Dharmesh Saglani and Pramod Sawant Political Fight in Goa Election
Dharmesh Saglani and Pramod Sawant Political Fight in Goa Election Dainik Gomantak
गोवा निवडणूक

साखळीत मुख्यमंत्र्यांची हॅटट्रिक’ की सगलानींचा ‘चमत्कार’?

Tukaram Sawant

डिचोली : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे राजकीय भवितव्य अवलंबून असलेल्या साखळी मतदारसंघात यावेळी भाजप-काँग्रेसमध्ये ‘कांटे की टक्कर’ झाल्याचा अंदाज आहे. या टक्करीत जीत कोणाची होते आणि साखळीचा अधिपती कोण, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. (Dharmesh Saglani and Pramod Sawant Political Fight in Goa Election News Updates)

या मतदारसंघात अत्यंत अटीतटीची लढत झाली असून, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना यावेळी धोका असल्याचा अंदाज काही राजकीय निरीक्षक व्यक्त करीत आहेत. तर मुख्यमंत्री डॉ. सावंत यावेळी विजयी ''हॅटट्रिक'' करणार असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता 10 मार्च रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. या मतदारसंघातून तब्बल 12 उमेदवारांनी निवडणूक लढवली असली तरी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना काँग्रेसचे (Congress) धर्मेश सगलानी यांनी अक्षरशः घाम काढताना त्यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. या मतदारसंघातील ‘अर्थपूर्ण’ प्रचारासह ‘सायलंट’ मतदानही निर्णायक ठरणार आहे.

विजयी उमेदवाराला जेमतेम आघाडी

यावेळी साखळी मतदारसंघात 89.64 टक्के मतदान झाले. पालिका क्षेत्रासह ग्रामीण भागातही उत्स्फूर्तपणे मतदान झाले आहे. एकूण 27 हजार 961 पैकी 25 हजार 24 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 12 हजार 313 पुरुष तर 12 हजार 711 महिला मतदारांनी मतदान केले. साखळीत झालेल्या मतदानाची टक्केवारी पाहता डॉ. प्रमोद सावंत आणि धर्मेश सगलानी (Dharmesh Saglani) या दोघांनाही निवडून येण्याची समान संधी असून, विजयी उमेदवाराला जेमतेम आघाडी मिळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तशी चर्चाही मतदारसंघात सुरू आहे.

विजयाचे दावे-प्रतिदावे

मुख्यमंत्री डॉ. सावंत हे निवडून येणारच, असा भाजप (BJP) कार्यकर्त्यांचा दावा आहे, तर दुसऱ्या बाजूने काँग्रेसचे धर्मेश सगलानी यांचा यावेळी चमत्कार पाहावयास मिळेल, असा दावा काँग्रेस कार्यकर्ते करीत आहेत. कोणी काहीही आणि कितीही अंदाज बांधू देत, की चर्चा काहीही असू दे, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचा विजय निश्चित आहे. ते यावेळी विजयी ''हॅटट्रिक'' करतील, असा विश्वास जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर यांनी व्यक्त केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Goa Congress : निष्ठावंत कार्यकर्ते, प्रतिनिधींची वानवा; काँग्रेसची मोठी पंचाईत

Lok Sabha Election 2024: ‘’शहजाद्याला PM बनवण्यासाठी पाकिस्तान उतावळा’’; व्होट जिहादवरुन मोदींनी काँग्रेसला पकडलं कोंडीत

Bicholim News : गोव्याच्या अस्तित्वासाठी झटणार : ॲड. रमाकांत खलप

Karnataka Sex Scandal Case : कर्नाटकातील सेक्स स्कँडल प्रकरणाचा गोव्यावर परिणाम नाही : सदानंद तानावडे

SCROLL FOR NEXT