गोवा विधानसभेच्या (Goa Assembly Election) 40 जागांसाठी आज मतदान होत आहे. ह्या जागांसाठी 301 उम्मीदवार उभे आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, पणजी मध्ये 22,408 राजकीय मतदाता आहेत, ज्यामध्ये 10,531 पुरुष आणि 11,877 महिला आहेत. किनारी राज्यामध्ये एकाच टप्प्यातील निवडणुकीसाठी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आणि संध्याकाळी 6 वाजता गोव्यातील मतदान संपणार आहे. (Goa Assembly election 2022 Voting Day Live Updates)
गोव्यात मतदानाचा धडाका; सायंकाळी 5 वाजेपर्यंत 75.29 टक्के मतदान पार पडले. गोव्यात यंदा 2017 ची मतदानाची टक्केवारी 82% च्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी गोव्यात ‘पिंक’ बुथ संकल्पना राबविण्यात आली. हिमाचल प्रदेशानंतर ही संकल्पना राबविणारे गोवा हे दुसरे राज्य ठरले आहे. यावेळी महिलांनी गुलाबी रंगाचे कपडे घालून मतदान केले आणि त्यासोबत व्हॅलेंटाइन डे साजरा केला.
मडगाव मोतीडोगर येथील मतदान केंद्रावर आज सकाळी बाबू आजगावकर हे दिगंबर कामत समर्थकांविरूध्द तक्रार करताना दिसत असून पोलिसांनी तेथील लोकांना बाहेर काढले. यावेळी या भागातील वारावरण काही काल तणावग्रस्त होते.
मडगाव नगरपालिका कार्यालयात मतदार केंद्रावर मतदान करून हे जोडपे वेलेन्टन डे साजरे करण्यात मग्न.
पणजीचे माजी महापौर उदय मडकईकर यांनी मतदान केल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली.
काँग्रेस प्रवक्ता अमरनाथ पणजीकर यांनी मतदान केल्यानंतर प्रतिक्रिया दिली
तृणमूल काँग्रेसच्या नावेली मतदारसंघाच्या उमेदवार वालंका आलेमाव यांच्या दोन बहिणी मतदारांना आमिष दाखविण्यासाठी पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
तृणमूलला गोव्यात हिंदू मतांचे विभाजन करायचे आहे: पंतप्रधान मोदी
गोवावासीय टीएमसी-एमजीपीच्या हिंदू मतांमध्ये फूट पाडण्याच्या हेतूला थारा देणार नाही-मुख्यमंत्री प्रमोद सावंत
गोव्यात 3 वाजेपर्यंत 60.18 टक्के मतदान. राज्यात अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा.
पर्वरी मतदारसंघातील बूथ क्रमांक 30 ला गोवा निवडणूक अधिकाऱ्यांनी भेट दिली. दत्ता राम नाईक यांनी आपल्या मुलीसह बीएलओ बूथला नैसर्गिक साहित्याने सुंदर सजावट केली आहे.
माजी पर्यावरण मंत्री आणि भाजपचे उमेदवार नीलेश काब्राल यांनी मतदान केले
नावेली मतदारसंघातील आम आदमी पक्षाच्या उमेदवार प्रतिमा कुतिन्हो यांनी मतदान करून सर्वांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या.
सारे जग आज प्रेमाचा दिवस साजरा करत असतांना गोव्यातील तरूणाई मात्र मतदान करण्याचे आपले कर्तव्य बजावाण्यात व्यस्त आहे. गोव्यात आज आणि उद्या सुट्टी असून ऐन व्हॅलेंटाईन डे ला राज्यात ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यानंतर 25 वर्षीय ट्रान्सजेंडर मतदार मधु गुप्ता यांनी पहिल्यांदाच मतदान केले.
गोव्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 44.63 टक्के मतदान झाले
कळंगुट मतदारसंघातील काँग्रेस नेते आणि उमेदवार यांनी त्यांच्या पत्नीसह मतदान केले
गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी मतदान केले
डिचोली मतदारसंघात मतदान सुरळीतपणे चालू असताना अचानक तांत्रिक कारणामुळे EVM मशिन बंद पडले. त्यामुळे सुमारे 15 मिनट मतदान बंद होते. त्यामुळे मतदारांच्या केंद्रावर रांगा लागल्या.
गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिगंबर कामत यांनी मडगाव येथे मतदान केले.
म्हापसाचे काँग्रेस उमेदवार सुधीर कांदोळकर यांनी मतदान केल्यानंतर आपले मत व्यक्त केले
भ्रष्टाचाराला पराभूत करण्यासाठी गोव्यातील लोक उत्साहाने मतदान करत आहेत, आम्ही परिवर्तनाचे साक्षीदार होऊ; 10 मार्चच्या निकालाची वाट पाहू: आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री उमेदवार अमित पालेकर
'मला नीट बोलताही येत नाही, चालताही येत नाही पण माझा उमेदवार जिंकावा,' असे म्हापसा येथील ज्येष्ठ नागरिक सुशीला बांदेकर म्हणाल्या, “मी ज्या उमेदवाराला मतदान केले त्याला जास्तीत जास्त मते मिळतील आणि तोच सत्तेवर येईल, हीच माझी इच्छा आहे.
मगो नेते सुदिन ढवळीकर आणि दीपक ढवळीकर यांनी आपल्या कुटुंबियासोबत मतदान केले.
तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराच्या भावाने मुस्लिम बांधवांना ‘घाटी’ म्हटल्याने नावेलीतील हाऊसिंग बोर्ड परिसरात तणाव. गर्दी हटवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज.
मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत गोव्यातील काही मतदान केंद्रांवर BLOs कडून मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
गोव्यात सकाळी 11 पर्यंत 26.63 टक्के मतदान झाले. सकाळच्या सत्रात धिमे मतदान झाल्याने दक्षिण गोव्यात सरासरी 20 टक्क्यांच्या आसपास मतदान झाले असून सर्वात जास्त धिमेपणा सासष्टी तालुक्यात दिसून आला. येथे 15 टक्क्यांच्या आसपास मतदान झाले होते.
बाबुश आणि जेनिफर मोन्सेरात यांनी मतदानाचा हक्क बजावला.
फोंडा मतदारसंघातील आपचे उमेदवार सुरेल तिळवे यांनी मतदान केले.
भाजपचे आमदार दयानंद सोपटे आणि प्रवीण आर्लेकर यांनी मतदान केले. दोन्ही जागा भाजपच जिंकणार, असे पेडणे तालुक्यातील मांद्रे या मतदार संघातून ते बोलत होते.
फोंडा मतदारसंघाचे भाजप उमेदवार रवी नाईक मतदान केल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
मांद्रे मतदारसंघातील मतदान केंद्रावर रांगेत मतदार उभे आहेत
गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मतदान केले. हि निवडणूक निर्णायक झाली असून प्रथमच मांद्रे मतदार संघातून अपक्ष उमेदवार विजयी होणार असल्याचे पार्सेकर म्हणाले.
साखळी मतदारसंघात खाजन चावडी भागात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बूथला भेट देऊन उपस्थित नागरिकांची चौकशी केली.
निवडणूक प्रचार संपल्यानंतर आता मतदानाची वेळ आली आहे. लोकांना मतदान करण्यासाठी प्रेरित करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आज मी माझा सर्वात प्रतिष्ठित हक्क बजावला आणि माझे मत दिले. मी माझ्या गोवावासियांना आवाहन करतो की तुम्ही मतदानाचा हक्क बजावा आणि विजयात सहभागी व्हा-सदानंद शेट तानावडे
अमित पालेकर आणि त्यांची आई ज्योती पालेकर यांनी सांताक्रूझ मतदारसंघातून मतदान केले. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी फोन करून शुभेच्छा दिल्याचे त्यांनी सांगितले. बहुमत मिळेल असा विश्वास पालेकर यांनी व्यक्त केला.
