Manohar Ajgaonkar Dainik Gomantak
गोवा निवडणूक

मुख्यमंत्री सावंतांनंतर आता बाबू आजगावकरही निकालाआधी देवदर्शनाला

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत 26 फेब्रुवारीला शनिशिंगणापूरला येऊन गेले तर, त्यांच्या पाठोपाठ गोव्याचे उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर शनीच्या चरणी गेले होते.

दैनिक गोमन्तक

गोवा विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक सध्या सुरू आहे, तर लवकरच निकाल हाती येणार आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) 26 फेब्रुवारीला शनिशिंगणापूरला (Shani Shingnapur) येऊन गेले आहेत. त्यांच्या पाठोपाठ गोव्याचे उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर (Manohar Ajgaonkar) सुद्धा शनी दर्शनाला आले होते. त्यामुळे भाजपचे (BJP) गोव्यातील शिर्ष नेते शनीचे दर्शन का घेत आहेत यावर उलटसुलट चर्चा रंगवली जात आहे. गोवा विधानसभा निवडणुकीचा (Goa Assembly Election 2022) निकाल गुरुवारी 10 तारखेला जाहीर होणार आहे. (Deputy Chief Minister Manohar Ajgaonkar had gone to Shani Shingnapur for Dev Darshan)

उपमुख्यमंत्री आजगावकर त्यांच्या पत्नी मेघा, बंधू डॉ. श्रीकांत व रश्मी राजेंद्र आजगावकर यांनी 4 तारखेला शनिशिंगणापुरला भेट देवून उदासी महाराज मठात शांतीपाठ आणि संकल्प सोडला. चौथऱ्यावरती तेल अभिषेक करुन स्वयंभू शनिमूर्तीचे दर्शन घेतले. देवस्थानचे विश्वस्त आप्पासाहेब शेटे व बाळासाहेब बन्सी बोरुडे यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व प्रसाद देवून आदरातिथ्य सन्मान केला.

त्यावेळी आजगावकर म्हणाले की, गोवा राज्याच्या निवडणुकीत कुठलीच चुरस नव्हती. भाजपचे काम आणि ध्येयधोरणे लक्षात घेता 10 मार्चच्या निकालात गुलाल आमचाच उडणार, असा विश्वास गोव्याचे उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांनी व्यक्त केला.

पुढे म्हणाले, गोवा निवडणुकीत भाजपला 17 ते 19 जागा मिळतील. मित्र पक्षासह आमचाच मुख्यमंत्री होणार ही काळ्या दगडावरील रेघ, असे सांगून त्यांनी इतर पक्षाने खुप लुडबुड करत आरोपांचा भडिमार केला मात्र गोव्यातील जनता सुज्ञ आहे आणि आमच्या नव्हे तर विरोधकांच्या झोपा उडाल्या आहेत.

महाराष्ट्रात (Maharashtra) एकेका मंत्र्यांचा पंचनामा होत असताना महाविकास आघाडी () मुग गिळून गप्प का? असा प्रश्न उपस्थित करुन केंद्रीय तपास यंत्रणा उगाच कुणाला त्रास देत नाही, 'जैसी करणी वैसी भरणी' त्यानुसार महाविकास आघाडीचे मंत्री अडकत आहेत. असे असताना त्यांची चाललेली फुशारकी चुकीची आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्याला शैक्षणिक हब बनण्यासाठी सरकार काम करतेय: CM प्रमोद सावंत

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Goa News: डिपॉझिट रिफंड योजनेवरुन 'गोवा कॅन'चा धोक्याचा इशारा! विक्रेते व ग्राहकांमध्ये तंटा होण्याची वर्तवली शक्यता

Mormugao Fort: ऐतिहासिक 'मुरगाव किल्ल्याचे' होणार पुनर्निर्माण! मुख्यमंत्री सावंतांनी गुणवत्तापूर्ण कामाचा दिला विश्वास

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिकमध्ये ओंगळवाणी परिस्‍थिती! कर्मचारी राहतात तेथेच करतात आंघोळ; निरीक्षकांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT