Goa BJP Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa BJP: भाजपच्या उमेदवार यादीमुळे बंडखोरीला आमंत्रण?

भाजपमध्येही आता ‘फॅमिलीराज’ विकसित होत असल्याचे स्पष्ट झाले आहे

दैनिक गोमन्तक

Goa BJP: अखेर भाजपने आपली पहिली 34 उमदेवारांची यादी जाहीर केली. त्यात तसे विशेष नसले तरी या यादीने बंडाला निमंत्रण दिल्याचे स्पष्ट होत आहे. मांद्रेत दयानंद सोपटेंना (Dayanand Sopate) उमेदवारी दिल्यामुळे गेल्या कित्येक दिवस देव पाण्यात ठेवून बसलेले माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांना निराश व्हावे लागणार आहे.

माजी आमदार गणेश गांवकर यांना सावर्डेची ‘लॉटरी’ लागली आहे. पाऊसकरांना तिथे बऱ्यापैकी पाठिंबा असल्यामुळे त्यांच्या व गावकरांच्या संघर्षात मगोपचे बालाजी गावकर हे बाजी मारण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काणकोणात उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांना डावलून माजी मंत्री रमेश तवडकर यांना उमेदवारी दिली आहे. इजिदोर हे मूळचे कॉंग्रेसचे (Congress) असल्यामुळे त्यांचे बहुतेक कार्यकर्ते कॉंग्रेसचेच आहेत. त्यामुळे त्यांच्या बंडाचा भाजपवर विशेष परिणाम होईल, असे वाटत नाही. पण आदिवासी उमेदवार देऊन भाजपने (BJP) आदिवासींना आपल्या बाजूला वळविण्याचा प्रयत्न केला आहे. तीच गोष्ट प्रियोळची. तेथे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांना उमेदवारीच्या बोहल्यावर चढवून उद्योजक संदीप निगळ्ये यांच्या हातात ‘नारळ’ दिला आहे. निगळ्येंच्या कार्यकर्त्यांनी आधीच राजीनामा दिला असल्यामुळे त्यांची आता काय भूमिका असेल हे बघावे लागेल. पण तिथे निगळ्ये अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्यास लढतीला एक वेगळीच धार येण्याची शक्यता आहे.

फोंड्यात माजी मुख्यमंत्री रवी नाईक (Ravi Naik) यांना भाजपची उमेदवारी दिल्यामुळे कुर्टी-खांडेपारचे माजी सरपंच संदीप खांडेपारकर हे ‘एल्गार’ पुकारणार, हे निश्चित झाले आहे. पण त्यांच्या उमेदवारीचा फटका भाजपपेक्षा मगोपला (MGP) जास्त बसू शकतो, असे दिसते. पणजीत उत्पल पर्रीकरांना नजरअंदाज करून विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात (Babush Monserrat) यांना उमेदवारी दिली आहे. गेले कित्येक दिवस बंडाचे नगारे वाजवूनसुध्दा उत्पलना डावलल्यामुळे समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सगळ्यांच्या नजरा लागलेल्या सांगे मतदारसंघात भाजपने आपला कौल माजी आमदार सुभाष फळदेसाई यांच्या पारड्यात टाकला आहे. त्यामुळे आता बाबू कवळेकरांच्या पत्नी प्रक्षुब्ध होणे साहजिकच आहे. त्यांची बंडखोरी भाजपला महागात पडू शकेल, असे चित्र दिसते.

कुंभारजुवे, सांताक्रुझ, कळंगुट अधांतरीच. त्याचबरोबर कुंभारजुवेत पांडुरंग मडकईकर वा त्याची पत्नी की श्रीपाद नाईक पुत्र सिध्देश यांचा निकाल अजून लागलेला नाही. सांताक्रुझमधील

बाबूश मोन्सेरात पुरस्कृत आग्नेल डिकुन्हा की विद्यमान आमदार टोनी फर्नांडिस हेही अजून स्पष्ट झालेले नाही. कळंगुटमध्ये तीच परिस्थिती असून तिथे गुरुदास शिरोडकर किंवा रिकार्डो हे ठरलेले दिसत नाहीत.

घराणेशाहीला खतपाणी

भाजपमध्येही आता ‘फॅमिलीराज’ विकसित होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. वाळपई आणि पर्येत विश्वजीत आणि त्यांची पत्नी डॉ. दिव्या, पणजीत बाबूश तर ताळगावात त्यांची पत्नी जेनिफर ही उदाहरणे या ‘फॅमिलीराज’ची साक्ष पटवायला पुरेशी आहेत. मग मायकल लोबोंनी काय घोडे मारले होते असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवोलीत त्यांची पत्नी दिलायला यांना उमेदवारीस भाजपने नकार दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

SCROLL FOR NEXT