Utapl Parrikar vs Babush Monserrate in Panaji constituency Dainik Gomantak
गोवा निवडणूक

'अप्रामाणिक विरुद्ध चारित्र्य' पणजीतील लढतीचे राऊतांनी केले वर्णन

उत्पल पर्रिकर सध्या गोव्यातील राजकारणाच्या चर्चेचा विशेष मुद्दा ठरत आहे.

दैनिक गोमन्तक

सध्या गोव्यातील राजकीय वातावरणाचे पडसाद राष्ट्रीय स्तरावरही उमटताना दिसत आहेत. गोव्यात दररोज मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. यामुळे गोवा राज्याच्या विधानसभा निवडणुकीकडे (Goa Election 2022) सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच उत्पल पर्रिकर सध्या गोव्यातील राजकारणाच्या चर्चेचा विशेष मुद्दा ठरत आहे. (Utpal Parrikar will contest as an independent candidate from Panaji constituency)

भाजपने (BJP) गोवा विधानसभा निवडणुकीसाठी 34 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र या यादीमध्ये उत्पल पर्रीकरांना (Utpal Parrikar) पुर्णपणे डावलण्यात आले. त्यांना पणजी मतदार संघातून तिकीट देण्यात आलं नाही त्यामुळे आता उत्पल पर्रिकर यानी पणजी मधूनच अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान त्यांच्या या निर्णयावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपावर टिकास्त्र सोडले आहे.

"गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकरांची वेदना मी समजू शकतो. उत्पल पर्रिकर यांना पक्ष सोडताना वेदना देण्याचं काम भाजपने केलं. पक्ष सोडताना अप्रत्यक्षपणे त्यांचा अपमान झाला आहे. उत्पल पर्रिकरांचा हा अपमान गोव्याची जनता कधीच विसरणार नाही. दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांनी ज्या जागेचे नेतृत्व केलं होतं, त्या जागेवर भाजपने भ्रष्टाचारी आणि आरोपी असलेल्या व्यक्तीला तिकीट दिलं. पर्रीकर यांनी देशात आपल्या राज्याचं नेतृत्व केलं होतं. लक्ष्मीकांत पार्सेकर यांना उमेदवारी नाकारनं भाजपला महागात पडणार आहे. आता पणजीतील लढत अप्रामाणिकता आणि चारित्र्य यांच्यात होणार आहे कारण उत्पल पर्रीकरांनी पणजी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे," असे मत उत्पल पर्रिकरांच्या निर्णयानंतर संजय राउत यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, उत्पल पर्रिकरांना आम आदमी पक्षाने (APP) आणि शिवसेना या दोन्ही पक्षंनी ऑफर दिली होती. मात्र ती ऑफर नाकारुन उत्पल यांनी पणजी मतदार संघातून अपक्ष उमेद्वार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या या निर्णयाची चर्चा राष्ट्रीय स्तरावरही होतांना दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

SCROLL FOR NEXT