Art Deco Architecture Goa Dainik Gomantak
गोंयची संस्कृताय

गोव्याच्या वसाहतकाळातील 'सांस्कृतिक' टप्पा सांगणारी वास्तू; आधुनिकता, स्थानिक शैलीचा संगम असणारी Praca do Comercio

Art Deco Architecture Goa: स्थापत्य रचनांपैकी एक विशेष आकर्षक शैली म्हणजे, पणजी शहराच्या लॅंडस्केपला एकेकाळी आकार देणारी स्थापत्य शैली-'आर्ट डेको'.

Sameer Panditrao

लॅक्सन फ्रिटास

पणजी शहरातील आर्ट डेको शैलीत बांधलेल्या इमारतींची ओळख करून देण्यासाठी 'गोंयची डेको'च्या लॅक्सन फ्रिटास यांनी 18 जानेवारी रोजी एक विशेष पदभ्रमण कार्यक्रम आयोजित केला होता. आर्ट डेकोचे सौंदर्य आणि महत्त्व समोर ठेवताना या कमी ओळख असलेल्या वास्तूंबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा त्यामागचा हेतू होता. फ्रिटास हे व्यवसायाने कम्प्युटर सायन्स अभियंते असले तरी गोव्याचा स्थापत्य इतिहास जतन व्हावा यासाठी तळमळीने कार्य करणारे ते एक कार्यकर्ते आहेत.

समुद्रकिनारे, नाईटलाइफ, मंदिरे, चर्च, पाऊस या पलीकडे गोव्याच्या सांस्कृतिक अस्मितेचा आणखीन एक आकर्षक पैलू आहे तो म्हणजे गोव्याचा अनोखा आणि वैविध्यपूर्ण स्थापत्य वारसा. गोमंतकीय घरांचे अनोखे स्थापत्य अनेकांना मोहवित असते.

अशा स्थापत्य रचनांपैकी एक विशेष आकर्षक शैली म्हणजे, पणजी शहराच्या लॅंडस्केपला एकेकाळी आकार देणारी स्थापत्य शैली-'आर्ट डेको'. मोठ्या शहरांच्या संदर्भात ‘आर्ट डेको’ हा शब्द आपल्या डोळ्यांसमोर गगनचुंबी इमारतींच्या प्रतिमा निर्माण करू शकतो, मात्र ही स्थापत्य शैली वापरून गोव्यात बांधल्या गेलेल्या इमारतीमध्ये या शैलीतील आधुनिकता दिसून येत असली तरी त्यावरचा स्थानिक प्रभावही ठळकपणे जाणवतो. 

पणजी शहरात 'आर्ट डेको' शैलीत बांधलेल्या इमारतींचे उदाहरण म्हणजे १८ जून रस्त्याच्या पूर्व टोकाला असलेली 'प्राका दो कॉमर्सियो' ही इमारत. ही इमारत आर्ट डेको शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. जगात ज्याकाळी आर्ट डेकोचा दबदबा ऐनभरात होता त्या काळातच ही इमारत बांधली गेली आहे.

९० वर्षांपूर्वी बांधल्या गेलेल्या 'प्राका दो कॉमर्सियो'चा भौमितिक आकार आणि त्याचे आधुनिक रूप यावर प्राचीन मेसोपोटेमियन कलेचा प्रभाव असून तत्कालीन रचनेच्या सौंदर्यशास्त्राचा ही इमारत म्हणजे एक दाखला आहे.

या इमारतीच्या कडेला असलेली दगडी खांबांची रांग (कॉलोनेड) आणि ऊन आणि पावसापासून बचाव करणारे त्यावरचे छप्पर गोव्याच्या हवामानाशी पूर्णपणे जुळवून घेणारे आहे. ही इमारत केवळ स्थापत्य रचनेतील उत्कृष्ट नमुना नाही तर गोव्याच्या संदर्भातील वसाहतकाळातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक टप्पा सांगणारी ती एक  महत्त्वाची खूण आहे. या इमारतीचा वास्तुरचनाकार एक गोमंतकीय होता ज्याचे नावं होते, लुई बिस्मार्क डायस, ज्याने दोनापावला व्हयू-पॉइंट तसेच वास्को शहरातील महत्त्वाच्या इमारतींची रचना केली.

‘आर्ट डेको’ ही एक रचनाशैली आहे. या शैलीतून रचना केलेले काहीही असू शकते- रेडिओ, टोस्टर, फर्निचर, गाड्या, इमारती इत्यादी. सुमारे १९२५च्या दरम्यान पॅरिसमध्ये या शैलीचा उगम झाला.‌ त्या काळातील ही एक फ्युचरिस्टिक (भविष्यावेधी) शैली होती.‌ फ्युचरिस्टिक असली तरी अनेक भूतकालीन संस्कृतींमधून या शैलीने प्रेरणा घेतली होती. १९२० मध्ये इजिप्तमध्ये एक प्राचीन थडगे सापडले. त्यानंतर अचानक साऱ्यांना इजिप्शियन संस्कृतीमध्ये कुतूहल निर्माण झाले.‌ त्यानंतर अनेक बांधकामांमध्ये इजिप्शियन वास्तुरचना शैलीचा अंतर्भाव होऊ लागला. 

त्या काळात आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने अनेक गोमंतकीय गोव्याबाहेर तसेच देशाबाहेर फिरत असत. त्यांच्यावर अशा आधुनिक रचनांचा प्रभाव नक्कीच पडला असेल. या लोकांनी गोव्यात स्वतःची घरे किंवा इमारती बांधताना त्यामुळे या शैलीचा वापर आपल्या बांधकामात केला.‌ आज गोव्यात अनेक अशा वारसा वास्तू आहेत ज्यांची उभारणी त्या काळात ‘आर्ट डेको’ शैलीत झाली होती. आज एखाद्या चुकीच्या कारणासाठी जरी त्यांचा उल्लेख 'पोर्तुगीज शैलीतील घरे' असा होत असला तरी ती अस्सल गोमंतकीय वारसा घरे आहेत हे आपण विसरता कामा नये.‌ गोव्यात आर्ट डेको शैली आम्हाला फक्त घर किंवा इमारतीत दिसणार नाही तर खिडक्या, कंपाउंड इत्यादीमध्येसुद्धा दिसून येईल. 

आर्ट डेकोची ओळख करून देण्यासाठी मी गेल्या आठवड्यात पणजी शहरात पदभ्रमण आयोजित केले होते. दहा लोक यात सामील झाले होते.‌ या शैलीचा इतिहास आणि त्याचा गोव्यावर असणारा प्रभाव दाखवून देणे हा माझा या पदभ्रमणामागील हेतू होता.‌ एखादी इमारत ‘आर्ट डेको’ शैलीत बांधलेली आहे की नाही हे‌ कसे ओळखावे हे मी त्यांना त्यात समजावून सांगितले. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

Durand Cup: 'ड्युरँड कप' होणार गोव्याशिवाय! गोमंतकीय संघांची नोंदणी नाही; संघ बांधणी प्रक्रिया पूर्ण नाही

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

SCROLL FOR NEXT