Goa BJP Utpal Parrikar  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa BJP: उत्पल यांनी पुन्हा भाजपत यावं

दैनिक गोमन्तक

पणजी: भारतीय जनता पक्षाचे (भाजप) गोव्याचे प्रभारी सरचिटणीस सी टी रवी यांनी उत्पल पर्रीकर यांना विधानसभा निवडणूक लढवण्याच्या आणि भगव्या पक्षात पुन्हा प्रवेश करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. (Goa BJP urges Utpal Parrikar to reconsider his decision)

मात्र उत्पल पर्रीकरांनी Utpal Parrikar अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. राज्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीसपासून ते जे.पी नड्डा J.P. Nadda यांच्या पर्यन्त सर्वानी पर्रीकरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पर्रीकर अद्याप आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. आज संध्याकाळपर्यंत भाजप उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होणार आहे. दरम्यान पर्रीकरांचे मतपरिवर्तन करण्यात भाजपचे नेते यशस्वी होतील का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.

एका ट्विटमध्ये रवी म्हणाले, “मनोहर पर्रीकर Manohar Parrikar जी यांनी नेहमीच भाजपच्या विजयासाठी काम केले आहे. मी त्यांचा मुलगा उत्पल पर्रीकर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे. केवळ भाजपच लोकांना स्थिर सरकार देऊ शकतो.

रवी यांनी असेही जाहीर केले की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी, 30 जानेवारी रोजी गोव्याला भेट देतील आणि 14 फेब्रुवारी रोजी होणार्‍या गोवा विधानसभा निवडणुका Goa Assembly Election लढवणार्‍या भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी येतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: पणजीत मांडवी पुलावर पुन्हा अपघात, तिघेजण जखमी

Colva Crime: कोलव्‍यात पुन्हा राडा! पार्टीतील वादातून लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण; अर्धमेल्‍या युवकाला बाणावलीत सोडले

हॉटेलमध्ये झाली मैत्री, लग्नाचे आमिष देऊन केला लैंगिक अत्याचार; गोव्याच्या तरुणाला छत्तीसगड येथे अटक

Goa Dairy: ..अन्यथा संप पुकारु! थकीत महागाई भत्त्यासोबत इतर मागण्यांवरुन 'गोवा डेअरी’च्या कामगारांचा इशारा

Cutbona Jetty: 'मतदारसंघात आम्हालाच बोलावले जात नाही!' कुटबणबाबत क्रुझ सिल्वांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT