Goa Assembly Election 2022  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Election 2022: काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्त्यांकडून फटाक्यांचे बार

बाबू कवळेकर, एल्टन डिकॉस्ता यांच्या कार्यकर्त्यांकडून निकालापूर्वीच विजयाची नारेबाज

दैनिक गोमन्तक

केपे: केपे मतदारसंघात यावेळी भाजपचे बाबू कवळेकर व काँग्रेसचे एल्टन डिकॉस्ता यांच्यात सरळ लढत होणार असल्याचे चित्र दिसत असून, संध्याकाळी काँग्रेस व भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून मतमोजणी पूर्वीच आपले विजय साजरे केले आहेत.

या मतदासरसंघातून झालेले मतदान पाहता लोकांनी या दोघांपैकी आपले मत कुणाच्या पारड्यात पाडले आहे ते येत्या 12 तारखेला दिसून येणार आहे. आज सकाळी साडेदहापर्यंत पालिका क्षेत्रातील मतदान केंद्रावर लोकांचा शुकशुकाट दिसून येत होता. तर हेच चित्र पंचायत क्षेत्रात उलट होते मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याने मतदान केंद्रात लोकांच्या रांगा लागून राहिल्याचे चित्र दिसत होते.

कवळेकर हे भाजपात (BJP) गेल्याने यावेळी त्यांना ही निवडणूक जड जाणार आल्याचे जे चित्र दिसत होते ते आज बऱ्याच प्रमाणात कवळेकर यांच्यासाठी बदललेले दिसत होते. संध्याकाळपर्यंत बरेच मतदार बाहेर पडल्याने मतदानाची टक्केवारी 83 टक्क्यांच्या वर गेल्याने ही टक्केवारी कुणासाठी फायदेशीर ठरणार याचा अंदाज येत नसल्याने सध्या हा केपेत चर्चेचा विषय ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Meta Apology: मोदी सरकार आक्रमक होताच मार्क झुकेरबर्ग नमले! पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ हटवल्याप्रकरणी अन् बाललैंगिक मजकुरावर 'मेटा'कडून माफी

Goa PWD Workers Regularisation: 1,399 ‘PWD’ कामगारांना हायकोर्टचा मोठा दिलासा; 9 फेब्रुवारी 2021 पासून सेवेत, वरिष्ठता आणि निवृत्तीवेतनाचे सर्व लाभ देण्याचे स्पष्ट निर्देश

Vijay Sardesai Congress: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

Swiggy Warehouse Fraud Goa: बनावट नोंदीद्वारे ‘स्विगी’च्या कर्मचाऱ्यांनीच लुटले गोदाम; 93 लाखांचा ऐवज लांबविला, वेर्णा पोलिसांकडून गुन्हा दाखल

Goa Shipyard Jaigad Project: जयगडकडे 660 एकरवर अत्याधुनिक जहाजबांधणी प्रकल्प; वास्कोत अडथळे, गोवा शिपयार्डचा मोर्चा, जर्मन कंपनीकडे सल्लागाराची धुरा

SCROLL FOR NEXT