London Karens Hotel Dainik Gomantak
ग्लोबल

अजबच! हॉटेल कर्मचारी ग्राहकांची पुरेपुर इज्जत काढतात; तरीही होते तूफान गर्दी

London Karens Hotel: जेव्हा लोक हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जातात तेव्हा ते साहजिकच तेथील सर्व्हिस आणि सुविधा पाहतात.

Manish Jadhav

London Karens Hotel: जेव्हा लोक हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जातात तेव्हा ते साहजिकच तेथील सर्व्हिस आणि सुविधा पाहतात. त्याचबरोबर कर्मचारी ग्राहकांशी कसे वागतात आणि जेवण कसे दिले जाते याची देखील पारख करतात. या सर्व गोष्टींमुळे एखादे हॉटेल किंवा रेस्टॉरंट चांगले बनते आणि लोक तिथे जाणे पसंत करतात, पण जरा विचार करा, जर तुम्ही हॉटेलमध्ये गेलात आणि तिथल्या सुविधा अगदी झिरो आहेत, कर्मचारी तुमचा अपमान करतात, तर तुम्हाला पुन्हा त्या हॉटेलमध्ये जायला आवडेल का?

तुमचे उत्तर नक्कीच नाही असेल, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की लंडनमध्ये असे एक हॉटेल आहे, जिथे आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत आणि पैसेही अपमान करुन वसूल केले जातात, पण तरीही लोक तिथे जाणे पसंत करतात. चला तर मग जाणून घेऊया अशा अजब हॉटेलबद्दल...

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, या हॉटेलमध्ये (Hotel) पैसे घेऊनही ग्राहकांशी गैरवर्तन केले जाते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ग्राहक हा अपमान शांतपणे सहन करतात. इथल्या हॉटेल कर्मचाऱ्यांना काहीही म्हणणे म्हणजे आणखी अपमान करुन घेणे. जर तुम्ही असा विचार करत असाल की ते स्वतःच्या इच्छेने हे करतात तर तुम्ही चुकीचे आहात. कर्मचारी त्यांच्या स्वेच्छेने लोकांचा अपमान करत नाहीत, उलट त्यांचा अपमान केल्याबद्दल त्यांना मोबदलाही मिळतो. हे हॉटेल बर्नेट, लंडन येथे आहे आणि 'केरेन्स हॉटेल' म्हणून ओळखले जाते. येथील एका रात्रीचे भाडे सुमारे 20 हजार रुपये आहे.

लोक इथे येऊन स्वतःचा अपमान करुन घेण्यासाठी येतात

पूर्वी हे हॉटेल रेस्टॉरंट होते, मात्र आता त्याचे हॉटेलमध्ये रुपांतर झाले आहे. येथे येणाऱ्या ग्राहकांचा खाण्याबरोबरच अपमान केला जातो. ग्राहकांनी हॉटेल कर्मचाऱ्याकडे पाणी मागितले तरी त्यांना स्वतः सिंकमधून पाणी घेण्यास सांगितले जाते. वेटर जेवणाचे ताट ग्राहकांच्या (Customers) दिशेने फेकतात आणि काहीवेळा अत्यंत उद्धटपणे त्यांच्याकडून अन्न हिसकावून घेतात. येथे येणाऱ्यांना मूलभूत सुविधाही दिल्या जात नाहीत. सगळ्यात गंमतीची गोष्ट म्हणजे हॉटेलवाले स्वतःला जगातील सर्वात 'वाईट हॉटेल' म्हणून जाहिरात करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT