Goa Bonderam Festival 2024 Goa Tourism
गोंयची संस्कृताय

या विकेंडला काहीतरी खास करा; गोव्यातील हटके बोंदेरा उत्सवाचा आनंद घ्या, जाणून घ्या वेळापत्रक

Bonderam Festival 2024 Goa: १७ ऑगस्ट रोजी सुरू होणाऱ्या बहुप्रतीक्षित बोंदेरा महोत्सवाची तयारी करण्यात सां माथियस प्रभागातील गावकरी सध्या गुंतलेले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

दिवाडी बेटावर प्रसिद्ध बोंदेरा उत्सव, गावातील दोन प्रभागांत दोन वेगवेगळ्या शनिवारी साजरे केले जातात. आदल्या शनिवारी सां माथियस या प्रभागात हा उत्सव साजरा होतो तर पुढील शनिवारी तो पिएदाद या प्रभागात साजरा होतो.‌

सां माथियास प्रभागात साजरा होणारा बोंदेरा उत्सव हा अधिक पारंपारिक पद्धतीने साजरा होतो तर पिएदाद  प्रभागात साजरा होणाऱ्या बोंदेरा महोत्सवाला आधुनिक ग्लॅमरचा स्पर्श झालेला दिसतो. 

जर आपल्याला पारंपरिक पद्धतीने साजरा होणाऱ्या बोंदेरा महोत्सवातील मौजेचा अनुभव घ्यायचा असेल तर येत्या १७ ऑगस्ट रोजी दिवाडी बेटावरील सां माथियस प्रभागात साजरा होणाऱ्या बोंदेरा महोत्सवाला अवश्य भेट द्या. 

शनिवारी, १७ ऑगस्ट रोजी सुरू होणाऱ्या बहुप्रतीक्षित बोंदेरा महोत्सवाची तयारी करण्यात सां माथियस  प्रभागातील गावकरी सध्या गुंतलेले आहेत.

या महोत्सवात पारंपारिक पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या अनेक कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढील प्रमाणे असेल: 

सर्वप्रथम सकाळी ११ वाजता या गावचे रहिवासी,फेस्ताकार मारियस फर्नांडिस यांनी संयोजित केलेल्या पातोळ्यांच्या फेस्ताने या महोत्सवाची सुरुवात होईल. या कार्यक्रमात वेगवेगळ्या कार्यशाळा आणि व्याख्याने यांचा अंतर्भाव असेल.‌

जीईडी टॉक्स (ग्रीन एज्युकेशनल टॉक्स) या उपक्रमात प्रसिद्ध पर्यावरणवादी राजेंद्र केरकर पर्यावरण आणि वाघांच्या संवर्धनाचे महत्त्व कथन करतील तर शेती महाविद्यालयाचे प्राचार्य हळदीच्या पानांचे फायदे आणि महत्व उपस्थितांना विशद करतील. आपल्या परंपरांची माहिती देणारा हा कार्यक्रम म्हणजे एक आकर्षक शैक्षणिक अनुभव असेल.

त्यानंतर दुपारी पारंपारिक जेवण आयोजित केले गेले आहे. पारंपारिक जेवणानंतर गावच्या पासयला (पदयात्रेला) सुरुवात होईल. या फेरीत पाहुण्यांना त्या सुंदर गावाचे दर्शन करून दिले जाते व त्याचबरोबर या फेरीत‌ ग्रामस्थांच्या सांस्कृतिक कलागुणांचे तसेच त्यांच्या पाककलेचे प्रदर्शनही होते.

जर आपल्याला अस्सल पारंपारिक स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल तर या फेरीत अवश्य सहभागी व्हा. या पदयात्रेत अनेक घरांसमोर तिथल्या स्त्रिया वेगवेगळे चविष्ट अन्नपदार्थ  घेऊन आपले स्वागत करायला सज्ज असतील. त्यांच्या आनंदात तुम्ही सहभागी होत आहात याबद्दलची ती कृतज्ञता असेल.

वॉन, पुडे (फोले), आलेबेले, लातोड या पारंपारिक स्वादिष्ट पदार्थांची नावे आतापर्यंत आपण केवळ ऐकली असतील पण त्यांचा आस्वाद घ्यायचा असेल तर हा उत्सव एक संधी असते. त्याचबरोबर पातोळ्या, सान्ना, शिरा, गोडशे (यंदा साष्टी स्पेशल) यांचाही आस्वाद आपल्याला पासयच्या दरम्यान घेता येईल. 

त्यानंतर  पारंपारिक फ्लोट-परेड‌ बरोबर संध्याकाळ अधिक रंगीत बनेल. या फ्लोटमध्ये दिवाडी बेटाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तेथील गावकरी सादर करतात. फ्लोट-परेड नंतरच्या म्युझिकल नाईटमध्ये लिंक्स बँड, डीजे मेकॅटॅक, मीरा मीरा फेम सुप्रसिद्ध संगीतकार सेबी फर्नांडिस सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी सिद्ध असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

Chandel Hasapur: सरपंचालाच मिळाली सरकारी नोकरी, पदासह दिला पंच सदस्यत्वाचा राजीनामा; चांदेल हसापूरमध्ये रंगणार रस्सीखेच

Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT