Portuguese Rule in Goa Dainik Gomantak
गोंयची संस्कृताय

Goa Education System: मंदिरात आणि झाडाखाली भरायचे वर्ग! पोर्तुगीज राजवटीत गोव्यात कशी होती शिक्षण पद्धती?

गोमन्तक डिजिटल टीम

Education System In Goa During Portuguese Rule

पणजी: ४५० वर्षे पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीखाली राहिलेला गोवा म्हणजे समुद्राच्या किनारी वसलेले एक छोटेसे राज्य, इवल्याशा राज्याचा इतिहास फार जुना आणि विस्तृत आहे. १५१० पासून पोर्तुगीजांनी गोव्यात पाय रोवण्यास सुरुवात केली.

भारताचा भाग असून देखील पोर्तुगीजांच्या काळात गोव्यातील नागरिकांना परवाना काढत प्रवास करावा लागायचा, म्हणजेच काय तर भारताचेच एक राज्य असून गोवेकर स्वतःच्याच देशात परप्रांतीय बनले होते. व्यवसायाच्या उद्दिष्टाने आलेल्या पोर्तुगीजांना गोवा बऱ्यापैकी रुचला आणि पुढे भारतातील पोर्तुगीज कॉलनी म्हणून गोव्याची ओळख निर्माण झाली.

पोर्तुगीज पूर्व शिक्षण पद्धती

असे म्हणतात एखाद्या प्रदेशावर हुकूम गाजवायचा असेल तर शिक्षणपद्धती हा एक उपयुक्त मार्ग ठरू शकतो, कारण शिक्षणाद्वारे विचारधारेचा प्रचार करणे सहज शक्य होते. पोर्तुगीज गोव्यात येण्याआधी भारतातील इतर भागांप्रमाणेच इथे देखील बऱ्यापैकी भारतीय शिक्षणपद्धतीचा अवलंब केला जायचा.

व्हेरिसिमो कुन्हतीनो यांनी लोयोला युनिव्हर्सिटी शिकागो येथे प्रदर्शित केलेल्या Goa's History of Education: A Case Study of Portuguese Colonialism या अभ्यासपत्रिकेतून माहिती मिळते की पोर्तुगीज येण्याआधी गोव्यात शिक्षित ब्राम्हण समाजातील पुरुषांकडून शिक्षण विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जायचे, काही वेळा प्राथमिक शिक्षकांमध्ये सारस्वत ब्राम्हणांचा शिक्षक म्हणून सहभाग असायचा.

पोर्तुगीज कालीन शिक्षण पद्धती

वर्ष १५१० मध्ये झालेल्या पोर्तुगालीन आक्रमणानंतर पणजी, फोंडा, मडगाव आणि म्हापसा अशा प्रमुख ठिकाणीच शैक्षणिक संस्था चालायच्या. पोर्तुगीज मराठी माध्यमातून चालणाऱ्या शिक्षण पद्धतीचा विरोध करत. इतिहास अभ्यासक संजीव सरदेसाई सांगतात की, त्याकाळात पोर्तुगीज केवळ पोर्तुगालीन भाषेतून दिल्या जाणाऱ्या शिक्षणावर जोर देत असत.

काळ एवढा बिकट होत असताना देखील गोमंतकातील नागरिकांनी स्वभाषेतील शिक्षणाला कायमचा पूर्णविराम लागू दिला नाही. शेजारी राज्य महाराष्ट्रातून अशावेळी शिक्षक बोलावून इयत्ता १ली ते ४थी पर्यंत शिक्षण मातृभाषेतून दिलं जायचं. एखाद्या मंदिराच्या आवारात किंवा झाडाच्या खाली असे वर्ग भरायचे, अनेकवेळा या शाळा एकशिक्षकी देखील असायच्या.

परकीय आक्रमणानंतर सरकारी कामकाज पूर्ण करण्यासाठी पोर्तुगालमधून कर्मचारी आणणं कठीण असल्याने स्थानिकांना कामावर रुजू करून घेण्यासाठी पोर्तुगीजांनी बऱ्यापैकी गोव्यातील शिक्षण पद्धतीचा वापर केलेला दिसून येतो.

सुरुवातील धर्मनिरपेक्ष शाळांमधून झालेली ही सुरुवात कालांतराने बदलत गेली आणि पॅरिश शाळांच्या माध्यमातून पोर्तुगीजांकडून धार्मिक शिक्षण द्यायला सुरुवात झाली. पोर्तुगिजांच्या सत्तेत ११+४ या पद्धतीचा अवलंब केला जायचा.

परकीय सत्तेचे अधिराज्य असतानाच गोव्यात सशस्त्र आणि शैक्षणिक क्रांती घडत होती. याचे प्रमुख उदाहरण म्हणून फोंड्यातील सावईवेरे या गावात सवाईकरांच्या घरात चालणारी शाळा नक्कीच ग्राह्य ठरते.

Goa during 1950

महत्वाचा मुद्दा म्हणजे याच शाळेत गोव्यातील क्रांतिकारी पद्मनाभ आणि श्राद्धताई सावईकर यांना पद्मश्री (स्वर्गीय) मोहन रानडे यांच्याकडून शिक्षणाचे धडे देण्यात आले होते. या शाळांमधून स्थानिक तरुणांच्या मनात जन्मभूमीप्रती प्रेमाचं बीज रोवले जायचे.

इतिहास पाहता पोर्तुगीजांकडून शिक्षणावर बंदी आणल्याचे, विशेषकरून महिलांना शिक्षणापासून दूर ठेवल्याची उदाहरणे दिसून येत नाहीत. गोव्यात पोर्तुगीजांची सत्ता असताना शिक्षणावर बंदी नसली पोर्तुगीज भाषेचा एक विषय अनिवार्य करण्यात आला होता.

तसेच स्थानिक कार्यालयीन कामकाज देखील बऱ्यापैकी पोर्तुगालीन भाषेतून केले जायचे, आज देखील जुनी कागदपत्र उघडून पाहिल्यास पोर्तुगीज भाषेत नावं लिहिलेली आढळतात, जसे की भट या शब्दाच्या जागी भोटो असा शब्दप्रयोग.

पोर्तुगीज सत्तेत वावरत असताना बनलेले जन्मदाखले, लग्नाचे दाखले किंवा जमिनीच्या कामकाजाची कागदपत्रं आज देखील पोर्तुगीज भाषेत लिहिलेली पाहायला मिळतात. आत्ताच्या घडीला गोव्यात प्रसिद्धी कमावलेली एक शाळा म्हणजे मुष्टीफंड, मात्र या नावामागे देखील एक रंजक कहाणी दडलेली आहे.

महाराष्ट्रामधून येणाऱ्या शिक्षकांना स्थानिकांकडून पैसे गोळा करून पगार दिला जायचा आणि म्हणूनच मूठभर पैसे जवळ करून सुरु झालेली ही शाळा मुष्टीफंड म्हणून ओळखली जाते. प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर शिक्षणाची गोडी असलेल्या गोवेकरांना त्याकाळी सीमा ओलांडण्याशिवाय पर्याय उपलब्ध नव्हता.

Goans during portuguese rule

पोर्तुगीज सत्तेच्या काळात कॉन्व्हेंट संस्थांमधून उच्च शिक्षण दिले जायचे ज्यांची स्थापना मिशनऱ्यांनी केली होती. सेंट पॉल सारख्या कॉलेजमध्ये त्याकाळी आशियाच्या विविध भागांमधून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असंत. स्थानिकांमध्ये धर्माचा प्रचार करणे हेच प्रमुख उद्दिष्ट असल्याने धार्मिक आदेशांद्वारे चालवल्या जाणाऱ्या या शैक्षणिक संस्थांची बऱ्यापैकी भरभराट झाली होती.

Dada Vaidya and Almeida School

मातृभाषेतून शिक्षण घेण्याचा तो काळ जरी कठीण असला तरीही विद्यावर्धक मंडळ किंवा विद्याप्रसारक मंडळ यांसारख्या शैक्षणिक संस्थांकडून वेळोवेळी मातृभाषेतील शिक्षणाला प्रोत्साहन दिले जायचे. फोंड्यात दादा वैद्यांकडून याच काळात A. J. de Almeida High School ची स्थापना करण्यात आली होती.

दिवस सरताना गोव्यात मिलिटरी अकादमी, फार्मसी (Escola Medico e' Cirurgica) वैद्यकीय, टीचर्स ट्रेनिंग स्कुल यांसारख्या शैक्षणिक संस्थांची उभारणी घडून आली, मात्र इथे शिक्षण केवळ पोर्तुगीज भाषेतून दिले जात असे. दरम्यान गोव्यात सुरु झालेल्या प्रिंटिंग प्रेसमुळे शिक्षणपद्धती वृद्धिंगत व्हायला मदत मिळाली आणि स्थानिकांचा दृष्टिकोन प्रगतिशील होत गेला.

पोर्तुगीजांनंतर घडून आलेले बदल

पोर्तुगिजांचा काळ संपत असता गोव्यात इंग्रजी माध्यमातून शिक्षणाची सुरुवात झाली होती, मात्र हा अभ्यासक्रम महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून ठरवला जात असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी पुणे किंवा मुंबईमध्ये जाणे भाग होते.

सेंट जोसेफ हायस्कूल,सेंट झेवियर्स हायस्कूल,न्यू इंग्लिश हायस्कूल,लोयोला हायस्कूल आणि अशा अनेक शाळांची सुरुवात पोर्तुगीज काळातच झाली होती.

Portugueses rule in gao

वर्ष २०१९-२१ च्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणानुसार गोव्याचा साक्षरता दर ९३.२ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे, आणि हे आकङे बघता गोव्यातील शिक्षणपद्धती राज्याच्या मुक्तीनंतर वृद्धिंगत होताना दिसते. सध्या गोव्यात नवीन शैक्षणिक धोरणाचा अवलंब केला जातोय आणि परिणामी आणखीन कोणते बदल घडून येतील हे पाहणे रंजक ठरेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: विद्यार्थ्यांच्या भांडणात तिसरीतली विद्यार्थीनी गंभीर जखमी, अत्यवस्थ होऊनही शाळेचे दुर्लक्ष; पालक संतप्त

Sunburn Festival 2024: ‘आमका नाका सनबर्न’! गावपण टिकवण्यासाठी कामुर्लीत स्थानिक एकवटले

Bollywood Actress Alia Bhatt: हसमुख आलियाचा हॉट अंदाज चाहत्यांना मोहीनी घालतोय!

Goa Eco Sensitive Zone बाबत 'सरकारचे' म्हणणे पोचण्याआधी 'ग्रामस्थांची निवेदने' दिल्लीत पोचली; पैंगीण, लोलयेचे जैवविविधतेला प्राधान्य

Kulem Accident: 'देव तारी त्याला कोण मारी'; कुत्रे आडवे आल्याने झाला विचित्र अपघात; दोघे आश्‍चर्यकारकरित्या बचावले

SCROLL FOR NEXT