Govind Gawde  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

‘रोजगार’ समस्या निकालात काढू: गोविंद गावडे

गोविंद गावडे यांची खास मुलाखत

दैनिक गोमन्तक

संजय घुग्रेटकर

प्रश्न: आपल्याला मतदान कसे झाले?

उत्तर: पक्ष किंवा गटातटाच्या बाहेर आपला जनसंपर्क आहे. गावगावात, वाड्यावाड्यावर आपले सक्षम कार्यकर्ते आहेत. स्वतःहून अनेकजण घरोघरी भेटीगाठीप्रसंगी सोबत होते. मतदारसंघातील 44 बुथनिहाय आपले कार्यकर्ते वावरत होते. मतदारंसघातील सातही पंचायत क्षेत्रातील जनतेच्या सहकार्यांनुसार, गरजेनुसार विकास प्रकल्प राबविले. सुमारे 40 प्राथमिक शाळांतून आवश्‍यक सुविधा निर्माण केल्या. अनेक शाळांची (School) दुरूस्ती केली. शाळा सुसज्ज केल्या. पाणी, वीज, रस्ता समस्या निकालात काढल्या. अनेक ठिकाणी संरक्षणक भिंतीचे काम पूर्ण केले. मतदारसंघातील रस्त्यांचा प्रश्‍न निकालात काढला. साकवांचे काम पूर्ण केले. अशा विकास कामांमुळेच आपल्याला चांगले मतदान झाले.

प्रश्न: अटीतटीची निकाल लागला, याबदद्ल आपले मत काय?

उत्तर: निवडणूक ही अटीतटीचीच होती, पण जनता विकासाला मतदान करणार हे निश्‍चित होते. मतदारसंघातील वीज, पाणी (Water), रस्ते समस्येबरोबरच विविध मोठे प्रकल्प राबवले. बाणास्तरीचा भव्य बाजार प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे. त्याचा लाभ या परिसरातील जनतेला होणार आहे. दूरदृष्टीने भविष्यातील गरजांनुसार हा प्रकल्प पूर्ण होत आहे. तसेच माशेलातील रखडलेला बसस्थानक हा बहुउपयोगी प्रकल्प जनतेसाठी खुला केला. तेथे बसस्थानकाबरोबरच अनेक कार्यालये, सभागृह खुली केली. दुकानांचे वाटप झाले, याचा लाभ जनतेला मिळाला. त्यामुळे यंदा निवडणुकीत (Election) उमेदवार अनेक होते, आव्हानेही वेगळी होती, तरीसुद्धा जनतेने विकासालाच मतदान केले आहे.

प्रश्न: आगामी पाच वर्षांत काय करणार?

उत्तर: जनकल्याण हे ध्येय असून सेवा हे व्रत आहे. त्यामुळे प्रियोळ मतदारसंघाचा चौफर विकास करणार आहे. कला, संस्कृती, शिक्षणाबरोबर रोजगारांसाठीही विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. भूमीगत वीज वाहिन्यांचे जाळे विणले जाणार आहे. त्याची सुरूवात माशेल पंचक्रोशीत झाली आहे. कला भवनाबरोबरच सुसज्ज विद्यालयही माशेलात सुरू केले जाईल. याशिवाय प्रत्येक पंचायत क्षेत्रात स्थानिकांच्या गरजेनुसार उपक्रम राबविले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mathura Boat Accident: वृंदावनमध्ये काळजाचा थरकाप! यमुनेत 27 प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, 10 जणांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

VIDEO: सलमान खानचा चढला पारा! चाहत्याच्या 'त्या' कृतीवर भडकला भाईजान; नेटकरी म्हणाले, ''तो तुझा बालपणीचा मित्र आहे का''?

Mumbai Gold Smuggling Bust: मुंबई विमानतळावर 38 कोटींचं सोनं जप्त! डीआरआयकडून आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश; 26 जणांना ठोकल्या बेड्या

Horoscope April 2026: ग्रहांचा राजा बदलणार तुमचं भविष्य! बँक बॅलन्स वाढणार, नशीब चमकणार; 'या' राशीच्या लोकांची चांदीच चांदी

Mojtaba Khamenei: 'शहीदांच्या रक्ताचा बदला घेणार!' युद्धविरामानंतर खामेनेईंची गर्जना; शत्रूला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचं ठणकावलं

SCROLL FOR NEXT