Mapusa: बेकायदा नोकरभरतीवरून म्‍हापसा पालिका बैठक तापली; 20 पैकी 11 नगरसेवकांचे ‘वॉक आऊट’

Cash For Job Scam: नोकरभरतीचा मुद्दा शशांक नार्वेकर यांनी उपस्थित केला. तसेच तारक आरोलकर यांची नोकरभरतीची फाईल बैठकीसमोर ठेवण्याची मागणी केली.
Mapusa: बेकायदा नोकरभरतीवरून म्‍हापसा पालिका बैठक तापली; 20 पैकी 11 नगरसेवकांचे ‘वॉक आऊट’
Mapusa Municipal CouncilDainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa Municipal Council

म्हापसा: म्‍हापसा नगरपालिकेच्या आज झालेल्या बैठकीत नोकरभरतीचा मुद्दा गाजला आणि २० पैकी ११ नगरसेवकांनी ‘वॉक आऊट’ केलं. नगराध्यक्षा डॉ. नूतन बिचोलकर या बेकायदेशीरपणे नोकरभरती करत आहत, असा आरोप या नगरसेवकांनी केला.

दरम्‍यान, ११ नगरसेवकांनी बैठकीतून काढता पाय घेतल्याने अखेर ही बैठक तिसऱ्यांदा तहकूब करण्याची नामुष्की बिचोलकर यांच्यावर ओढवली.

‘वॉक आऊट’ केलेल्या नगरसेवकांमध्ये प्रकाश भिवशट, तारक आरोलकर, विराज फडके, शशांक नार्वेकर, कमल डिसोझा, के. एल. ब्रागांझा, अन्वी कोरगावकर, सुधीर कांदोळकर, आनंद भाईडकर, विकास आरोलकर व शुभांगी वायगंणकर यांचा समावेश होता.

Mapusa: बेकायदा नोकरभरतीवरून म्‍हापसा पालिका बैठक तापली; 20 पैकी 11 नगरसेवकांचे ‘वॉक आऊट’
12th Fail अभिनेत्याकडे नव्हते गोव्यात हॉटेलचे बिल द्यायला पैसे, मुंबईच्या तिकिटासाठी विकला मोबईल; विक्रांतने सांगितला किस्सा

नोकरभरतीचा विषय ॲड. शशांक नार्वेकर यांनी उपस्थित केला. त्याला नगरसेवक भिवशेट यांनीही पाठिंबा देत नगराध्यक्षावर प्रश्नांची सरबत्ती केली जोपर्यंत भरती प्रक्रियेचा विषय मार्गी लागत नाही, तोपर्यंत नियुक्त केलेल्या सहा कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुढील पगार देऊ नये तसेच व्यवस्थित प्रक्रिया पार करूनच ही भरती प्रक्रिया करावी, असे या नगरसेवकांनी सांगितल.

नगराध्‍यक्षांवर खोटारडेपणाचा आरोप

नगराध्यक्षा बिचोलकर यांच्या म्‍हणण्‍याप्रमाणे, एकाने डीएमएकडे याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत या नोकरभरतीचा विषय चर्चा करू शकत नाही. मात्र नगरसेवकांनी नगराध्यक्षाचे प्रत्येक दावे खोडून काढले. तुम्ही खोटारडेपणा करत असून म्हापसेकरांची फसवणूक करत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.

Mapusa: बेकायदा नोकरभरतीवरून म्‍हापसा पालिका बैठक तापली; 20 पैकी 11 नगरसेवकांचे ‘वॉक आऊट’
Anmod Ghat: 17 तासानंतर अनमोड घाटातील कोंडी फुटली; बेळगाव-गोवा मार्ग वाहतुकीस खुला

बैठक करावी लागली तिसऱ्यांदा तहकूब

नोकरभरतीचा मुद्दा शशांक नार्वेकर यांनी उपस्थित केला. तसेच तारक आरोलकर यांची नोकरभरतीची फाईल बैठकीसमोर ठेवण्याची मागणी केली. मात्र या प्रकरणी डीएमए आणि दक्षता खात्याकडे तक्रार दाखल होत प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे नगराध्यक्षा नूतन बिचोलकर यांनी सांगितले.

तसेच पालिका कायद्यानुसार प्रकरण चर्चेस घेण्यास नकार दिला. त्‍यामुळे नगरसेवक संतापले व त्‍यांनी नगराध्‍यक्षांवर प्रश्नांचा भडिमार के ला. तरीसुद्धा नगराध्यक्ष एकत नसल्याचे पाहून ११ नगरसेवकांनी सभात्याग केला. त्यामुळे नगराध्यक्षांना नाईलाजास्तव बैठक तिसऱ्यांदा तहकूब करावी लागली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com