आगामी काळात पाचा राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामध्ये गोवा राज्याचाही समावेश आहे. राजकीय पक्षांच्या प्रचारामुळे गोव्यात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. यातच गोव्यातही माहाराष्ट्राप्रमाणे महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत प्रयत्न करत होते. मात्र कॉंग्रेसने (Congress) कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न दिल्यामुळे ही आघाडी होऊ शकली नाही. याच पाश्वभूमीवर तृणमुलपासून ते कॉंग्रेसपर्यंत प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांची नावं घोषित करत आहे. मात्र सत्तेत असणारा भाजप (BJP) आपल्या उमेदवारांची यादी कधी जाहीर करणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहीलं आहे.
दरम्यान, आज नवी दिल्लीमध्ये भाजपच्या गोवा विधानसभा उमेदवारांवर चर्चा करण्यासाठी बैठक पार पडली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉलद्वारे उपस्थित होते. त्याचबरोबर भाजपशासित राज्यांचे प्रमुख नेते, भाजपचे निवडणूक प्रभारी आणि राष्ट्रीय महासचिव बी एल संतोषही उपस्थित होते.
तसेच, गोव्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत 'बाबू' कवळेकर, जे स्वत: संगेम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागत आहेत, त्यांनी पत्नी सावित्रीसाठी क्वपेम मतदारसंघातून तिकीट मागितले आहे. 'बाबू' कवळेकर (Chandrakant Kavlekar) काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते होते. कवळेकर 2019 मध्ये भाजपमध्ये गेले, मात्र आता त्यांच्या दोन तिकिटांच्या मागणीने भाजपची कोंडी केली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.