Ravindra Velip Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Elections: पर्यावरणवादी कार्यकर्ते रवींद्र वेळीप यांनी काँग्रेसमध्ये केला प्रवेश

वेळीप यांच्या बरोबर सांगे मतदारसंघातील फ्रान्सिस कार्व्हालो आणि नितेश गावकर यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश करून काँग्रेस उमेदवार प्रसाद गावकर (Prasad Gavkar) यांना आपला पाठिंबा जाहीर केला.

दैनिक गोमन्तक

मडगाव: सध्या सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारने (BJP Government) पर्यावरणाची वाट लावली असून हा पक्ष पुन्हा सत्तेवर आल्यास राज्याची पुरती वाट लागेल. या ऱ्हासातून राज्याला वाचवायचे असेल तर गोव्यात काँग्रेस सत्तेवर येण्याची नितांत गरज आहे असे मत व्यक्त करीत पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते आणि गकुवेध फेडरेशनचे उपाध्यक्ष रवींद्र वेळीप (Ravindra Velip) यांनी काँग्रेस (Congress) पक्षात प्रवेश केला. वेळीप यांच्या बरोबर सांगे मतदारसंघातील फ्रान्सिस कार्व्हालो आणि नितेश गावकर यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश करून काँग्रेस उमेदवार प्रसाद गावकर (Prasad Gavkar) यांना आपला पाठिंबा जाहीर केला. (Environmental Activist Ravindra Velip Enters Congress)

दरम्यान, यावेळी दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी सर्वांचे स्वागत केले. भाजपचा पराभव फक्त काँग्रेस पक्षच करू शकतो याची जाणीव आता लोकांना झाली आहे. त्यासाठी आता लोक काँग्रेसकडे येऊ लागले आहेत. आज कुडचडेत संघाशी जवळ असलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यानी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. आणखी काही दिवसात तृणमुल आणि आपमध्ये जे कोण गेले आहेत तेही काँग्रेस पक्षात सामील होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिवाय, यावेळी बोलताना प्रसाद गावकर यांनी रवींद्र वेळीप आणि त्यांचे साथीनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने आपली ताकद आणखीन वाढली असून आता सांगेत काँग्रेस पक्षच जिंकणार असा विश्वास व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CM प्रमोद सावंतांविरोधात बदनामीकारक व्हिडिओ करणाऱ्या गौरव बक्शीला 50,000 दंड; कोर्टासमोर मागितली माफी

Rama Kankonkar Case: काणकोणकर हल्ला प्रकरण: रामा यांच्या पत्नीनं थेट पणजी पोलीस निरीक्षकाविरुद्ध केली तक्रार; गुन्हे शाखेकडून चौकशीची मागणी

Goa Politics: 'आप'च्या राजकारणाची स्क्रिप्ट उघड! "छुपे साटेलोटे नेत्यांच्या राजीनाम्याला कारणीभूत", काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आक्रमक

Watch Video: "लड़कियों के हाथों में मजा बहुत है, वो...", पाकिस्तान महिला संघाच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीचं वादग्रस्त विधान Viral

Yashasvi Jaiswal: शुभमन गिलनंतर आता यशस्वी जैस्वालचाही 'कॅप्टन'पदावर डोळा; म्हणाला, "मला पण कर्णधार बनायचयं!"

SCROLL FOR NEXT