"दुसरे महायुद्ध" आधुनिक जगातील सर्वात विनाशकारी युद्ध ठरले. या युद्धात जपान, जर्मनी आणि पोलंडसारख्या देशांतील लाखो लोक मारले गेले. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि रशिया हे देश एका बाजूला होते, त्यांनाही प्रचंड नुकसान सहन करावे लागले होते. 1942 मध्ये अमेरिकन पाणबुडीच्या हल्ल्यात जपानचे एक मोठे जहाज समुद्रात बुडाले होते.
दुसऱ्या महायुद्धात 1,000 हून अधिक लोकांसह बुडालेले जपानी जहाज अखेर सापडले आहे, असे व्हॉईस ऑफ अमेरिकाच्या वृत्तात म्हटले आहे.
जवळपास 80 वर्षांनंतर जपानी SSC Montevideo Maru या जहाजावर जपानी सैनिकांसह सुमारे 1,060 कैदी होते. जहाज बुडाले तेव्हा सर्वांचा मृत्यू झाला. कैद करण्यात आलेल्या सैनिकांपैकी 850 ऑस्ट्रेलियाचे होते.
जहाज पापुआ न्यू गिनीहून बंदिवान सैनिकांना चीनकडे घेऊन जात होते. त्याचवेळी फिलिपाइन्सजवळ एका अमेरिकन पाणबुडीने त्यावर टॉर्पेडोने हल्ला केला. त्यानंतर काही मिनिटांतच ते समुद्रात विसर्जित झाले.
या आठवड्याच्या सुरुवातीला या जहाजाचे अवशेष फिलिपाइन्सच्या दक्षिण चीन समुद्रात सापडले आहेत. ऑस्ट्रेलियन संरक्षण विभाग, ऑस्ट्रेलियाच्या सायलेंटवर्ल्ड फाउंडेशनचे सागरी पुरातत्वशास्त्रज्ञ आणि डच खोल समुद्र सर्वेक्षण कंपनी फुग्रोच्या तज्ञांनी जहाज शोधले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला फिलिपाइन्सच्या किनारपट्टीवर शोध मोहीम सुरू करण्यात आली होती.
ऑस्ट्रेलियाची सायलेंटवर्ल्ड फाउंडेशन गेल्या 12 दिवसांपासून माँटेव्हिडिओ मारूचा शोध घेत आहे. 80 वर्षांच्या युद्धानंतर या जहाजाचे अवशेष मिळणे ही मोठी गोष्ट मानली जात आहे, कारण हे जहाज टायटॅनिकपेक्षा जास्त खोलवर सापडले आहे, त्यामुळे या जहाजाचे अवशेष संशोधनासाठी ठेवण्यात येणार आहेत.
या जहाजावर उपस्थित असलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना अनेक वर्षांपासून मृतांची माहिती देण्यात आली नव्हती. जहाज बुडाल्यानंतर अवशेष कुठे गेले? हा प्रश्नही गूढ बनला होता. दरम्यान 80 वर्षांनंतर जहाजाचे अवशेष मिळाले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.