Amit Shah and Nitin Gadkari  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Election: भाजपचे राष्ट्रीय नेते 6 ते 11 फेब्रुवारी रोजी गोवा दौऱ्यावर

भाजपच्या सर्व उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून ते महाजनसंपर्क अभियानाच्या पार्श्वभूमीवर उमेदवार मतदारसंघातील सर्व घरांना भेटी देणार आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी टिपेवर असताना भाजपने ‘घर घर चलो अभियान’ अंतर्गत 5 आणि 6 फेब्रुवारी रोजी राज्यातल्या सर्व 40 ही मतदारसंघांमध्ये महाजनसंपर्क अभियान आयोजित केले असून यात राष्ट्रीय नेत्यांसह अनेक दिग्गज त्यात सहभागी होणार आहेत.

येत्या आठवड्याभरात गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत विविध ठिकाणच्या प्रचारात सहभागी होणार आहेत.

भाजपच्या (BJP) सर्व उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून ते महाजनसंपर्क अभियानाच्या पार्श्वभूमीवर उमेदवार मतदारसंघातील सर्व घरांना भेटी देणार आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. केंद्राच्या मदतीने राज्यातील डबल इंजिन सरकारने गोव्यात राबवलेल्या सर्व योजनांची माहिती जनतेपर्यंत पोचवण्यासाठी हे अभियान राबवले जाणार आहे. शनिवार, 5 फेब्रुवारी रोजी या अभियानास सुरवात केली जाणार असून सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत तर रविवारी 6 फेब्रुवारी रोजी पूर्ण दिवस सर्व मतदारसंघांत हे अभियान राबवले जाणार आहे. या अभियानात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे सहभागी होणार आहेत.

जाहीरनाम्याचे अनावरण

6 आणि 8 फेब्रुवारी रोजी नितीन गडकरी (Nitin Gadkari) प्रचारात सहभागी होणार आहेत. 8 आणि 11 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा प्रचारात सहभागी होतील. 10 आणि 11 रोजी राजनाथसिंग प्रचार करणार आहेत. शिवाय जी. किशन रेड्डी, देवेंद्र फडणवीस, दर्शना जरदोश, सी. टी. रवी व इतर नेतेही प्रचाराला उपस्थित राहणार आहेत. उमेदवारांबरोबर प्रचार करताना पक्षश्रेष्ठींच्या हस्ते जाहीरनाम्याचे अनावरण केले जाणार आहे.

वेळ्ळी, कुंकळ्ळी, काणकोणात स्मृती इराणी

शनिवारी स्मृती इराणी यांचे गोव्यात आगमन होत आहे. त्याच दिवशी सायंकाळी त्या दक्षिण गोव्यातील वेळ्ळी मतदारसंघात दाखल होत आहेत. सायंकाळी 4 ते 4:30 वाजेपर्यंत त्या वेळ्ळी येथील उमेदवार सावियो रॉड्रिग्स यांच्याबरोबर घरोघरी भेटी देऊन प्रचार करणार आहेत. 5 वाजता त्या कुंकळ्ळी मतदारसंघात उमेदवार क्लाफासियो डायस यांच्या सभेत सहभागी होणार आहेत. 6 वाजता त्या काणकोण मतदारसंघात चावडी येथे उमेदवार रमेश तवडकर यांच्या जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.

साखळीत शहा

अमित शहा (Amit Shah) हे 7 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता गोव्यात येत आहेत. नंतर ते पणजीत ताज विवांता हॉटेलमध्ये भाजप नेत्यांना ते मार्गदर्शन करतील. दुपारी 3:55 वा साखळी येथील बोडके मैदानावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रचारार्थ मार्गदर्शन करणार आहेत.

पाटणेकरांचा प्रचार

5;30 वा. डिचोलीत सभापती राजेश पाटणेकर यांच्या प्रचारार्थ झांट्ये सभागृहातील सभेला अमित शहा उपस्थित राहतील. जोशुआ डिसोझा यांच्या प्रचारार्थ संध्याकाळी 7 वाजता त्यांची सभा म्हापसा टॅक्सी स्टॅण्डवर होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

SCROLL FOR NEXT