bjp government) राजवट संपवण्यासाठी राज्यभरातील काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

आगामी विधानसभा निवडणूक दिगंबर कामत जिंकून इतिहास घडवतील यात शंका नाही. ते तळागळातून राजकारणात आले आहेत आणि सामान्यांसाठी नेहमीच सहज उपलब्ध राहिले आहेत. गेली सात टर्म ते माझ्या मडगाव शहराचे आमदार आहेत याचा मला अभिमान आहे, असे प्रतिपादन मडगाव नगरपालीकेचे माजी नगराध्यक्ष अजित हेगडे यांनी केले.

2007 ते 2012 पर्यंत गोव्यात दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखाली लोकाभिमुख सरकार होते. त्यांनी लोकांच्या हितासाठी विविध प्रकल्प आणि योजना सुरू केल्या. गोव्याच्या अस्मितेचे रक्षण करण्यासाठी त्यांनी नेहमीच काम केले आणि लोकांच्या भावना आणि संवेदनांचा आदर केला. मी मडगांवकरांना आवाहन करतो की, येत्या विधानसभा निवडणुकीत (Goa Election) दिगंबर कामत यांना प्रचंड विजय मिळवून द्या आणि गोव्याचे नेतृत्व करण्याची त्यांना संधी द्या असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अनिल पै यांनी उपस्थितांना संबोधित करताना केले.

माजी नगरसेवक दामोदर शिरोडकर यांनी सूत्रसंचालन केले तर अविनाश शिरोडकर यांनी आभार मानले. आशा कामत, कुंकळ्ळी गट काँग्रेसचे अध्यक्ष असिस नोरोन्हा, सावियो मास्कारेन्हस, अमिना शेख, अमित पिंटो, नसिमा शेख शिरोडकर, बुश मिरांडा आणि इतर प्रमुख नागरिकही या प्रचार शुभारंभ कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोमंतकीय संस्कृतीने सजला IFFI 2024! आकाशकंदील स्पर्धा, शिगमा-कार्निव्हल परेडला भरघोस प्रतिसाद

महिलेच्या खासगी जागी बोट लावणे लैंगिक अत्याचार होत नाही; गोवास्थित मुंबई हायकोर्टाचा निर्णय, संशयिताला जामीन

Nagarjuna At IFFI: 'त्यांचे उद्दिष्ट होते की तेलुगु चित्रपट सृष्टीला दखल घेण्याजोगी..', नागार्जुनने जागवली वडिलांची हृदयस्पर्शी आठवण

Calangute Baga: उत्तर गोव्यातील प्रसिद्ध भाग दाखवला रेड लाईट एरिया; Youtuber ने हात जोडून मागितली माफी

Goa Today's News Live: कळंगुटमध्ये रस्त्यावर नग्न होऊन राडा करणाऱ्या UP च्या पर्यटकाला अटक

SCROLL FOR NEXT