Mining Belt Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Assembly Election: खाणींबरोबरच अन्‍य निकषही महत्त्‍वपूर्ण

दैनिक गोमन्तक

डिचोली: राज्यातील खाणपट्ट्यात झालेले मोठ्या प्रमाणातील मतदान सत्ताधारी भाजपला (bjp) अनुकूल ठरेल की प्रतिकूल, याचे आडाखे आता बांधले जात आहेत. मात्र उत्तर गोव्यातील मतदारसंघांचा विचार करता खाण अवंलबितांच्या संतापापेक्षाही अन्य निकष महत्त्‍वपूर्ण ठरण्‍याची शक्‍यता आहे.

मये, डिचोली, साखळी, थिवी, पर्ये आणि काहीअंशी हळदोणे हे खाणींच्या प्रभाव क्षेत्रात येणारे उत्तर गोव्यातील मतदारसंघ. प्रत्येक ठिकाणी खाण अवलंबितांची संख्या लक्षणीय आहे. मात्र यात अन्य पक्षांबरोबर भाजपशी निष्ठा असलेलेही मतदार आहेत. डिचोली मतदारसंघात भाजपला नोकऱ्यांचा विषय महागात पडल्याचे दिसते. जोपर्यंत केंद्राचे समर्थन नसेल तोपर्यंत हे उमेदवार खाणी सुरू करण्याविषयी काहीच करू शकणार नाहीत याचीही जाणीव मतदारांना होती. डिचोली येथील वासुदेव कवठणकर या खाण अवलंबिताने हीच भावना बोलून दाखवताना भाजपविरोध हा खाणबंदीशी संबधित नसल्याचे सांगितले.

सागर तळकर या अस्नोडा येथील तरुणाने कोणत्याही पक्षाने खाण लिलावाचा प्रस्ताव गंभीरपणे विचारात घेतला नसल्याचे सांगून राजकीय पक्षांचे खाण अवंलबितांवरील प्रेम तकलादू असल्याची कडवट प्रतिक्रिया व्‍यक्त केली. गेल्या दोन निवडणुकांत भाजपची (bjp) पाठराखण करणारे सूर्यकांत मांद्रेकर यांनी भाजपच केंद्राच्या साहाय्याने या प्रश्नावर समाधानकारक तोडगा काढू शकतो, असा दावा केला.

मये मतदारसंघात आपण अपक्ष उमेदवार मिलिंद पिळगावकर यांना मत दिल्याचे सांगणाऱ्या कारापूर येथील एका युवतीने खाणबंदी हा आपल्या मतदानाचा निकष नसल्याचे सांगितले. मयेतील खाण व्यवसायाशी संबंधित अनेक परिवारांतील युवक रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाच्या उमेदवारासाठीही वावरत असल्याचे आढळले. पर्ये मतदारसंघात तर केवळ दिव्या राणे यांना समर्थन की विरोध हाच मुद्दा अग्रस्थानी होता. खाणबंदीसह अन्य मुद्यांवर त्यांनी कुरघोडी केली.

मयेतून मगोपच्या तिकिटावर निवडणूक लढविलेले माजी आमदार प्रवीण झांट्ये यांनी खाणी लवकरच सुरू करण्यात येतील असे आश्वासन आपल्या जाहीरनाम्यात दिले होते. मात्र मतदारसंघातील काही युवकांनी या आश्वासनाची खिल्ली उडवताना ‘झांट्ये खाणी सुरू करण्यासाठी कोणताच ठोस पर्याय सुचवत नाहीत, केवळ हवेत बाण सोडतात’ अशी टिपणी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT