सासष्टी: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत फातोर्डातील मतदारसंघांतील मतदारांचा कल पाहता भाजपचे उमेदवार दामू नाईक याला 11 ते 12 हजार मतांची अपेक्षा असल्याचे फातोर्डा भाजप मंडळाचे अध्यक्ष मनोहर बोरकर यानी या प्रतिनिधीला सांगितले. या वेळी फातोर्डात कमळच फुलेल असे बोरकर याने आत्मविश्र्वासाने सांगितले.2017 मध्ये गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाईना 10516 तर दामू नाईकना (damu naik) 9182 मते पडली होती व विजय 1334 मतांनी निवडून आले होते. या वेळी गत निवडणुकीतील मतांचा फरक आम्ही भरुन काढू असेही अध्यक्षाने सांगितले.
फातोर्डामध्ये नगरपालिकेचे एकुण 11 प्रभाग आहेत. त्यातील 5,6,7 व 8 प्रभागमध्ये भाजप (BJP) प्रणित नगरसेवक आहेत. पाच मधील नगरसेविका श्र्वेता लोटलीकर हिने निवडणुकीच्या काही दिवस अगोदर दामू नाईकला पाठिंबा जाहीर करुन व त्याला प्रचारात मदत करुन या प्रभागात जास्त मतांची भर घातली आहे असे बोरकर यानी सांगितले.
सहा मध्ये सदानंद नाईक (Sadanand Naik), सात मध्ये मिलाग्रीन गोम्स व आठ मध्ये कामिल बार्रेटो या नगरसेवकांच्या अथक परिश्रमामुळे या भागात भाजपला जास्त मतांची अपेक्षा आहे. शिवाय प्रभाग 4, 9 व 11 मध्ये भाजपला जास्तीत जास्त मतांची आघाडी मिळेल असेही बोरकर म्हणाले.
एरव्ही पाजीफोंड येथील 11 प्रभागामध्ये आम्हाला जास्त मते पडत नसे. पण या वेळेस आम्हाला आघाडी मिळेल असा विश्र्वासही बोरकर यानी व्यक्त केला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.