Swetha Sujay Lotlikar Dainik Gomantak
गोवा निवडणूक

गोवा फॉरवर्डला मोठा झटका, नगरसेविका स्वेता लोटलीकरांनी भाजपमध्ये केला प्रवेश

गोवा फॉरवर्ड पक्षाला (Goa Forward Party) फातोर्डात धक्का बसला असुन प्रभाग पाच मधील पक्षाची नगरसेविका सौ. स्वेता सुजय लोटलीकर आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पक्षात सामील झाल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

सासष्टी: गोवा फॉरवर्ड पक्षाला फातोर्डात धक्का बसला असुन प्रभाग पाच मधील पक्षाची नगरसेविका सौ. स्वेता सुजय लोटलीकर आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पक्षात सामील झाल्या आहेत. आज मडगावच्या (Margao) दक्षिण गोवा भाजप कार्यालयात फातोर्डाचे भाजप उमेदवार दामू नाईक (Damu Naik), प्रभारी संजय कवळेकर, नगरसेवक कामिल बार्रेटो, मिलाग्रीन गोम्स, सदानंद नाईक, बबिता नाईक व भाजप मंडळाच्या पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीत त्यांना रितसर पक्षात प्रवेश देण्यात आला. (Corporate Swetha Sujay Lotlikar Joins BJP)

दरम्यान, या वेळी फातोर्डा मतदारसंघाला (Fatorda Constituency) दामू नाईक शिवाय पर्याय नसल्याचे स्वेता लोटलीकर यानी सांगितले. तिने आपला पुर्ण पाठिंबा दामू नाईकला जाहीर केला. आपण प्रभाग पाच मधून 400 पेक्षा जास्त मतांनी निवडून येऊन सुद्धा आपल्याला नगरपालिकेच्या कुठल्याही समितीत स्थान देण्यात आले नाही. शिवाय प्रत्येक निर्णयामध्ये आपल्याला डावलण्यात आले. त्यामुळे आपल्या प्रभागातील लोकांनी सांगितल्याप्रमाणे आपण भाजप पक्षात प्रवेश केल्याचे तिने स्पष्ट केले. त्यांचे पती सुजय लोटलीकर यांनी सांगितले की, आमच्या प्रभागमध्ये कुठलेही विकास काम करण्यात आले नाही. शिवाय या प्रभागमधील बेकार युवकांचा रोजगार व नोकरीसाठीही विचार झाला नाही. 2017 मध्ये आपण गोवा फॉरवर्डचा (Goa Forward Party) ब्लॉक अध्यक्ष असताना विजय सरदेसाई (Vijay Sardesai) दुसऱ्यांदा निवडून आलो. मात्र त्यानंतर आपल्याला विश्र्वासात घेतले नाही.

तसेच, आपण आमदार नसताना सुद्धा गेल्या दहा वर्षांत आपले लोकसेवेचे व्रत चालू होते. गोवा फॉरवर्डचे अनेक नेते आपल्या संपर्कात असल्याचेही ते म्हणाले. सौ. स्वेता लोटलीकर व सुजय लोटलीकर यांच्या प्रवेशामुळे आपले हात अधिक बळकट झाले आहेत. शिवाय आता बस स्टॅण्ड व सोनसोडा कचरा प्रकल्पाचे प्रश्र्नही सुटेल असा विश्र्वास त्याने व्यक्त केला. भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्याना सन्मान दिला जातो, त्याला पुर्ण संधी देण्यात येते. यावेळी विकासाला मत द्या असे आवाहन ठाणेचे चार वेळेचे आमदार व फातोर्डाचे प्रभारी संजय केळकर यानी सांगितले.

शिवाय, आपण बॅगा घेऊन फिरतो असा आपल्यावर आरोप करण्यात येत आहे. ठाण्यामध्ये मी चार वेळा बॅगांशिवाय निवडून आलो आहे. विरोधी पक्षातील नेते कार्यकर्ते जे भाजपात प्रवेश करतात ते विकासासाठी व विश्र्वासाने. ज्यांना बॅगांची संवय असते त्यांना सर्वत्र बॅगाच दिसतात असा टोमणाही केळकर यानी मारला. नगरसेविका स्वेता लोटलीकर यांच्या भाजप प्रवेशाने 25 नगरसेवकांच्या मडगाव नगरपालिकेत भाजप प्रणित व्हायब्रंट मडगाव व फातोर्डाची नगरसेवकांची संख्या 8 वर पोहोचली आहे, गोवा फॉरवर्ड 9 वरुन 8 वर पोहोचला आहे. दिगंबर कामतचे 8 तर एक अपक्ष नगरसेवक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 19 October 2026: सुवर्णयोग आणि धनलाभाचा दिवस! शारदीय नवरात्रीच्या सोमवारी 'या' राशींचे उजळणार नशीब; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

SCROLL FOR NEXT