Goa Assembly Election Dainik Gomantak
गोवा निवडणूक

सासष्टी तालुक्यातील मतदारसंघात भाजपची मात्रा चालली नाही

आताच्या निवडणुकीत चित्र बदललेले दिसत असून हा तालुका सर करण्यासाठी काँग्रेसला बरेच कष्ट उपसावे लागत आहेत

दैनिक गोमन्तक

मडगाव: सासष्टीवरच नेहमी काँग्रेसची मदार असते. 2017 च्या निवडणुकीत या तालुक्यात येणाऱ्या आठपैकी एकाही मतदारसंघात भाजपची मात्रा चालली नाही. आठपैकी सहा मतदारसंघ काँग्रेसने सर केले परिणामी काँग्रेस आमदारांची संख्या राज्यात 17 वर पोहोचली. या तुलनेत आताच्या (2022) निवडणुकीत चित्र बदललेले दिसत असून हा तालुका सर करण्यासाठी काँग्रेसला बरेच कष्ट उपसावे लागत आहेत. यावेळी हे मतदारसंघ सर करण्यासाठी तृणमूल, आप, राष्ट्रवादी आणि अपक्ष उमेदवारांना टक्कर देण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे. (Goa bjp is weak in Salcete for assembly election)

यावेळी निवडणुकीत काँग्रेस (Congress) आणि गोवा फॉरवर्डची (Goa Forward) युती असून मडगाव, फातोर्डा आणि कुंकळ्ळी या तीन ठिकाणी या युतीला भाजप विरोधात संघर्ष करावा लागत आहे. मडगावात दिगंबर कामत यांच्या विरोधात भाजपचे बाबू आजगावकर यांनी जबरदस्त आव्हान उभे केले आहे.फातोर्ड्यात गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई आणि भाजपचे दामू नाईक यांच्यात कांटे की टक्कर आहे. कुंकळ्ळीतही काँग्रेसचे युरी व भाजपचे क्लाफास यांच्यात लढत आहे. या तिन्ही मतदारसंघात तृणमूल (Goa TMC) कुणाची मते फोडणार त्यावर निकाल लागणार आहे. फातोर्डा येथे सिओला वाझ, मडगावात महेश आमोणकर तर कुंकळ्ळीत डॉ. जॉर्सन फेर्नांडिस हे तृणमूलचे उमेदवार आहेत.

बालेकिल्ले राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान

वेळ्ळी, नुवे आणि कुडतरी हे खरे तर काँग्रेसचे बालेकिल्ले. मात्र, यावेळी या तिन्ही मतदारसंघात तिरंगी लढत अपेक्षित असल्याने येथे काँग्रेसचाच विजय होणार असा तर्क काढल्यास ते धोक्याचे ठरेल. वेळ्ळीत काँग्रेसच्या सावियो डिसिल्वा यांना फिलिप नेरी रोड्रिग्स (राष्ट्रवादी) व बेंजामिन सिल्वा (तृणमूल), नुवेत काँग्रेसचे आलेक्स सिक्वेरा याना मिकी पाशेको (राष्ट्रवादी) आणि बाबाशान डीसा (अपक्ष) तर कुडतरीत काँग्रेसचे मोरेन रिबेलो यांच्यासमोर आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स (अपक्ष) आणि डॉमनिक गावकर (आप) यांचे जबरदस्त आव्हान उभे आहे.

सुशांत कुंकळयेकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT