CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

यंदाच्या निवडणुकीत होणार इतिहासाची पुनरावृत्ती: CM प्रमोद सावंत

'म्हणून' त्यांनी सोडला पक्ष; CM प्रमोद सावंत यांचे पर्रीकरांच्या बाबतीत स्पष्टीकरण

दैनिक गोमन्तक

गोवा: गोवा विधानसभा निवडणूक सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. सध्या भाजपचे सरकार असून, दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर प्रमोद सावंत मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. तेव्हापासून मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे अनेक अव्हानांना तोंड देत आहेत. मनोहर पर्रीकर यांच्या भाजप सरकारात आणि सावंत यांच्या भाजप (Goa BJP) सरकारात मोठी तफावत दिसून येत असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. (CM Pramod Sawant Statment About Goa Assembly Election 2022)

यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) म्हणाले, "प्रत्येक नेत्याची एक खासियत असते. मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) आमचे मोठे नेते होते हे खरे आहे. मात्र, त्यांची खासियत वेगळी होती. मी माझ्या पद्धतीने राजकारण सांभाळत आहे. मी जबाबदाऱ्या देत आहे आणि त्या जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहेत, त्यामुळेच अनेकांनी स्वत:हून जबाबदारी स्वीकारून आपापल्या कामाला सुरुवात केली आहे. मला पूर्ण खात्री आहे की, यावेळी देखील विजय आमचाच होईल, जिल्हा पंचायत निवडणुकीमध्ये भाजपला थारा नाही असे काहींनी आम्हाला सांगितले होते. मात्र, आताही इतिहासाची पुनरावृत्ती होईल," असे त्यांनी दिलेल्या एका विशेष मुलाखतीत सांगितले.

ते पुढे म्हणाले, पर्रीकरांचे गोल्डन गोव्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत; या साठी पक्षातील प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत आहे. मात्र, काही जणांना पक्षापेक्षा आपण मोठे आहोत; असे वाटू लागले आहे. त्यामुळेच पक्षापासून ते दूर गेले आहेत. आपण पक्षापेक्षा मोठे आहोत, असे वाटू लागल्यावर असे प्रकार सर्रास घडतात असं म्हणत पार्सेकर, उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) आणि लोबो यांना त्यांनी टोला लगावला. सावंतांनी पक्षासोबत राहावे यासाठी आम्ही प्रयत्न केले. मात्र त्यांना यामध्ये स्वारस्य नव्हते, यामधून त्यांचा स्वार्थ जनतेसमोर आला असे सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: आशिया कपसाठी पाकिस्तान संघ जाहीर, बाबर-रिझवानला डच्चू; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Kshatriya Origins: बटाडोम्बा-लेना, फा-हियन गुहेतील 30000 ईसापूर्वीचे होमिनिन सांगाड्याचे अवशेष, वेदरांचा उल्लेख

Video Viral: मडगावच्या दहीहंडीत आला 'पुष्पा'! "झुकेगा नही" म्हणत त्याने काय केलं, बघा...

Opinion: 3500 ईसापूर्व काळात सुमेरियन लोकांनी ‘क्यूनिफॉर्म’ लिपी विकसित केली, छापखान्याच्या शोधामुळे वाचनकलेत क्रांती झाली

Goa Live News: भोमा येथील रस्त्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री सावंत यांचे स्पष्टीकरण नाही

SCROLL FOR NEXT