Mr. Beast  Dainik Gomantak
ग्लोबल

जगातील सर्वात मोठ्या YouTuber च्या मृत्यूची बातमी खोटी, Mr. Beast ने दिला जिवंत असल्याचा पुरावा

Mr. Beast या नावाने प्रसिद्ध असलेल्या या YouTuber चे YouTube वर 138 मिलियन सब्सक्राइबर्स आहेत. त्याच्याकडे संपूर्ण जगात सर्वाधिक सब्सक्राइबर्स आहेत.

Manish Jadhav

Mr. Beast: जगातील सर्वात मोठ्या YouTuber चे नाव तुम्ही ऐकले असेलच. Mr. Beast या नावाने प्रसिद्ध असलेल्या या YouTuber चे YouTube वर 138 मिलियन सब्सक्राइबर्स आहेत. त्याच्याकडे संपूर्ण जगात सर्वाधिक सब्सक्राइबर्स आहेत.

युट्यूबवर (YouTube) त्याच्या चॅनलचे नाव देखील Mr. Beast आहे, त्याचे खरे नाव 'जिमी डोनाल्डसन' आहे. अलीकडेच, जिमी डोनाल्डसनच्या मृत्यूची बातमी एका यूजरने ट्विटरवर शेअर केली होती. ज्याला जिमीने त्याच्याच शैलीत उत्तर दिले.

स्वतः जिमी डोनाल्डसनने या ट्विटला उत्तर दिले आहे

वास्तविक, @ExtremeBlitz__ नावाच्या एका ट्विटर (Twitter) यूजर्सने जिमी डोनाल्डसनचा एक फोटो शेअर केला आणि ट्विट केले की जिमी मरण पावला आहे.

त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की- माझा विश्वासच बसत नाही की मिस्टर बीस्ट आता राहिला नाही... खूप लवकर निघून गेला यार.. या यूजर्सने ट्विटरवर जिमी डोनाल्डसनच्या निधनाची बातमी पोस्ट केली आहे.

त्यानंतर लाखो लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. हे ट्विट लिहिताना 15 दशलक्ष लोकांनी पाहिले आहे. पोस्टचा रीच पाहून मिस्टर बिस्टने स्वतः ट्विटरवर उत्तर देताना लिहिले – या पोस्टवर 1 लाख लाईक्स का आहेत?

मृत्यूची बातमी अफवा ठरली

मिस्टर बीस्टच्या रिप्लायवर ट्विटर यूजरने लिहिले – माझ्या पोस्टला रिप्लाय दिल्याने भावाच्या जीवात जीव आला. तुम्ही मला 10000 डॉलर्स दिल्यास मी ही पोस्ट काढून टाकेन.

मात्र, इतर यूजर्संना त्याचा हा विनोद आवडला नाही आणि त्यांनी त्याला या वाईट विनोदाबद्दल चांगलेच सुनावले. एका यूजरने लिहिले - अशा फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. त्याचवेळी दुसर्‍या यूजरने लिहिले - किमान कोणाच्या तरी मृत्यूवर असा घाणेरडा विनोद केला जाऊ नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Paliem: कुळवाड्यांनी शेकडो वर्षांपूर्वी भूमातेची पूजा आरंभली! निसर्गसंपन्न 'पालये' गाव; भोम येथील महाकाय वटवृक्ष

Opinion: प्लेटो दाखवून देतो, ‘लोकशाही’ शहाणपणापेक्षा ‘लोकप्रिय’ मताला प्राधान्य देऊन, हुकूमशाहीचा मार्ग सुकर करते

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

Sanguem Rathotsav: विठ्ठल, विठ्ठल! सांगेत भाविकांचा पूर, रथोत्सवानिमित्त होणार विठूनामाचा गजर

SCROLL FOR NEXT