Rahul Gandhi  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Election: कॉंग्रेस नेते राहुल गांधी आज गोवा दौऱ्यावर

राहुल गांधी आज 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता गोव्यात दाखल होतील.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक दिग्गज नेते गोव्याचा दौरा करत आहेत. गुरुवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गोव्यात सभा घेतली, तर आज कॉंग्रेस नेते राहुल गांधी उमेदवारांच्या प्रचारासाठी आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी एकदिवसीय गोवा दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते दोन मतदारसंघात प्रचारसभा घेणार आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा हा तिसरा दौरा आहे. मागील दौऱ्यात गांधी यांनी घोरघरी जाऊन कॉंग्रेस उमेदवारांचा प्रचार केला होता. (Rahul Gandhi Goa)

राहुल गांधी आज 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता गोव्यात दाखल होतील. यानंतर मडगावमध्ये राहुल गांधींची पत्रकार परिषद होणार आहे, ज्यात ते काही महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे. संध्याकाळी 4.30 वाजता कुडचडेमध्ये तर 5.45 वाजता कुडतरी मतदारसंघात काँग्रेस (Congress) उमेदवारांच्या प्रचारसभा राहुल गांधी घेणार आहेत. या सभांनंतर ते पुन्हा दिल्लीला रवाना होतील.

दरम्यान, राहुल गांधींनी (Rahul Gandhi) नुकतीच साखळी मतदारसंघात जाहीर सभा घेतली होती. मुख्यमंत्र्यांच्या साखळी मतदारसंघात घेतलेल्या सभेत त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. मुख्यमंत्री प्रमोद सावंतांविरोधात रिंगणात असलेल्या धर्मेश सगलानींना निवडून देण्याचं आवाहनही त्यांनी केलं. याच सभेत काँग्रेसचा गोवा विधानसभा निवडणुकीसाठीचा (Goa Assembly Elections) जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. ज्यामध्ये गोव्यातील प्रत्येक गरीब कुटुंबाला दरमहा 6 हजार रुपये आणि 80 रुपये किमतीने पेट्रोल-डिझेल देण्याचं आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आलं आहे. प्रियंका गांधी यांनी देखील गोव्याला भेट दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT