300 Youth Joinimed Goa TMC in Cumbarjua

 

Twitter/@ANewDawnForGoa

गोवा निवडणूक

कुंभारजुवेतील 300 युवक तृणमूलमध्ये दाखल

दैनिक गोमन्तक

खांडोळा: कुंभारजुवे (Cumbarjua) मतदारसंघात तृणमूल काँग्रेस पक्ष बळकट करण्यात येणार असून गावागावातून मतदारांचा पाठिंबा, सहकार्य लाभत आहे. अनेकजण स्वतःहून पक्षात प्रवेश करीत आहेत. आगामी पंधरा दिवसात काँग्रेस, भाजपचे कार्यकर्ते, स्थानिक नेते, पंच मोठ्या प्रमाणात तृणूमूलमध्ये प्रवेश करणार आहेत. काल काँग्रेसच्या 300 युवा कार्यकर्त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला, अशी माहिती तृणमूलचे कुंभारजुवे मतदारसंघातील नेते समील वळवईकर यांनी दिली.

यावेळी तृणमूलचे नेते किरण कांदोळकर, मारिया पिंटो, सुरेंद्र वळवईकर, श्री. फ्रान्सिस व इतर नेते यावेळी उपस्थित होते. गोव्यात टीएमसी पक्षाला अवघे काही महिनेच झाले, पण जनतेचा प्रचंड विश्‍वास पक्षांवर आहे. त्यामुळे गावागावात पक्षाबद्दल विश्‍वासाचे नाते निर्माण झाले आहे. गोव्यातील तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पाय मजबूत असून युवा वर्ग राज्यातील भाजप-काँग्रेसच्या (BJP-Congress) राजकारणाला कंटाळलेला आहे. त्यामुळे युवा वर्गासाठी हा पक्ष नव्या योजना राबविणार आहे. प्रत्येकाला रोजगार, गृहीणींना आधार दिला जाणार आहे. गोव्याला प्रगतिपथावर नेण्यासाठी तृणमूल काँग्रेस प्रयत्न करणार आहे, असेही वळवईकर यांनी सांगितले.

कांदोळकर (Kiran Kandolkar) म्हणाले, गेल्या आठवड्यात कुंभारजुवेतील माजी सरपंच, उपसरपंच, काही समाजकार्यकर्ते तृणमूलमध्ये दाखल झाले. त्यात 38 जण सक्रिय नेते आहेत. तृणमूल पक्ष युवा वर्गांच्या कल्याणासाठी कार्यरत असल्यामुळेच युवा-युवती राज्यात नवी पहाट सुरू करण्यासाठी तृणमूलमध्ये येत आहेत. राज्यात सुरू असलेला भ्रष्टाचार, नोकर भरतीतील फसवणुकीमुळे युवा वर्गावर अन्याय झाला आहे.

युवा वर्गाचे झालेले नुकसान भरून न येणारे आहे. त्यामुळेच गोव्याच्या प्रगतीसाठी, युवा वर्गाच्या उत्तम शिक्षण, रोजगारासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. पक्षात कोणताही भेदभाव नाही, जातपात नाही, त्यामुळे सर्वधर्मिक कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे. तळागाळातील मतदारांपर्यंत विकास योजना पोचविण्याचे ध्येय तृणमूलचे आहे.

पंच, नेतेही तृणमूलमध्ये?

विधानसभा निवडणुकी (Goa Election) जाहीर होण्यापूर्वीच कुंभारजुवे मतदारसंघात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. इतर पक्षातील अनेक कार्यकर्ते संपर्कात आहेत. काही पंच, नेतेही लवकरच तृणमूलमध्ये प्रवेश करणार आहेत. ममता दीदींची ध्येय धोरणे, विकासाचे मॉडेल मतदारांना पसंत पडले आहे. त्यामुळे कोणतीही अपेक्षा न ठेवता कार्यकर्त्‍यांची संख्या वाढत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: हणजूण येथे कंस्ट्रक्शन साइटवरुन पडून पश्चिम बंगालच्या मजूराचा जागीच मृत्यू!

Goa Vacation: बस, ट्रेन, विमान! सुट्टीत पुणे, मुंबईतून गोव्याला जाण्यासाठी कोणता पर्याय चांगला, किती रुपये मोजावे लागतील?

Borim News: गोव्यासाठी गुड न्यूज! बोरी पुलासाठी भारत सरकारकडून अधिसूचना जारी; लवकरच होणार पायाभरणी

Goa Dengue Cases: मडगावात डेंग्यूचे तुरळक प्रमाणात रुग्ण! तातडीने उपाययोजना केल्याचा परिणाम

Harvalem Panchayat: कोण बाजी मारणार? हरवळे पंचायत निवडणूकीवर सर्वांचे लक्ष

SCROLL FOR NEXT