कोठंबीतून मुख्यमंत्र्यांनी फोडला प्रचाराचा नारळ

 

Dainik Gomantak

गोवा निवडणूक

कोठंबीतून मुख्यमंत्र्यांनी फोडला प्रचाराचा नारळ

स्वयंपूर्ण गोव्यासाठी पुन्हा एकदा सर्व शक्तीनिशी भाजपला निश्चितच साथ देणार. असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमन्तक

डिचोली: गोमंतक भूमी ही देवदेवतांची भूमी आहे. या परशुरामभूमीला प्रयोगभूमी असे गृहीत धरून विरोधकांनी कितीही प्रयोग केले, तरी संस्कृतीप्रधान गोमंतकीय जनता विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता, स्वयंपूर्ण गोव्यासाठी पुन्हा एकदा सर्व शक्तीनिशी भाजपला (BJP) निश्चितच साथ देणार. असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM pramod sawant) यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी शुक्रवारी कार्यकर्ते आणि मतदारांच्या साक्षीत आपल्या कोठंबी गावातील ग्रामदैवत श्री चंद्रेश्वर देवाचे आशीर्वाद घेऊन आपल्या निवडणूक (Goa Election) प्रचाराचा नारळ फोडला. त्यानंतर ते बोलत होते.

मुख्यमंत्री या नात्याने संपूर्ण राज्याच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे. त्यामुळे साखळी मतदारसंघातील प्रत्येक मतदारांपर्यंत पोचणे शक्य होणारच असे नाही. तेव्हा मतदारांनी आपली ही समस्या जाणून घ्यावी. गेल्या दहा वर्षात चुकून एखादी चूक झाली असल्यास त्याबद्दल माफी करावी. असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगून, आतापर्यंत दाखवलात तसाच विश्वास दाखवा. असे आवाहन केले.

याप्रसंगी भाजपचे गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे, माजी खासदार ऍड. नरेंद्र सावईकर यांच्यासह जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सूर्लकर, सुभाष मळीक, मुख्यमंत्र्यांचे कुटुंबिय आदी साखळी मतदारसंघातील विविध पंचायतींचे सरपंच, पंच, कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा पुन्हा विजय निश्चित आहे. भाजप सरकारचे कार्य पाहता, येत्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार सत्तेवर येणारच. असा ठाम विश्वास ऍड. नरेंद्र सावईकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

सदानंद शेट तानावडे यांनी यावेळी बोलताना विरोधकांवर जोरदार टिका केली. कार्यकर्त्यांनी भाजपच्या बाजूने ठामपणे उभे रहावे. असे आवाहनही त्यांनी केले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी श्री चंद्रेश्वर देवाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.आणि आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना या निवडणुकीत पुन्हा यश प्राप्त होवो. असे श्रींच्या चरणी गाऱ्हाणे घालण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ankola Road Accident: राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! अंकोलाजवळ बस आणि टँकरची समोरासमोर धडक; दोघे जागीच ठार, पाच जखमी

Rama Kankonkar Assault: 'दोषींना सोडणार नाही...' रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ल्याचा मुख्यमंत्र्यांकडून निषेध; कठोर कारवाईचे दिले निर्देश

पदक आणि नोकरीचे आमिष दाखवून करायचा शोषण... योग गुरु निरंजन मूर्तीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, 8 महिलांनाही बनवले वासनेचे शिकार

'रामा'ही गोव्यात सुरक्षित नाही; राजकीय नेत्यांकडून काणकोणकरांवरील जीवघेण्या हल्ल्याचा निषेध

Ramesh Tawadkar: मंत्रिपद नकोच होते! का झाले रमेश तवडकर मंत्री? चार दिवसांनी दिले स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT