गोव्यातील ही खरी कुजबूज Dainik Gomantak
गोवा निवडणूक

गोव्यातील ही खरी कुजबूज

गोव्यात सध्या निवडणुकीचे वारे वहायला लागले. तेव्हा एका क्लिकवर जाणून घ्या गोव्यातील राजकीय घडामोडी

दैनिक गोमन्तक

पाटणेकरच हुकमी ‘एक्के’

डिचोलीतील भाजपाची उमेदवारी कुणाला मिळणार, या संदर्भात प्रसारमाध्यमे उगाच वाद निर्माण करतात, असा भाजपातील ‘सुकाणू’ समितीचा आक्षेप आहे. शिल्पा नाईक तेथे ‘डार्कहॉर्स’ ठरतील असा होरा काहीजणांना आहे. परंतु मुख्यमंत्री आणि सभापती यांना कोणत्याही परिस्थितीत डावलता कामा नये, असा भाजपा पक्षश्रेष्ठींचाच आदेश आहे. त्यात राजेश पाटणेकर अत्यंत साधे आणि सुस्वभावी असल्यामुळे त्यांना तिकीट डावलण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. त्यांचे आरोग्य सध्या ठणठणीत आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेसुद्धा सध्या राजेश पाटणेकरांचीच तरफदारी करतात. शिवाय त्यांनी भाजपामध्ये आलेल्या कॉंग्रेस बंडखोरांच्या विरोधातील अर्जाची वासलात लावली. त्यामुळेही भाजपामध्ये त्यांचा मान वाढला. अजून न्यायालयानेही त्याबाबत वाच्यता केलेली नाही. सभापतींवर शिंतोडे पडले असते तर निश्चितच त्यांची पत खालावली असती. या पार्श्वभूमीवर राजेश पाटणेकरांना उमेदवारी भाजपाचीच मिळणार हे आता स्पष्ट झाले आहे आणि त्यांची मतदारसंघातील प्रतिमा चांगली असल्याने भाजपाला तो एक सुरक्षित मतदारसंघ वाटतो. ∙∙∙

गडकरीसाहेबांना वेळ नाही...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुळात गोव्यात आले आहेत ते हमरस्त्यासंदर्भातील महत्त्वाच्या बैठकीसाठी. गोव्यातील हमरस्त्याच्या कामाला वर्षभर विलंब झाला आहे. वास्तविक हा केंद्रीय प्रकल्प असल्याने तो वेळेत पूर्ण होणे हे खर्चाच्या दृष्टीकोनातूनही सर्वांसाठीच योग्य होते. त्यावर मंगळवारच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे आणि तिला गोवा तसेच केंद्राचे अभियंते उपस्थित राहणार आहेत. या व्यस्त कार्यक्रमांमध्ये गडकरीसाहेब मगोप नेत्यांना भेटणे शक्य नाही. परंतु ते एकच कारण त्यांची भेट न होण्यामागे आहे काय? माहिती मिळते त्यानुसार, गोव्याचे प्रभारी म्हणून फडणवीस नियुक्त झाल्यापासून केंद्रालाही गडकरींनी गोव्यात राजकीय भूमिका पार पाडू नये, असेच वाटते. शिवाय फडणवीसांना गोव्यात पाठवल्यापासून गडकरींनी गोव्याकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे, हे दोन्ही नेते जरी नागपूरचे असले तरी दोघांमधून विस्तव जात नाही. महत्त्वाचे म्हणजे आज मंगळवारी भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस गोव्यात येत असून, दोघेही एकमेकांना भेटणार नाहीत. म्हणजे तसा कोणताही कार्यक्रम निश्चित झालेला नाही. ∙∙∙

राजकारणी सक्रिय!

योग्य व्यासपीठ मिळाले तर नेतृत्व गुणांना चालना मिळणे सोपे होते. कुंकळ्ळीने गोव्याला अनेक नेते दिले. माजी खासदार दिवंगत शांताराम नाईक, माजी खासदार रमाकांत आंगले, माजी आमदार दिवंगत दत्ताराम देसाई, दिवंगत शाबु देसाई या नेत्यांनी गोव्याच्या राजकारणात मोठे योगदान दिले आहे. आता एल्विस गोम्स व डॉ. जोर्सन फर्नांडीडिस यांच्या रूपाने दोन नेते राज्यस्तरीय राजकारणात सक्रिय होत आहे. एल्विसला कॉंग्रेसात व डॉ. जोर्सन यांना तृणमूलमध्ये भवितव्य आहे. आता त्या पक्षांशी चिकटून राहिल्यास भविष्यात कुंकळ्ळीचे नेतृत्व पुढे येणे शक्य आहे, त्यासाठी मेहनत व निष्ठेची गरज आहे. ∙∙∙

मुख्याधिकारी गायब!

म्हापसा पालिकेच्या मुख्याधिकारीपदाचा ताबा घेतलेले दीपेश ऊर्फ सीताराम सावळ त्या पहिल्या दिवशीच सायंकाळच्या सत्रात कुठे गायब झाले हे खुद्द पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही माहीत नव्हते. पालिकडेकडून परवाना न घेता शहरातील कार्वाल्हो पेट्रोल पंपाजवळ कार्यरत असलेल्या गडेकर यांच्या मालकीच्या व्यापारी संकुलाला 1 नोव्हेंबर रोजी सील ठोकावे, असे आदेश काही दिवसांपूर्वी तत्कालीन मुख्याधिकारी क्लेन मदेरा यांनी दिले होते; तथापि, त्याबाबत कारवाई झालीच नाही. या प्रकरणासंदर्भात नवीन मुख्याधिकाऱ्यांवरही राजकीय दबाव आल्याचा बोलबाला आहे. विशेष म्हणजे, ती कारवाई करण्याची जबाबदारी असलेले पालिका निरीक्षक विकास कांबळे व नरसिंह राटवळ आणि रोजंदारीवरील कामगारांचे निरीक्षक आनंद तलवार हेदेखील कामचुकारपणा करून पद्धतशीरपणे दिवसभर कुठल्या कुठे गायब झाल्याचे ऐकिवात आहे. त्या व्यापारी संकुलाविरोधात तक्रारी करणारे सामाजिक कार्यकर्ते दुपारपासून पालिका कार्यालयात उपस्थित होते. परंतु, तिथे मुख्याधिकारीच उपलब्ध नव्हते व मोबाइलवरील फोन कॉललाही ते प्रतिसाद देत नसल्याने ते अखेरीस घरी परतले. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT