Goa Election, Advertisement and Actor Dainik Gomantak
गोवा निवडणूक

गोवा निवडणूक,जाहिराती आणि अभिनेते

बॅनर्स, पोस्टर्स व्हिडिओ आणि प्रिंट माध्यमातून ‘आम्हीच तुमचे कैवारी’चा मारा अव्याहत चाललेला आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा: वेगवेगळ्या माध्यमात काम करणाऱ्या अभिनेत्यांसमोर वेगवेगळी आव्हाने असतात. उदाहरणार्थ नाटकात काम करणारे अभिनेत्याला आपले भाषण पाठ करावेच लागते. ‘भाषण पाठ असणे’ ही नाटकातल्या अभिनेत्यासाठी एक अट असते. सिनेमात (movies) काम करणाऱ्यांना नटासाठी वेगवेगळ्या प्रकारचे शॉट समजून घेऊन (उदाहरणार्थ क्लोजप, वाईड वगैरे) त्यानुसार काम करणे हे एक वेगळ्या प्रकारचे आव्हान असते. आपले माध्यम (Medium) समजून घेऊन त्यानुसार प्रेक्षकांना आवडेल अशाप्रकारे काम करणे हेच त्यांच्यासमोरचे उद्दिष्ट असते. नाटक-सिनेमातल्या (drama) अभिनेत्यांनी हे आव्हान गृहितच धरलेले असते.

पण सर्वात मोठे आव्हान सिनेमा -व्हिडीओ माध्यमाचेच भाग असलेल्या, एका ठराविक काळातच निर्माण होणाऱ्या एका प्रकारात काम करताना, अभिनेत्यांसाठी अधिक कठीणपणे समोर येऊन ठेपते. ते माध्यम म्हणजे ‘निवडणूक जाहिरातीं’ (Election advertisements)चे माध्यम. बाकी कुठल्याही प्रकारच्या सिनेमा-व्हिडिओत काम केल्यानंतर, ‘काम चांगले झाले आहे कि नाही’, या प्राथमिक मुद्द्यावरच अभिनेत्यांना शाबासकी मिळते किंवा हेटाळणीला सामोरे जावे लागते पण निवडणुकीच्या जाहिरातीत काम केल्यानंतर अभिनेत्याचे कौतुक किंवा त्याच्यावर टीका वेगळ्याच कारणासाठी होते.

2022 ची गोवा विधानसभेची (Assembly) निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी आणि विस्मयकारी ठरते आहे. वेगवेगळ्या पक्षांच्या जाहिरातीदेखील एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहेत. बॅनर्स, पोस्टर्स व्हिडिओ, प्रिंट इत्यादी माध्यमातून ‘आम्हीच तुमचे कैवारी’चा मारा अव्याहत चाललेला आहे. या जाहिरातींमधून (advertisements) काम करण्यासाठी कधी नव्हे इतकी मागणी गोमंतकीय अभिनेत्या कलाकारांना आली आहे. अनेक अभिनेता, अभिनेत्री हेच सांगताना दिसतात- ‘म्हाका काँग्रेसीन आफयला…. म्हाका बीजेपीन आफयला’…. याच धर्तीवर काहींच्या तोंडी पक्षांची नावे बदललेली असतात. नाट्यस्पर्धांचे दिवस सोडल्यास गोव्यातल्या अभिनेत्या कलाकारांना इतकी मागणी कधीच आलेली नाही.

तर मुद्दा होता निवडणूक जाहिरातीत अभिनेत्यांना सामोरे येणाऱ्या आव्हानांचा. ज्यांनी निवडणुकीसाठी एखाद्या पक्षाचा प्रचार करणाऱ्या जाहिरातीत काम केले, ते कलाकार, त्या पक्षविरोधी लोकांकडून ट्रोल केले जात आहेत. सबंध गोव्यात काँग्रेसच्या पोस्टरवर व जाहिरातीतून झळकत असलेली चेतना म्हणते, ‘फेसबूकवरून तिला असा प्रश्न सातत्याने विचारला जातो की कॉग्रेस पक्ष तिला सांभाळण्याची जबाबदारी कायम खेळणार आहे का? चेतना म्हणते की त्या पक्षाने जन्मभर तिची जबाबदारी घ्यावी अशी तिची अपेक्षा त्या जाहिरातीत काम करताना कधीच नव्हती. ती एक कलाकार म्हणून त्या जाहिरातीत काम करत होती. एक अभिनेत्री (Actress) म्हणून तिने केवळ परफॉर्मन्स दिलेला आहे. चेतना हे पण सांगते की तिच्या अभिनयाचं कौतुकही काही जणांकडून करण्यात आले व ती त्याबद्दल आनंदीही आहे.

