Goa Election | Goa assembly election 2022 results News Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Assembly Election: गोव्यात कोण बाजी मारणार, आज होणार फैसला

आयोगाने केलेल्या तयारीवरून दुपारी 12 पूर्वी निकाल जाहीर होणार असून सत्तेची गणिते स्पष्ट होतील.

दैनिक गोमन्तक

पणजी: सर्वांचे लक्ष आणि उत्सुकता लागलेला दि. 10 मार्चचा दिवस आज उजाडला आहे. 14 फेब्रुवारीला 8 व्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. मात्र, त्यानंतर आज 24 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर 301 उमेदवारांच्या भवितव्याचा पेटारा खुलणार आहे. यंदा विधानसभेच्या सर्व 40 ही जागांची मतमोजणी आज गुरुवारी एकाच वेळी सकाळी 8 वाजता होत असून 301 उमेदवारांचे पुढील 5 वर्षांचे भवितव्य स्पष्ट होणार आहे. आयोगाने केलेल्या तयारीवरून दुपारी 12 पूर्वी निकाल जाहीर होणार असून सत्तेची गणिते स्पष्ट होतील. त्यानंतर सत्ता कोणाकडे याचा फैसला होणार आहे. (Goa assembly election 2022 results news updates)

निवडणूक निकालानंतर सत्ता स्थापण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी गेला महिनाभर सुरू ठेवले आहेत. या दोन्ही पक्षाने सत्तेचा दावा केला आहे. आता यासाठीची अंतिम फेऱ्या सुरू आहेत. यासाठी सर्वच राजकिय पक्षाचे वरिष्ठ नेते गोव्यात (Goa) दाखल झाले आहेत. दुसरीकडे काँग्रेसचा सत्ता मिळवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू केले असून आपल्या सर्व उमेदवारांना पणजी जवळच्या रिसॉर्टमध्ये बोलवत बैठक घेतली. यासाठी प्रभारी दिनेश गुंडू राव ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम दोन दिवसांपासूनच राज्यात आले आहेत.

यांच्या जोडीला आता संकटमोचक म्हणून प्रसिद्ध असणारे कर्नाटकच्या काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष रिसॉर्ट फेम डी.के. शिवकुमार यांना सर्वशक्तीनिशी पाठवले आहे. त्यांनी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत आणि प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना घेऊन उमेदवारांची चर्चा करून काँग्रेस सत्ता स्थापन करणारच असा दावा केला आहे. संध्याकाळी या सर्व उमेदवारांना बांबोळी येथून मडगावला हलविण्यात आले मडगावात एका हॉटेलमध्ये या उमेदवारांची दुसरी बैठक झाली. दरम्यान, ज्येष्ठ नेते मनोहर पर्रीकरांच्या (Manohar Parrikar) अनुपस्थितीमध्ये गोव्यातील रणसंग्रामाला सामोरे जाणाऱ्या भाजपला यावेळी येथे सत्ता राखताना तारेवरची कसरत करावी लागेल असे दिसते. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसप्रमाणेच आप आणि तृणमूल काँग्रेसच्या एंट्रीमुळे गोव्यामध्ये ‘काँटे की टक्कर’ पाहायला मिळेल. गोव्याचा किनारा सांभाळताना भाजपची मात्र मोठी दमछाक होणार असे दिसते.

अशी होणार मतमोजणी प्रक्रिया

सकाळी 8 वाजता बॅलेट मतमोजणीला सुरवात होईल.

8:15 वाजता स्ट्राँगरूममधून ईव्हीएम मशीन केंद्रावर हलवण्यात येतील.

प्रत्यक्ष मतमोजणी 8:30 वाजता सुरू होईल. मतदारसंघाच्या रचनेवरून 6 ते 11 फेऱ्या होतील.

उत्तर गोव्यात सर्वाधिक फेऱ्या पेडणे मतदारसंघात 11 तर सर्वात कमी पणजी मतदारसंघात 6 फेऱ्या होणार आहेत.

एक्झिट पोलमुळे अपक्ष उमेदवारांचा बोलबाला

विविध संस्थांच्या जनमत चाचण्यांच्या आधारे गोव्यात त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईल असे भाकीत केल्याने छोटे पक्ष आणि अपक्षांना महत्त्व प्राप्त झाले आहे. यात आप, मगो पक्ष, तृणमूल काँग्रेस यांच्यासह अपक्षांचा समावेश आहे. काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी या संभाव्य निवडून येणाऱ्या उमेदवारांसह छोट्या पक्षांच्या नेत्यांशीही चर्चा करत आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम, दिनेश गुंडू राव यांनी मगोपचे सुदिन ढवळीकर, दीपक ढवळीकर यांच्याशी चर्चा करून सत्तेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यावर निवडणूकपूर्वी आघाडी केलेल्या तृणमूल काँग्रेसबरोबर चर्चा करून याबाबतचा निर्णय जाहीर केला जाईल असे ढवळीकर यांनी सांगितले. तर मगोप भाजपसोबत जाणार नसून आपणाला शब्द दिल्याचे चिदंबरम यांनी सांगितला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India GDP Growth: भारताची अर्थव्यवस्था सुसाट...! दुसऱ्या तिमाहीत GDP वाढ 8.2 टक्क्यांनी मजबूत, आर्थिक विश्लेषकांचे चुकले अंदाज

सात राजवंशांनी राज्य केलं, पण संस्कृती टिकली! गोव्याचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी मठांचं कार्य महत्त्वाचं; CM सावंतांचं प्रतिपादन

Shani Margi 2025: कर्मफल दाता शनीची चाल 138 दिवसांनंतर बदलली! 'या' 5 राशींच्या लोकांना होणार मोठा धनलाभ, नोकरीत बढतीचाही योग

Asia's Tallest Ram Statue in Goa: ऐतिहासिक क्षण! PM नरेंद्र मोदींच्या हस्ते आशियातील सर्वात उंच 'श्रीरामांच्या मूर्ती'चं अनावरण Watch Video

IND vs SA, 1st ODI: रोहित-कोहलीची जोडी रचणार नवा इतिहास! मैदानात उतरताच मोडणार सचिन-द्रविडचा रेकॉर्ड; बनणार नंबर-1 भारतीय जोडी

SCROLL FOR NEXT