Pramod Sawant and Devendra Fadnavis  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

गोव्यात भाजपच्या मतांच्या टक्केवारीत वाढ

काँग्रेसने (Congress) 37 जागा लढवल्या आणि 2,22,948 मते मिळवली.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात 20 जागा जिंकणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) मतांच्या टक्केवारीत किरकोळ वाढ झाली आहे. यावेळी भाजपने 33.3% मते मिळवली. गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्व 40 जागा लढवल्या होत्या. यातील 20 जागा जिंकण्यात त्यांना यश आले. पक्षाला एकूण 3,16,573 मते मिळाली आहेत.

काँग्रेसने (Congress) 37 जागा लढवल्या आणि 2,22,948 मते मिळवली. पक्षाला 11 मतदारसंघात विजय प्राप्त झाला. कॉंग्रेस बरोबर युती केलेल्या गोवा फॉरवर्ड पार्टीला (GFP) एका जागेवर समाधान मानावे लागले. पक्षाला 1.84% मते मिळाली.

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या मतांच्या टक्केवारीत घसरण झाली आहे. मागील निवडणुकीत पक्षाला 11% मते मिळाली होती. मात्र या वर्षी तो आकडा घसरून 7.6 टक्क्यांवर आला आहे. मगोपला एकूण 72,269 मते मिळाली. यामुळे मगोपला 2 जागा जिंकता आल्या.

आम आदमी पार्टी (AAP) ने दोन जागा जिंकत 64,354 मते मिळवली. तृणमूल काँग्रेस पार्टीने (TMC) 5.21 टक्के मते मिळवली. रिव्होल्युशनरी गोवान्स पार्टी (आरजीपी), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एनसीपी) आणि अपक्षांसह इतर पक्षांची मते 19.37 टक्के आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Court Verdict: जिल्हा न्यायालयाचा निर्णय हायकोर्टाने बदलला; खून प्रकरणात 10 वर्षे शिक्षा झालेल्या आरोपीची सुटका

Illegal Animal Hunting: अवैध शिकारीसाठी प्राण्यांना विजेचा शॉक देऊन मारणारा गजाआड; नेत्रावळी वन विभागाची मोठी कारवाई

France Violence: नेपाळनंतर फ्रान्समध्ये 'अराजक'! नवा पंतप्रधान निवडताच उसळला हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोड सुरु; 200 आंदोलकांना अटक VIDEO

"माझे आजोबा पंतप्रधान...", प्रसिद्ध हिंदी अभिनेत्रीची Post Viral; नेपाळच्या राजकारणाशी नेमका संबंध काय?

Goa Assembly Speaker Election: सभापतीपदाच्या खूर्चीवर कोण बसणार? विरोधी पक्षाकडून एल्टन डिकॉस्ता मैदानात; सत्ताधाऱ्यांच्या उमेदवाराचं नाव गुलदस्त्यात

SCROLL FOR NEXT