काँग्रेसच्या जाहिरातीत काम करणाऱ्या नितीन नाईक (Nitin Naik) व रिशिकाचेही म्हणणे असेच आहे. ते म्हणतात, या जाहिरातीने एक अभिनेता म्हणून आम्हाला एक संधी दिली व आम्ही ती संधी घेतली. निवडणुकीच्या जाहिरातींच्या निमित्ताने अभिनेते म्हणून ते अधिक लोकांच्या समोर येऊ शकले याचा त्यांना आनंदच आहे. होणाऱ्या ट्रॉलिंगची पर्वा ते फारशी करत नाहीत. कारण त्या दोघांना ठाऊक आहे की त्यांचे हेतु साफ होते.

अर्थात त्यांच्याही छातीत थोडीशी धाकधूक असतेच पण त्याचबरोबर मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे आत्मविश्वासही आलेला आहे. चेतना म्हणते, पक्षाच्या जाहिरातीत काम करण्याचा अनुभव खूप काही शिकवून गेला. ओळखी वाढल्या, अभिनेत्री म्हणून आपण ज्याची अपेक्षा करतो ते या प्रकारच्या माध्यमातूनही लाभले. नितीनला वाटते, की जेव्हा आपल्याला सुशिक्षित व समजूतदार उमेदवार लाभतील तेव्हा अशा प्रकारचे प्रश्न कदाचित उद्भवणारही नाहीत. रिशिका (Rishika) म्हणते, आपण एका विशिष्ट पार्टीचे आहोत हा छाप काही काळासाठी आपल्यावर जो पडला तो सोडल्यास काहीही नकारात्मक घडलेले नाही. तिला समाजमाध्यमांवर मिळणाऱ्या (सकारात्मक तसेच नकारात्मक) प्रतिक्रियाना ती उत्तरही द्यायला जात नाही. आपण स्वतःला पार्टीवर्कर नव्हे तर एक आर्टिस्ट समजते असेच ती स्वतःबद्दल म्हणते.

तृणमूल काँग्रेसच्या जाहिरातीत काम करणारा शंकर नाईक म्हणतो, ‘आर्टिस्ट म्हणून, अन्यथाही लोक कधी समजून घेतच नाहीत. अभिनय हा माझा व्यवसाय आहे. ते माझे काम आहे. या कामावर मी अवलंबून आहे. मला एक काम मिळाले व मी ते स्विकारले एवढाच याचा अर्थ आहे. मला ट्रोल केले जाते त्याची किंचितही पर्वा मी करत नाही.

अर्थात असेही काही कलाकार आहेत जे अशा ट्रोलिंगपासून वाचले आहेत आणि ज्यांना फक्त कौतुकच लाभले आहे. टीएमसीसाठी काम केलेली मुनाईसा ही त्यापैकी एक. तिचीही त्या पक्षाकडे किंवा त्यांच्या विचारांकडे बांधिलकी अजिबात नाही. पण असे ट्रोल न होणारे ‘निवडणुकांच्या जाहिराती’तले कलाकार विरळाच.‘बांधिलकी’ हा शब्द सध्या सर्रास चलनात आहे. पण ‘बांधीलकी’ नेमकी कशी असावी, विशेषत: कलाकारांसाठी ती कशी असावी याचे स्पष्ट रूप उलगडणे कठीण आहे. पण जे कलाकार म्हणतात, आपण आपले काम आपल्या उपजीविकेसाठी करतो, त्यांच्या पोटापाण्याकडे असलेल्या त्या बांधिलकीचे आपण काय करणार?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral: मास्तर बनला प्रभु देवा...मुकाबला गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पोरं झाली थक्क, WATCH VIDEO

Shravan Somvar 2025: मन:शांती आणि समस्यामुक्तीसाठी श्रावण सोमवार; जाणून घ्या रुद्राभिषेकाचे महत्त्व आणि सोपी पद्धत

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

PM Narendra Modi: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान विष्णूंचे 11वे अवतार!' भाजप नेत्याच्या वक्तव्याने खळबळ; सांगितले 'हे' कारण

SCROLL FOR NEXT