Afsheen Ismail Dainik Gomantak
ग्लोबल

Dwarf Humans: जगातील 'या' देशात राहतात सर्वात लहान लोक, फक्त इतकीचं वाढते उंची!

Country of Dwarf Humans: इराणच्या अफशीन इस्माईलचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

Manish Jadhav

Country of Dwarf Humans: इराणच्या अफशीन इस्माईलचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. कारण त्यांना जगातील सर्वात लहान व्यक्ती मानले जाते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, अफशीन इस्माईलची उंची केवळ 2 फूट 1.6 इंच आहे. हे काही खास कारणांमुळेच घडते.

पण आता प्रश्न पडतो की, जगातील सर्वात लहान व्यक्ती कोणत्या देशाची आहे? साउथईस्ट एशियन आइसलॅंडच्या टिमोर्सची उंची जगातील इतर लोकांपेक्षा कमी आहे. त्यांची सरासरी उंची 5 फूट 1.28 इंच आहे. तर येथे पुरुषांची उंची 5 फूट 2.9 इंच आहे. तथापि, फिलीपाइन्स (Philippines) आणि नेपाळमध्ये त्याहूनही लहान लोक आहेत.

पण सर्वात लहान लोक कुठे आहेत?

फिलीपाइन्स आणि नेपाळचे नाव तुम्ही ऐकले असेलच. फिलीपाइन्समध्ये राहणाऱ्या लोकांची सरासरी उंची सुमारे 5 फूट 1.57 इंच आहे. तर, फक्त पुरुषांबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांची उंची सुमारे 5 फूट 4.25 इंच आहे. आता नेपाळबद्दल बोलूया.

नेपाळ (Nepal) हा भारताचा शेजारी देश आहे, जिथे नागरिकांची सरासरी उंची 5 फूट 1.64 इंच आहे. जर फक्त पुरुषांबद्दल बोलायाचे झाल्यास, त्यांची सरासरी उंची 5 फूट 3.9 इंच आहे. एवढेच नाही तर येथील महिलांची उंची सुमारे 4 फूट 11.39 इंच आहे.

या यादीत मादागास्करचाही समावेश आहे

तसेच, कमी उंचीच्या लोकांचा विचार केला तर आपण मादागास्करला कसं विसरु शकतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, येथे राहणाऱ्या लोकांची सरासरी उंची 5 फूट 1.56 इंच आहे. तर फक्त पुरुषांबद्दल बोलायचे झाल्यास, इथल्या सरासरी पुरुषांची उंची 5 फूट 3.6 इंच आहे.

त्याचवेळी, महिलांची उंची सुमारे 4 फूट 11.5 इंच आहे. मादागास्कर नंतर, ग्वाटेमाला या यादीत येतो. येथे सरासरी उंची 5 फूट 1.57 इंच आहे. पुरुष साधारणतः 5 फूट 4.33 इंच आणि स्त्रियांचे सुमारे 4 फूट 10.81 इंच असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kundaim Fire: कुंडई वीजतारांमुळे वाढला धोका! आगीच्या घटनांमध्ये वाढ; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

खोटी कागदपत्रं वापरून घेतला पासपोर्ट, गोव्यात करायची सलूनमध्ये काम; फिलिपिन्स महिलेसह स्थानिकाच्या आवळल्या मुसक्या

"वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून विकास करणार"! रितेश नाईकांनी दिली ग्वाही; पांचमे- खांडेपार तळ्याच्या संवर्धन कामाचे केले उद्‍घाटन

Farmagudhi to Bhoma Road: फर्मागुढी-भोम रस्ता काम होणार सुरु! मंत्री कामतांची ग्वाही; बांदोडा ‘अंडरपास’चे उद्‌घाटन

Chimbel Unity Mall: 'चिंबल' ग्रामस्थांचे मोठे यश! युनिटी मॉल बांधकाम परवान्याला दिले आव्हान; सरकारी पक्षाचा विरोध फेटाळला

SCROLL FOR NEXT