Full preparation for counting of votes by Goa Constituency Commission  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

गोवा मतदारसंघ आयोगाकडून मतमोजणीची पूर्ण तयारी

‘थ्री टायर’ सुरक्षा: स्ट्राँगरूममधून टनेल मार्फत येणार ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅड

दैनिक गोमन्तक

पणजी: विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक असून मतमोजणीसाठीची तयारी पूर्ण झाली आहे. स्ट्राँगरूम ते मतमोजणी केंद्रापर्यंत निवडणूक आयोगाने स्वतंत्र टनेल उभारला असून मतमोजणीच्या दिवशी स्ट्रॉँगरूममधून या टनेल मार्फत ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅड आणण्यात येतील.

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आयोगाने ''थ्री टायर'' सुरक्षा उभारले असून यासाठी सीआयएस आणि राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. यंदा प्रथमच सर्व मतदारसंघाची मतमोजणी एकाच वेळी सकाळी आठ वाजता सुरू होईल. यासाठी 1500 पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत असतील अशी माहिती जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी दिली.

मतमोजणीसाठी आयोगाने यावेळी विशेष तयारी केली आहे. उत्तर गोव्यामध्ये 19 मतदारसंघाची मतमोजणी पणजीच्या आल्तिनो येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये 19 स्वतंत्र कक्षांमध्ये सुरू होईल. तर दक्षिण गोव्यासाठी दामोदर महाविद्यालयामध्ये 21 मतदारसंघाची मतमोजणी सुरू होईल अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे.

अशी असेल प्रक्रिया

सकाळी 8 वाजता बॅलेट मतमोजणीला सुरवात होईल.8.15 मिनिटांनी स्ट्राँगरूममधून ईव्हीएम मशीन केंद्रावर हलवण्यात येतील.प्रत्यक्ष मतमोजणी 8.30 मिनिटांनी सुरू होईल. मतदारसंघाच्या रचनेवरून 6 ते 11 फेऱ्या होतील.उत्तर गोव्यात सर्वाधिक फेऱ्या पेडणे मतदारसंघात 11 तर सर्वात पणजी मतदारसंघात 6 फेऱ्या होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crypto Fraud: गोवा पोलिसांची मोठी कारवाई! 7.36 कोटींच्या क्रिप्टो घोटाळ्याचा पर्दाफाश; दुबईतील मास्टरमाइंडसह 10 जणांवर गुन्हा दाखल

Meta layoffs 2026: मेटाकडून 8000 कर्मचाऱ्यांची तडकाफडकी हकालपट्टी, पहाटे 4 वाजता ईमेल पाठवून दिला नारळ; टेक जगतात खळबळ

Crime News: गुंगीचे औषध देऊन काढले अश्लील फोटो, ब्लॅकमेल करुन लुटले, लग्नानंतरही छळले; मामा अन् मावशीने केले भाचीचे शोषण

Indian Railway Recruitment 2026: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 1191 जागांसाठी भरती जाहीर; परीक्षा आणि मुलाखतीशिवाय होणार निवड

Shani Vakri 2026: शनिदेव चाल बदलून 4 राशींना करणार मालामाल! नोकरदारांना मिळणार पगारवाढीची मोठी गूड न्यूज

SCROLL FOR NEXT