Ashok Chavan  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Election:...म्हणून लहान पक्षांना मत देऊ नका: अशोक चव्हाण

आम्ही तीच आश्वासने देतो जी आम्ही पूर्ण करू शकतो, असे म्हणत अशोक चव्हाण यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

Akash Umesh Khandke

पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते गोव्यात दाखल होत आहेत. आज कॉंग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गोमन्तकला मुलाखत दिली. ते म्हणाले, 'तृणमूल कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टी (AAP) सारखे लहान पक्ष गोव्याच्या राजकरणात 'एंट्री' मिळवण्यासाठी ही निवडणूक लढवत आहेत. ते गोव्याला राष्ट्रीय राजकारणात जाण्याचा दरवाजा म्हणून बघतात, त्यामुळे अशा पक्षांना मत देऊन गोव्याला फायदा होणार नाही. या छोट्या पक्षांमुळे प्रशासनात अडथळा निर्माण होऊ शकतो.' (Congress Goa Election 2022)

मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) राहुल गांधी यांना पर्यटक म्हणाले होते. यावर अशोक चव्हाण म्हणाले, 'गोव्यात कॉंग्रेसला मतदान करणारा मोठा वर्ग आहे. कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या नेत्यांबद्दल असे बोलून भाजप कॉंग्रेसच्या मतदारांचा अपमान करत आहे.'

तर गोव्याचा विकास झाला असता

चव्हाण म्हणाले, खाणी सुरू करण्याची भाजपची राजकीय इच्छा नाही. भाजपने खाण काम सुरू केले असते तर गोव्याचा विकास झाला असता. इथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला असता. मात्र, भाजपला (BJP) तसे करायचे नाही. अशोक चव्हाण पुढे म्हणाले, आम्ही कसिनोबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. सत्तेत आल्यास आम्ही यावर योग्य तो निर्णय घेऊ.

आम्ही तीच आश्वासने देतो जी आम्ही पूर्ण करू शकतो

कॉंग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. आम्ही लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण करू. कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी या स्वतः जाहीरनाम्यात लक्ष घालतात. आम्ही तीच आश्वासने देतो जी आम्ही पूर्ण करू शकतो, असे चव्हाण म्हणाले. एकंदरीत आज अशोक चव्हाण यांनी पक्षाबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला असून, गोव्यातल्या जनतेला कॉंग्रेसलाच मत देण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: 'सूर्या' दादाला मिळालं वाढदिवसाचं गिफ्ट, हाय होल्टेज सामन्यात 'Sky'नं षटकार ठोकत पाकड्यांची जिरवली! 7 विकेट्सने चारली पराभवाची धूळ VIDEO

IND vs PAK: 'जलेबी बेबी'! पाकिस्तानच्या राष्ट्रगीताऐवजी वाजलं वेगळंच गाणं, दुबई स्टेडियममधील Video Viral

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध पहिली विकेट घेताच पांड्यानं रचला इतिहास! अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय VIDEO

Tax Saving Tips: 15 लाख पगार घेत असाल? तरीही एक रुपयाही कर लागणार नाही, कसं ते जाणून घ्या

Panjim To Vengurla Bus: सिंधुदुर्गवासीयांच्या मदतीला धावली गोव्याची 'कदंब', पणजी–वेंगुर्ला बससेवा सुरू; प्रवाशांना दिलासा

SCROLL FOR NEXT