गोव्यात तरूण पिढी बजावत आहेत पहिल्यांंदा मतदानाचा हक्क
म्हापसाचे भाजप उमेदवार जोशुआ डिसूझा यांनी मतदानाचा हक्क बजावला
गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी मये विधानसभा मतदारसंघातील बूथ क्रमांक 42, GPS विठ्ठलापूर कारापूर प्राथमिक शाळेत मतदान केले.
गोव्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 11.04 टक्के मतदान
मी कोठंबी गावात माझे मत दिले आहे. मी जनतेला आवाहन करतो की, मतदानासाठी मोठ्या संख्येने यावे. भाजप सरकारचे काम सर्वांसमोर आहे. उत्पल पर्रीकर (अपक्ष) आणि मायकल लोबो (काँग्रेस) जिंकणार नाहीत, कारण भाजप बहुमताने विजयी होणारआहे: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मतदानाचा हक्क बजावला
लोक मतदारसंघासाठी नाही तर गोव्यासाठी मतदान करतात. जेव्हा आपण गोव्याबद्दल बोलतो, तेव्हा आपण बेरोजगार असलेल्या मुला-मुलींबद्दल, गेल्या 10 वर्षांपासून बंद असलेल्या खाणकामाबद्दल, पर्यटन उद्योगातील समस्यांबद्दल बोलतो. जनता भविष्यासाठी मतदान करणार असे मत कळंगुट येथील काँग्रेसचे उमेदवार मायकल लोबो यांनी व्यक्त केले.
आज माझ्या सर्व गोव्यातील मित्रांनो, विकास निवडा म्हणत, प्रियंका गांधा यांनी गोव्यातील जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि त्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांनी श्री रुद्रेश्वर देवस्थानात मतदानदिनी प्रार्थना केली.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे वडील माजी ZP सदस्य पांडुरंग सावंत यांनी मतदान केले.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी पणजीतील मतदान केंद्रांना भेट दिली. पणजी मतदार संघातून अपक्ष उमेदवार उत्पल पर्रिकर यांनी मतदान केले. गोव्यातील जनता मताच्या आधारे बोलणार असे उत्पल पर्रीकर यावेळी म्हणाले.
स्वातंत्र्यसैनिक प्रभाकर सिनारी मतदानाच्या रांगेत
कुठ्ठाळी विधानसभा मतदारसंघात या मतदाराने पहिल्यांदाच मतदान केले
गोविंद गावडे यांनी आज सकाळी मतदान केले
संपूर्ण उत्तराखंड, गोवा आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात मतदान होणार आहे. आज जे मतदान करण्यास पात्र आहेत त्यांना मी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आणि लोकशाहीचा सण बळकट करण्याचे आवाहन करतो.-मोदी
गोवा विधानसभेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. आज सकाळी गोव्याचे राज्यपाल पीएस श्रीधरण पिल्लई यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. यावेळी गोवा विधानसभा निवडणूक ही पारदर्शकपणे पार पडत असल्याचे मत व्यक्त केले.
गोवा विधानसभेसाठी आज मतदान पार पडत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. आज सकाळी सात वाजता दोना पावला येथील ताळगाव मतदार संघातील मतदार केंद्र 15 इथे गोव्याचे राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई आणि त्यांची पत्नी ऍड.रिता श्रीधरन यांनी मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी माध्यमांशी बोलताना राज्यपाल यांनी, गोवा निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पार पडत आहे. सर्व ठिकाणी सुरक्षित आणि सुरळीतपणे मतदानाला सुरुवात झाली असून गोव्यातील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे असे आव्हान केले.
आज सकाळी पंतप्रधान मोदी यांनी मला फोन करून शुभेच्छा दिल्या. मला पूर्ण विश्वास आहे की भाजप गोव्यात 22+ जागा जिंकेल. भाजपने 10 वर्षात पायाभूत सुविधांचा विकास केला आणि पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर दृष्टीचा आम्हाला 100% बहुमताचा नक्कीच फायदा होईल असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.
हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी वास्को द गामा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक 7 वर मतदान केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.