वास्को येथे पत्रकार परिषदेत माहिती देताना आमदार कार्लुस आल्मेदा (Carlos Almeida) सोबत, वास्को भाजप (BJP) मंडळ, नगरसेवक. Dainik Gomantak
गोवा निवडणूक

भाजपने उमेदवारी नाकारल्यास उत्पल यांच्या प्रमाणे कठोर निर्णय घ्यावा लागेल: आल्मेदा

भाजपने (BJP) वास्कोतून मला उमेदवारी नाकारली तर मला स्वर्गीय मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे पुत्र उत्पल प्रमाणे कठोर निर्णय घ्यावा लागेल असा इशारा आमदार आल्मेदा यांनी दिला.

दैनिक गोमन्तक

दाबोळी: माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांनी गोव्यात (Goa) 2012 ची विधानसभा निवडणूक अल्पसंख्यांकांना घेऊन यशस्वीरित्या पार पाडली होती. नंतर 2017 च्या निवडणुकीत सुद्धा भाजपचे (BJP) अल्पसंख्यांक उमेदवार जास्त प्रमाणात विजयी झाले होते. पुढे काँग्रेसचे 10 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यात जास्त अल्पसंख्यांक नेते होते. यासाठी येणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election) राज्य भाजपने 35 टक्के उमेदवारी अल्पसंख्यांकांना देण्याची मागणी वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा (Carlos Almeida) यांनी केली. तसेच भाजपने वास्कोतून मला उमेदवारी नाकारली तर मला स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल प्रमाणे कठोर निर्णय घ्यावा लागेल असा इशारा आमदार आल्मेदा यांनी दिला.

वास्को येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार आल्मेदा यांनी दिली. यावेळी त्यांच्या समवेत मुरगाव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष श्रद्धा महाले, वास्को भाजप सचिव यतीन कामुर्लेकर, वास्को महिला मोर्चा अध्यक्ष देविता आरोलकर, नगरसेवक फॅन्ड्रीक हेन्रीक, युवा मोर्चा अध्यक्ष अमय चोपडेकर, नगरसेवक नारायण बोरकर, माथायश मोंतेरो व माजी नगरसेवक धनपाल स्वामी उपस्थित होते. पुढे माहिती देताना आमदार आल्मेदा म्हणाले की माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोव्यातील भाजप सत्तेवर आणण्यासाठी भाजप अल्पसंख्यांक उमेदवार २०१२ च्या निवडणुकीत उतरविले. त्यात त्यांना शंभर टक्के यश प्राप्त झाले. यामुळे गोव्यातील अल्पसंख्यांक भाजपमय झाला होता तो पर्रीकर यांच्या प्रयत्नामुळे. पुढे २०१७ च्या निवडणुकीत भाजपचे तेरा आमदार निवडून आले यात सुद्धा जास्त प्रमाणात अल्पसंख्यांक उमेदवार निवडून आले होते. नंतर काँग्रेसच्या दहा आमदारांनी सत्ताधारी भाजपात प्रवेश केला होता. यात जास्त प्रमाणात अल्पसंख्यांक आमदार होते. यासाठी राज्य भाजपने येणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीत ३५ टक्के उमेदवारी अल्पसंख्यांकांना देण्याची मागणी आमदार आल्मेदा यांनी पत्रकार परिषदेतून केली. कारण गोव्यात अल्पसंख्यांकांना भाजपवर विश्वास असल्याने येणाऱ्या निवडणुकीत भाजपने याविषयी गंभीरतेने विचार करावा अशी मागणी आमदार आल्मेदा यांनी केली.

वास्को येथील होणाऱ्या कदंब बसस्थानकाचे काम पूर्ण होत नसल्याने अखेर गोवा साधनसुविधा विकास मंडळाने येथील कंत्राटदाराचे कंत्राट काढून घेतले आहे. यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्वरित वास्कोतील कदंब बसस्थानकाच्या कामाला नव्याने सुरुवात करावी अशी मागणी आल्मेदा यांनी केली. यावेळी वास्को बायणा येथील माजी नगरसेवक धनपाल स्वामी यांनी भाजपात प्रवेश केला असल्याची माहिती आल्मेदा यांनी दिली. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपने वास्कोतून मला भाजपची उमेदवारी नाकारली असेल, तर मला स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल प्रमाणे कठोर निर्णय घ्यावा लागेल. गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत वास्कोतून भाजपला नवी संजीवनी देऊन यश प्राप्त करून दिले असल्याने वास्कोची भाजपची उमेदवारी मला मिळणार असल्याची आशा आल्मेदा यांनी व्यक्त केली. वास्को कोमुनिदाद जागा घोटाळा प्रकरणी राज्य महसूल विभागातर्फे मुरगाव मामलेदार पुढील तपास करीत आहे. कोमुनिदाद जागा परस्पर विकल्या प्रकरणी माजी नगरसेवकाला या प्रकरणातून वाचवण्यासाठी उच्चस्तरीय प्रयत्न सुरू असल्याची माहिती आमदार आल्मेदा यांनी दिली.

वास्कोची भाजपची उमेदवारी विद्यमान आमदार कार्लुस आल्मेदा यांनाच मिळणार असल्याची माहिती नगरसेवक तथा वास्कोचे भाजप सचिव यतीन कामुर्लेकर यांनी दिली. यंदा झालेल्या पालिका निवडणुकीत नऊ नगरसेवकांना निवडून आणण्यात आल्मेदा यांचा सिंहाचा वाटा होता. तसेच आमदार आल्मेदा यांच्यावर वास्को भाजप मंडळाचा पूर्ण विश्वास असून सर्व नगरसेवक आमदार अल्मेदा यांच्यासमवेत असून वास्कोची भाजपची उमेदवारी आल्मेदा यांनाच मिळणार असल्याची माहिती कामुर्लेकर यांनी दिली.

एकही भ्रष्टाचाराचा आरोप नसलेल्या आमदारांपैकी आल्मेदा असून वास्कोची भाजपची उमेदवारी त्यांना मिळणार असल्याची माहिती नगरसेवक फेड्रिक हेंन्रीक यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

SCROLL FOR NEXT