Mayabhushan Nagvenkar Instagram
गोंयची संस्कृताय

Goa 2075 देशातील पहिली लाईव्ह कादंबरी; अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या पाच व्यक्तींची कथा

Goa 2075 Novel: कादंबरीची मराठी आवृत्ती दर मंगळवार आणि शुक्रवार रोजी तर इंग्रजी आवृत्ती बुधवार आणि शनिवार रोजी अपडेट होते.

गोमन्तक डिजिटल टीम

गुलजार हे भारतातील महान गीतकारांपैकी एक होते आणि त्यांचा 'नमक इश्क का..' हा ओरल सेक्सचा एक प्रकार आहे', तो लठ्ठ माणूस म्हणाला." ही वाक्ये पत्रकार मायाभूषण नागवेकर यांच्या समाज माध्यमावर (इंस्टाग्राम /फेसबुक) चालू असलेल्या लाईव्ह कादंबरीच्या प्रस्तावनेत येतात आणि वाचणारा थोडासा चक्रावतोच. ही भाषा काहीशी वेगळी आहे. 

गेल्या १७ ऑक्टोबरपासून ‘गोवा< 20७५’ ही त्यांची कादंबरी समाज माध्यमावर प्रकाशित व्हायला सुरुवात झाली आहे. मराठी बरोबरच इंग्रजी भाषेत देखील ही कादंबरी इन्स्टाग्राम,फेसबुक, लींकेदिन आणि ट्विटर या चार प्लॅटफॉर्मवर समांतरपणे चालू आहे.

मायाभूषण नागवेकर यांच्या दाव्यानुसार समाज माध्यमावर प्रकाशित होणारी भारतातील ही पहिलीच लाईव्ह द्वैभाषिक कादंबरी आहे. या कादंबरीचा काळ 2075 च्या सुमाराचा असल्याने भविष्यातील क्रांतीकारक बदलांचा वेध घेऊन मायाभूषण नागवेकर यांनी त्याची रचना केली आहे.

या काळात सत्ताधारी-विरोधक अशी राजकीय रचना शिल्लक राहिलेली नाही. गोव्यात 'लोकशाही महामंडळ' स्थापन झाले आहे आणि ते राज्यकारभार चालवते आहे. या काळात जमिनीच्या पृष्ठभागावर राहणारे आणि भूगर्भात राहणारे अशी लोकांची विभागणी झाली आहे.

समाज पुढारलेला असला तरी गरीब-श्रीमंत हा भेद आहे आणि अन्यायांचे अस्तित्व देखील आहे. ही कादंबरी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी कटिबद्ध असणाऱ्या पाच व्यक्तींची कथा आहे. या कादंबरीची मराठी आवृत्ती दर मंगळवार आणि शुक्रवार रोजी तर इंग्रजी आवृत्ती बुधवार आणि शनिवार रोजी अपडेट होते.

रविवार 30 जून रोजी पिळर्णमधील म्युझियम ऑफ गोवा (मोग) येथे मायाभूषण यांच्या या कादंबरीवर चर्चा आयोजित झाली होती. त्यावेळी मायाभूषण यांनी आपल्या या अनोख्या उपक्रमाची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.

ते म्हणाले, ‘समाज माध्यमांवर ही कादंबरी लाईव्ह येत असल्याकारणाने, मी ती लहान भागात लिहितो. दर आठवड्याला सुमारे एक हजार शब्द इंग्रजी आणि मराठीत प्रत्येकी मी अपलोड करतो.

इंस्टाग्राम ग्रीड प्रत्येक पोस्टसाठी १0 स्लॉटची अनुमती देते. पहिल्या स्लाइडमध्ये क्रिएटिव्ह प्रतिमा असते आणि शेवटची स्लाईड कादंबरीसंबंधीच्या निवेदनाची आहे त्यामुळे मला आठ स्लाईड शब्दांसाठी मिळतात. या स्लाइड्समध्ये ५2५ ते ५५0 शब्द सामावून घेता येतात, जे जास्तीत जास्त पाच मिनिटात वाचता येतात.'

मायाभूषण यांनी आपल्या या कादंबरीत, समकालीन काळात गोव्यात घडत असलेल्या आणि गोव्याशी संबंधित असलेल्या अनेक घटनां कौशल्याने गुंफल्या आहेत. त्यांची ही कादंबरी अजून पूर्णतः लिहून तयार नाही पण जसजसा काळ जाईल आणि जसजशा घटना घडत राहतील तसतसा या कादंबरीचा त्या भाग होत राहतील.

पण पुढील चार सीझनमध्ये या कादंबरीत गोव्याची जमीन आणि वातावरण, कॅसिनो, खाण उद्योग आदी गोव्याशी संबंधित असलेल्या घटकांचा उहापोह होत राहील. चार सीझनमधून वाचकांच्या भेटीला येणाऱ्या या कादंबरीचा आवाका साधारण ६0,000 शब्दांचा असेल असे मायाभूषण सांगतात.

कथानक पुढे सरकत जाईल तशा वाचकांच्या सूचना देखील कादंबरीत समाविष्ट करण्याचा त्यांचा विचार आहे. ‘कादंबरी भविष्यकालीन ठेवल्याने मला माझ्या विषयांचा शोध घेण्यास आणि कथानक व्यापक करून ते अधिक प्रखर बनवण्यास स्वातंत्र्य मिळते. गोवा हे माझे राज्य असल्याने त्यातील घडामोडी माझ्या कादंबरीत मांडण्यात मला मुख्य स्वारस्य आहे.

घटनांचे भविष्य अनिश्चित आहे आणि मी माझ्या लेखनाशी ते जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो आहे', असे मायाभूषण आपल्या कादंबरीविषयी बोलताना पुढे म्हणाले.

 गोव्याचा एक ज्येष्ठ पत्रकार गोव्यातील घडामोडींवर आधारित एक भविष्यकालीन कादंबरी, दोन भाषांमधून समाज माध्यमांवरून प्रकाशित करतो आहे ही बाब नक्कीच कौतुकाची आहे.

एका पत्रकाराच्या नजरेतील गोवा, त्याच्यामधील साहित्यिक कसा मांडतो हे जाणून घेणे देखील औत्सुक्यपूर्ण असेल. ‘goa.20७५’ हे शब्द टाईप करून आपण या कादंबरीला समाज माध्यमावर फॉलो करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

SCROLL FOR NEXT